सवाई मानसिंह स्टेडियम

सवाई मानसिंह मैदान हे भारतातील राजस्थान राज्यातील जयपूर शहरामध्ये वसलेले क्रिकेट मैदान आहे. महाराज सवाई मानसिंह यांच्या राजवटीत सदर मैदान बांधले गेले होते. रामबाग सर्कलच्या एका कोपऱ्यात हे मैदान आहे. मैदानाची आसनक्षमता २३,१८५ इतकी आहे.

सवाई मानसिंह स्टेडियम
मैदान माहिती
स्थान जयपूर, राजस्थान, भारत
स्थापना १९६९[]
आसनक्षमता ३५,०००[]
मालक राजस्थान राज्य क्रीडा समिती
प्रचालक राजस्थान क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ
राजस्थान क्रिकेट संघ
राजस्थान रॉयल्स
जयपूर पिंक पँथर्स

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. २१-२६ फेब्रुवारी १९८७:
भारत  वि. पाकिस्तान
प्रथम ए.सा. २ ऑक्टोबर १९८३:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा. १६ ऑक्टोबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल ३ नोव्हेंबर २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

इतिहास

संपादन

फेब्रुवारी १९८७ साली, सवाई मानसिंह मैदानावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकमेव कसोटी सामना झाला आहे, ज्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती झिया-उल-हक "क्रिकेट फॉर पीस"चा एक भाग म्हणून दुसऱ्या दिवशी सामना पाहण्यास आले होते.

ही कसोटी युनिस अहमदचे कसोटी मध्ये १७ वर्षांनंतर पुनरागमन आणि सुनिल गावस्करची कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर बाद होण्याची वेळ यामुळे लक्षणीय ठरली.

तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णितावस्थेत संपला. पाकिस्तानने खेळपट्टीवर विषम प्रमाणात असलेल्या धूळीबद्दल आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता.

मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनासुद्धा ह्याच दोन संघांदरम्यान २ ऑक्टोबर १९८३ रोजी खेळवला गेला. विश्वचषक विजय ताजा असताना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या संघाने पाकिस्तानवर अगदी आरामात ४ गडी राखून विजय मिळवला.

१९८७ आणि १९९६ विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुद्धा ह्या मैदानावर दोन सामने खेळवले गेले, ज्यामध्ये अनुक्रमे वेस्ट इंडीजचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाला परंतु नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. ऑक्टोबर २०१३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ह्या मैदानावर शेवटचा सामना खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने ३५९ धावांचा पाठलाग करताना फक्त एका गड्याच्या मोबदल्यात ४३.३ षटकांमध्ये ३६२ धावा करून दणदणीत विजय मिळवला.

ह्याच सामन्यात विराट कोहलीने भारतातर्फे सर्वात जलद शतक ठोकले होते, हा जोहान्सबर्गमधील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या प्रसिद्ध सामन्यानंतर एकदिवसीय सामन्यातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. .[]

ह्या मैदानावरची सर्वात मोठी वैयक्तिक एकदिवसीय धावसंख्या नाबाद १८३ महेंद्रसिंग धोणीच्या नावावर आहे.

पुनर्विकास

संपादन

२००६ मध्ये, ४०० कोटी रुपए खर्च करून मैदानाचा मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करण्यात आला. [] २८ खोल्या, व्यायामशाळा, उपहारगृह, २ कॉन्फरन्स हॉल आणि जलतरण तलाव असलेली एक जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी ७ कोटी रुपए खर्चून बांधण्यात आली. []

नवीन सुविधा:

  • प्रसारमाध्यमांसाठी खोल्या
  • गॅलरी
  • २ नवीन ब्लॉक
  • क्षमता

सामने

संपादन

सवाई मानसिंह मैदानावर, पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला तो १९८३ साली भारत आणि पाकिस्तान दरम्यान, ज्यामध्ये भारताने ४ गडी राखून विजय मिळवला होता. १९८७ साली भारत आणि पाकिस्तानदरम्यान शांतता प्रस्थापित होण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून मैदानावर आजवरचा एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला, ज्याला पाकिस्तानचे अध्यक्ष झिया-उल-हक यांनी दुसऱ्या दिवशी हजेरी लावली होती.

पहिल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेते राजस्थान रॉयल्सचे अनेक शामने ह्या मैदानावर झाले आहेत.

परंतू राज्य सरकारकडून आवश्यक परवानग्या घेण्यात राजस्थान क्रिकेट असोसिएशन असमर्थ ठरल्यामुळे त्यांच्या घरच्या मैदानाचा फायदा घेण्यापासून रॉयल्सना वंचित रहावे लागत आहे.

मैदानातील विक्रम

संपादन
  • सर्वोच्च धावसंख्या: भारत ३६२/१ वि. ऑस्ट्रेलिया, २०१३-१४ मध्ये.
  • निचांकी धावसंख्या: भारत १३५ वि. पाकिस्तान, १९९८-९९ मध्ये.
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: महेंद्रसिंग धोणी – नाबाद १८३, ३१ ऑक्टोबर २००५ रोजी.
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर – ३२२ धावा, ७ सामन्यांमध्ये.
  • सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: वेंकटपती राजू – ४/४६, ११ नोव्हेंबर १९९४ रोजी.
  • सर्वाधिक बळी: श्रीसंत – ९ बळी, ३ सामन्यांमध्ये.
  • सर्वोत्कृष्ट भागीदारी: जेफ मार्श आणि डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया) – २१२ धावा, ७ सप्टेंबर १९८६ रोजी.
  • विराट कोहलीने भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक याच मैदानावर ठोकले (५१ चेंडू).

कसोटी क्रिकेट

संपादन

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

संघ १ संघ २ विजेते फरक वर्ष धावफलक
  भारत   पाकिस्तान अनिर्णित १९८७ धावफलक

एकदिवसीय क्रिकेट

संपादन

ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[]

दिनांक स्पर्धा संघ १ संघ २ विजेते फरक धावफलक
२ ऑक्टोबर १९८३ द्विदेशीय मालिका   भारत   पाकिस्तान   भारत ४ गडी धावफलक
७ सप्टेंबर १९८६ द्विदेशीय मालिका   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ७ गडी धावफलक
२६ ऑक्टोबर १९८७ रिलायन्स विश्वचषक   इंग्लंड   वेस्ट इंडीज   इंग्लंड ३४ धावा धावफलक
१८ जानेवारी १९९३ द्विदेशीय मालिका   भारत   इंग्लंड   इंग्लंड ४ गडी धावफलक
११ नोव्हेंबर १९९४ द्विदेशीय मालिका   भारत   वेस्ट इंडीज   भारत ५ धावा धावफलक
४ मार्च १९९६ विल्स विश्वचषक   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज ४ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर १९९६ टायटन चषक   भारत   दक्षिण आफ्रिका   दक्षिण आफ्रिका २७ धावा धावफलक
२४ मार्च १९९९ पेप्सी चषक   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान १४३ धावा धावफलक
३१ ऑक्टोबर २००५ द्विदेशीय मालिका   भारत   श्रीलंका   भारत ६ गडी धावफलक
११ ऑक्टोबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   बांगलादेश   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज १० गडी धावफलक
१३ ऑक्टोबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   बांगलादेश   झिम्बाब्वे   बांगलादेश १०१ धावा धावफलक
१५ ऑक्टोबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   भारत   इंग्लंड   भारत ४ गडी धावफलक
१७ ऑक्टोबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   पाकिस्तान   श्रीलंका   पाकिस्तान ४ गडी धावफलक
२१ ऑक्टोबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ६ गडी धावफलक
२ नोव्हेंबर २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज   वेस्ट इंडीज ६ गडी धावफलक
१८ नोव्हेंबर २००७ द्विदेशीय मालिका   भारत   पाकिस्तान   पाकिस्तान ३१ धावा धावफलक
२१ फेब्रुवारी २०१० द्विदेशीय मालिका   भारत   दक्षिण आफ्रिका   भारत १ धाव धावफलक
१ डिसेंबर २०१० द्विदेशीय मालिका   भारत   न्यूझीलंड   भारत ८ गडी धावफलक
१६ ऑक्टोबर २०१३ द्विदेशीय मालिका   भारत   ऑस्ट्रेलिया   भारत ९ गडी धावफलक

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "सवाई मानसिंह मैदान". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ "सवाई मानसिंग मैदान, जयपूर माहिती, सामने, आकडेवारी -". क्रिकबझ.कॉम. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ भारताचे सर्वात जलद शतक आणि सर्वात महागड्या गोलंदाजीची रेलचेल
  4. ^ "तहलका". 2012-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-04 रोजी पाहिले.
  5. ^ तहलका
  6. ^ सवाई मानसिंह मैदान, जयपूर/ नोंदी / कसोटी सामने / निकाल
  7. ^ सवाई मानसिंह मैदान, जयपूर/ नोंदी / एकदिवसीय सामने / निकाल