१९९५ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ५वी स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये एप्रिल १९९५ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. सर्व सामने शारजाहतील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुसऱ्यांदा आशिया चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला पेप्सी आशिया चषक असेही संबोधले गेले.

१९९५ आशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते भारतचा ध्वज भारत (४ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर भारत नवज्योतसिंग सिद्धू
सर्वात जास्त धावा भारत सचिन तेंडुलकर (२०५)
सर्वात जास्त बळी भारत अनिल कुंबळे (७)
१९९०-९१ (आधी) (नंतर) १९९७

स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. साखळी फेरी संपल्यानंतर भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीनही संघ गुणफलकात ८ गुणांसह बरोबरीत होते पण निव्वळ धावगतीच्या जोरावर भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव करत सलग तिसऱ्यांदा (एकूण चौथ्यांदा) आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पात्र संघ

संपादन
क्र. संघ पात्रता
१.   पाकिस्तान आय.सी.सी पूर्ण सदस्य,
२.   भारत आय.सी.सी पूर्ण सदस्य
३.   श्रीलंका आय.सी.सी पूर्ण सदस्य
४.   बांगलादेश आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा

मैदाने

संपादन
संयुक्त अरब अमिराती
शारजाह
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: १७,०००
सामने: ७
 

गुणफलक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  भारत ४.८५६
  श्रीलंका ४.७०१
  पाकिस्तान ४.५९६
  बांगलादेश २.९३३

साखळी सामने

संपादन
५ एप्रिल १९९५
धावफलक
बांगलादेश  
१६३ (४४.४ षटके)
वि
  भारत
१६४/१ (२७.५ षटके)
अमिनुल इस्लाम ३० (५३)
अनिल कुंबळे २/२३ (८ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मनोज प्रभाकर (भा)

६ एप्रिल १९९५
धावफलक
श्रीलंका  
२३३ (४९.४ षटके)
वि
  बांगलादेश
१२६ (४४.२ षटके)
अर्जुन रणतुंगा ७१ (७२)
सैफुल इस्लाम ४/३६ (१० षटके)
श्रीलंका १०७ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: अर्जुन रणतुंगा (श्री)

७ एप्रिल १९९५
धावफलक
पाकिस्तान  
२६६/९ (५० षटके)
वि
  भारत
१६९ (४२.४ षटके)
इंजमाम-उल-हक ८८ (१००)
अनिल कुंबळे २/२९ (८ षटके)
पाकिस्तान ९७ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: आकिब जावेद (पाक)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • झफर इकबाल आणि नईम अशरफ (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

८ एप्रिल १९९५
धावफलक
बांगलादेश  
१५१/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१५२/४ (२९.४ षटके)
अक्रम खान ४४ (८२)
आमेर नझीर २/२३ (७ षटके)
गुलाम अली ३८ (५३)
अथर अली खान १/१० (२ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: वसिम अक्रम (पाक)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • नइमुर रहमान (बां) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

९ एप्रिल १९९५
धावफलक
श्रीलंका  
२०२/९ (५० षटके)
वि
  भारत
२०६/२ (३३.१ षटके)
सचिन तेंडुलकर ११२ (१०७)
सनथ जयसुर्या २/४२ (१० षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

११ एप्रिल १९९५
धावफलक
पाकिस्तान  
१७८/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
१८०/५ (३०.५ षटके)
इंजमाम-उल-हक ७३ (९६)
चंपक रमानायके ३/२५ (१० षटके)
रोशन महानामा ४८ (७४)
आमिर सोहेल २/२१ (५ षटके)
श्रीलंका ५ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्रीलंका)

अंतिम सामना

संपादन
१४ एप्रिल १९९५
धावफलक
श्रीलंका  
२३०/७ (५० षटके)
वि
  भारत
२३३/२ (४१.५ षटके)
भारतीय ८ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.