रणजितसिंहजी
भारताचा क्रिकेट खेळाडू.
साचा:माहितीचौकट क्रिकेट खेळाडू संपूर्ण माहिती
रणजितसिंग याच्याशी गल्लत करू नका.
नवानगर (आताचे जामनगर)चे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ - एप्रिल २, १९३३) हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे.