ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये भारत दौरा केला. व त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्याची मलिका खेळण्यासाठी दौरा करणार आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक निश्चित केले.[१] ८ डिसेंबर २०२२ रोजी, बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[२] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.[३][४]
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२–२३ | |||||
भारत | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | २० सप्टेंबर २०२२ – मार्च २०२३ | ||||
संघनायक | रोहित शर्मा | अॅरन फिंच (ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (२९७) | उस्मान ख्वाजा (३३३) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन आश्विन (२५) | नेथन ल्यॉन (२२) | |||
मालिकावीर | रविचंद्रन आश्विन (भा) रवींद्र जडेजा(भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लोकेश राहुल (११६) | मिचेल मार्श (१९४) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद सिराज (५) | मिचेल स्टार्क (८) | |||
मालिकावीर | मिचेल मार्श (ऑ) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सूर्यकुमार यादव (११५) | कॅमेरॉन ग्रीन (११८) | |||
सर्वाधिक बळी | अक्षर पटेल (८) | नेथन एलिस (३) ॲडम झाम्पा (३) जॉश हेझलवूड (३) | |||
मालिकावीर | अक्षर पटेल (भा) |
ट्वेंटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.[५] ओल्या मैदानामुळे दुसरा सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला आणि भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला.[६] तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.[७]
१३ फेब्रुवारी २०२३ रोजी, बीसीसीआयने ने पुष्टी केली की तिसऱ्या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले आहे.[८]
पथके
संपादनकसोटी | ट्वेन्टी२० | ||
---|---|---|---|
भारत[९] | ऑस्ट्रेलिया[१०] | भारत[११] | ऑस्ट्रेलिया[१२] |
मालिका सुरू होण्यापूर्वी, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टोइनिस यांना दुखापतींमुळे संघाबाहेर जावे लागले आणि त्यांच्या जागी शॉन अॅबॉट, नेथन एलिस आणि डॅनियेल सॅम्स यांना स्थान देण्यात आले होते.[१३] भारताच्या मोहम्मद शमीला कोविड-१९ मुळे टी२० मालिकेतून वगळण्यात आले,[१४] त्याच्या जागी उमेश यादवची निवड करण्यात आली.[१५]
१० जानेवारी २०२३ रोजी, मिचेल स्टार्क बोटाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला.[१६] १ फेब्रुवारी २०२३ रोजी, श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला.[१७] ५ फेब्रुवारी २०२३ रोजी, जोश हेझलवूडला त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१८] ७ फेब्रुवारी २०२३ रोजी, कॅमेरॉन ग्रीनला बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले.[१९] दुसऱ्या कसोटीच्या आधी, मॅथ्यू कुन्हेमन मिचेल स्वेपसनच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आले.[२०] १२ फेब्रुवारी २०२३ रोजी, जयदेव उनाडकटला रणजी ट्रॉफी फायनल खेळण्यासाठी दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या संघातून मुक्त करण्यात आले.[२१]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- यापूर्वी सिंगापूरसाठी चौदा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळल्यानंतर टिम डेव्हिडने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये पदार्पण केले, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये दोन आंतरराष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणारा तो सोळावा क्रिकेट खेळाडू बनला.[२२]
- लोकेश राहुल (भारत) ट्वेंटी२० मध्ये २००० धावा करणारा तिसरा भारतीय ठरला.[२३]
- हे ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे यशस्वी धावांचे आव्हान होते.[२४]
२रा टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ओल्या मैदानामुळे सामना प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आला.
३रा टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका
संपादन१ला कसोटी सामना
संपादन९-१३ फेब्रुवारी २०२३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- के.एस. भरत, सूर्यकुमार यादव (भा) आणि टॉड मर्फी (ऑ) या सर्वांचे कसोटी पदार्पण.
- टॉड मर्फीचे (ऑ) कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[२५]
- रविचंद्रन अश्विन (भा) कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेणारा, सामन्यांच्या बाबतीत (८९ कसोटी सामने) दुसरा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला.[२६] अश्विनने भारतातील त्याच्या २५व्या पाच विकेट्सचा दावा केला, जो भारतातील कोणाकडूनही संयुक्त सर्वोच्च होता (अनिल कुंबळे सह).[२७]
- ९१ धावा ही ऑस्ट्रेलियाची भारतातील सर्वात कमी कसोटी धावसंख्या होती..[२८]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, ऑस्ट्रेलिया ०.
२रा कसोटी सामना
संपादन१७-२१ फेब्रुवारी २०२३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- मॅथ्यू कुन्हेमनचे (ऑ) कसोटी पदार्पण.
- चेतेश्वर पुजाराचा (भा) १००वा कसोटी सामना.[२९] १००व्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तो दुसरा भारतीय ठरला.[३०]
- ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा डाव सुरु असताना दुखापत झाल्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या ऐवजी दुसऱ्या दिवशी मॅट रेनशॉला संघात स्थान दिले गेले.[३१]
- ७/४२ ही रवींद्र जडेजाची कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी होती.[३२]
- रविचंद्रन अश्विन आणि नेथन ल्यॉन यांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध १०० कसोटी बळी पूर्ण केले.[३२][३३]
- विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (डावाच्या बाबतीत) सर्वात वेगवान २५००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[३४]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत १२, ऑस्ट्रेलिया ०.
३रा कसोटी सामना
संपादन१-५ मार्च २०२३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुरेशा गवताच्या कमतरतेमुळे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यास तयार नसल्यामुळे हा सामना धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आला.[३५]
- मॅथ्यू कुन्हेमन (ऑ) याचे कसोटीत पहिल्यांदाच पाच बळी.[३६]
- २०१७ नंतर ऑस्ट्रेलियाचा हा भारतातील पहिला कसोटी विजय होता आणि २०२१ नंतर भारतातील कोणत्याही पाहुण्या संघाचा हा पहिला विजय होता.[३७]
- या सामन्याच्या परिणामी, ऑस्ट्रेलिया २०२१-२०२३ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.[३८]
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: ऑस्ट्रेलिया १२, भारत ०.
४था सामना
संपादन९-१३ मार्च २०२३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- कॅमेरॉन ग्रीनचे (ऑ) पहिले कसोटी शतक.[74]
- रविचंद्रन अश्विन (भारत) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा, तसेच नेथन ल्यॉन (ऑ) ला मागे टाकत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. परंतु त्याच सामन्यात लिऑनने पुन्हा अव्वल स्थान मिळवले.
- चेतेश्वर पुजारा (भा) कसोटीत एकाच संघाविरुद्ध २,००० धावा करणारा चौथा फलंदाज ठरला.
- रोहित शर्मा (भारत) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० वी धाव पूर्ण केली, असे करणारा तो ६वा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.
- विराट कोहली (भा) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० झेल घेणारा दुसरा भारतीय ठरला. कोहलीने भारतात ४,००० कसोटी धावाही पूर्ण केल्या आणि ही कामगिरी करणारा तो पाचवा क्रिकेट खेळाडू ठरला.
- टाकलेल्या चेंडूचा विचार केल्यास अक्षर पटेल हा भारतासाठी पन्नास कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला. (२२०५ चेंडू)
- विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: भारत ४, ऑस्ट्रेलिया ४.
एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन३रा सामना
संपादनबाह्यदुवे
संपादनसंदर्भयादी
संपादन- ^ "बीसीसीआयतर्फे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध PAYTM होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बीसीसीआयतर्फे श्रीलंका, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मास्टरकार्ड होम सीरिजचे वेळापत्रक जाहीर". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २८ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "वेड आणि ग्रीनने २०९ धावांचा पाठलाग करताना भारताला थक्क केले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आठ षटकांच्या सामन्यात रोहित आणि अक्षरमुळे भारताला मालिका बरोबरीत आणण्यास मदत". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोहली, सूर्यकुमारने केला शानदार पाठलाग; भारताचा मालिकेत २-१ ने विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "तिसर्या कसोटीचे ठिकाण धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आले". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "मास्टरकार्ड न्यू झीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर". बीसीसीआय. १३ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "अनकॅप्ड स्पिनर नेम्ड ऍज ऑस्ट्रेलिया स्वेट ऑन स्टार्क अँड ग्रीन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२२, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टी२० साठी भारताच्या संघांची घोषणा". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "'मॅच-विनर' डेव्हिडचा ऑसी विश्वचषक संघात प्रवेश". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "भारत दौऱ्यात दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचे त्रिकूट गमावले". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कोविडमुळे शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेतून बाहेर; उमेशची निवड होण्याची शक्यता आहे". क्रिकबझ्झ. २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मोहम्मद शमीची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह, उमेश यादवची बदली खेळाडू म्हणून निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "स्टार्क भारताच्या पहिल्या कसोटीतून बाहेर, ऑस्ट्रेलियाच्या १८ सदस्यीय संघात चार फिरकीपटूंची निवड". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "जोश हेझलवूड भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीला मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "कॅमेरॉन ग्रीन भारताविरुद्ध पहिली कसोटी खेळण्याची शक्यता नाही". ईएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "'शॉक्ड' कुन्हेमन व्हिस्कड इनटू इंडिया कॅल्क्युलेशन्स". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "जयदेव उनाडकटची रणजी ट्रॉफी फायनल खेळण्यासाठी दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघातून मुक्तता". भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी: एकत्रित कसोटी, एकदिवसीय आणि टी२० नोंदी. वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच), दोन देशांचे प्रतिनिधित्व". ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळीदरम्यान केएल राहुल आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला - स्पोर्ट्स न्यूझ". Wion News. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आं.टी२० रेकॉर्ड्स - सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग". [ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन टॉड मर्फीचे पाच बळी परंतु नागपुरातील पहिल्या कसोटीत भारत आघाडीवर आहे". एबीसी न्यूझ ऑस्ट्रेलिया. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया: अनिल कुंबळेनंतर ४५० किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला". इंडियन एक्स्प्रेस. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "बॉर्डर-गावसकर ट्रॉफी: आर अश्विनची घरच्या मैदानावर २५व्यांदा ५ बळी घेत अनिल कुंबळेच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी". इंडिया टुडे. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलिया सर्वबाद ९१, भारताविरुद्ध भारतातील सर्वात कमी कसोटी धावसंख्येची नोंद". स्पोर्टस्टार. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "पुजारा ॲट १००: टीममेट्स पे हार्टवॉर्मिंग ट्रिब्यूट टू इंडियाज क्रायसिस-मॅन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "१००व्या कसोटीत शून्य धावा करणारा पुजारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला". द स्टॅट्समॅन. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "दुखावल्यामुळे वॉर्नर बाद, त्याची जागा रेनशॉने घेतली". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ a b "भारताला अव्वल स्थानावर आणताना रवींद्र जडेजाची दिल्ली कसोटीत कारकिर्दीमधील सर्वोत्तम गोलंदाजी". टाइम्स ऑफ इंडिया. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०० कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय ठरला". न्यूझ१८. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "नॅथन लियॉनचा भारताविरुद्ध अविश्वसनीय विक्रम, १०० विकेट्स आणि ८व्या 5 विकेट्सची नोंद". इंडिया टुडे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी धर्मशाला येथून इंदूरला हलवण्यात आली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "फिरकीविरुद्ध भारत कोसळल्यानंतर ख्वाजाने ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी: भारतासाठी एक दुर्मिळ घरचा पराभव, पंचांसाठी विसरता येणारी कसोटी". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाचा यशस्वी पाठलाग, ट्रॅव्हिस हेडचे प्रभारी नेतृत्व". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे |
---|
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८ २००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३ |