अझहर अली
(अझर अली या पानावरून पुनर्निर्देशित)
साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती अझर अली (उर्दू: اظہر علی; जन्म १९ फेब्रुवारी १९८५ रोजी लाहोर, पंजाब) हा पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आहे.[१] जुलै २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने लॉर्डस मैदानावर पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. अझहर उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि तो एक अर्ध-वेळ लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो लाहोर, लाहोर ब्लूज, लाहोर व्हाईट्स, अब्बोत्ताबाद, खान रिसर्च लॅबॉरेट्रीज, पंजाब आणि हंटली (स्कॉटलंड) ह्या संघांकडून खेळला आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी संपादन करा
- ^ "अझहर अली". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट आर्काइव्हचे स्वग्रह". ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.