युझवेंद्र चहाल

(युझवेन्द्र चहल या पानावरून पुनर्निर्देशित)


युझवेंद्र चहल (२३ जुलै १९९०) हा भारतातील हरयाणाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. [] तो लेग ब्रेक गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट ह्या दोन्ही खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा युझवेंद्र चहल हा एकमेव खेळाडू आहे.

युझवेंद्र चहल
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव युझवेंद्र सिंग चहल
उपाख्य पोपोय
जन्म २३ जुलै, १९९० (1990-07-23) (वय: ३४)
जिंद, हरयाणा,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक गुगली
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र.
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००९/१०-सद्य हरयाणा (संघ क्र. ३)
२०११-२०१३ मुंबई इंडियन्स (संघ क्र. ३)
२०१४-सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (संघ क्र. ३)
कारकिर्दी माहिती
ए.दि.टी२०प्र.श्रे.लिस्ट अ
सामने २० २८
धावा - - २०३ ११७
फलंदाजीची सरासरी - - ८.१२ १३.००
शतके/अर्धशतके - - ०/० -/-
सर्वोच्च धावसंख्या - - ४२ २२*
चेंडू १४४ ७२ २९४९ ११०२
बळी ३७ ३१
गोलंदाजीची सरासरी १२.८३ २९.६६ ४३.९७ २४.०९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२५ १/१९ ४/२२ ६/२४
झेल/यष्टीचीत १/- २/- ७/- ७/-

२३ जून, इ.स. २०१६
दुवा: [युझवेंद्र चहाल क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

त्याशिवाय तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघामध्ये खेळतो.[] तो भारताच्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ संघाचा खेळाडू होता.[]

स्थानिक कारकीर्द

संपादन

चहलला सर्वात आधी २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. आयपीएलच्या तीन मोसमात तो फक्त एका सामन्यात मैदानावर उतरला होता, परंतु २०११ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० मध्ये तो सर्व सामने खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ३ षटकांत ९ धावा देऊन २ गडी बाद केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सने १३९ धावांचा बचाव करून विजेतेपद मिळवले. २०१४ आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला त्याची मुळ किंमत  १० लाखात विकत घेतले. २०१४ च्या मोसमात त्याला दिल्ली डेरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

संपादन

झिम्बाब्वेच्या २०१६ च्या दौऱ्यावर १५ जणांच्या संघात त्याला निवडले गेले. ११ जून २०१६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर त्याने एकदिवसीय पदार्पण केले. []

दुसऱ्या सामन्यात, चहलने अवघ्या २५ धावांत ३ गडी बाद करून संघाच्या विजयात हातभार लावला. दुसऱ्या षटकात त्याने १०९ कि.मी. प्रति तासच्या वेगाने चेंडू टाकला होता.[] त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीमुळे त्याला पहिला आंतरराष्ट्रीय सामनावीराचा पुरस्कार मिळला.

१८ जून २०१६ रोजी त्याने हरारे स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.[]

आंतरराष्ट्रीय पुरस्कार

संपादन

एकदिवसीय क्रिकेट

संपादन

सामनावीर पुरस्कार

संपादन
क्र. प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक सामन्यातील कामगिरी निकाल
झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे १३ जून २०१६ ६-२-२५-३ ; फलंदाजी नाही   भारत ८ गडी राखून विजयी.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्यदुवे

संपादन