१९९०-९१ आशिया चषक
१९९०-९१ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही चौथी स्पर्धा भारतामध्ये २५ डिसेंबर १९९० ते ४ जानेवारी १९९१ दरम्यान झाली. स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे तीन संघ सहभागी झाले होते. भारतासोबत ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानने स्पर्धेतून अंग काढून घेतले होते.
१९९०-९१ आशिया चषक | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि अंतिम सामना | ||
यजमान | भारत | ||
विजेते | भारत (३ वेळा) | ||
सहभाग | ३ | ||
सामने | ४ | ||
सर्वात जास्त धावा | अर्जुन रणतुंगा (१६६) | ||
सर्वात जास्त बळी | कपिल देव (९) | ||
|
सदर स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली गेली, ज्यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांबरोबर प्रत्येकी एकदा खेळा आणि दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा (एकूण तिसऱ्यांदा) आशिया चषकावर आपले नाव कोरले.
गुणफलक
संपादनसंघ | सा | वि | प | ब | अ | गुण | धा |
---|---|---|---|---|---|---|---|
श्रीलंका | २ | २ | ० | ० | ० | ४ | ४.९०८ |
भारत | २ | १ | १ | ० | ० | २ | ४.२२२ |
बांगलादेश | २ | ० | २ | ० | ० | ० | ३.६६३ |
सामने
संपादनसाखळी सामने
संपादन २५ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- बांगलादेशने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- सरदिंदू मुखर्जी (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३१ डिसेंबर १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- धुक्यामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा खेळवला गेला.
- सैफुल इस्लाम (बां) आणि प्रमोद्य विक्रमसिंगे (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- बांगलादेशची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या.
अंतिम सामना
संपादन ४ जानेवारी १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना ३ जानेवारी ऐवजी ४ जानेवारी रोजी खेळवला गेला आणि प्रत्येकी ४५ षटकांचा केला गेला.
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्यदुवे
संपादनमालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो विस्तृत माहिती – क्रिकइन्फो