ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.[१][२][३] भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४] ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.[५]

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख १६ फेब्रुवारी – २९ मार्च २०१७
संघनायक विराट कोहली स्टीव्ह स्मिथ
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (४०५) स्टीव्ह स्मिथ (४९९)
सर्वाधिक बळी रवींद्र जडेजा (२५) स्टीव्ह ओ'कीफे (१०)
नेथन ल्योन (१०)
मालिकावीर रवींद्र जडेजा (भा)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या.[६] बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ.[७] ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.[८]

संघ संपादन

भारतचा ध्वज भारत[९] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[१०]

सराव सामना संपादन

प्रथम श्रेणी: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया संपादन

१७-१९ फेब्रुवारी २०१६
धावफलक
वि
४६९/७घो (१२७ षटके)
स्टीव्ह स्मिथ १०७ (१६१)
नवदीप सैनी २/४२ (१९.४ षटके)
४०३ (९१.५ षटके)
श्रेयस अय्यर २०२* (२१०)
नेथन ल्योन ४/१६२ (२८.५ षटके)
११०/४ (३६ षटके)
पीटर हॅंड्सकॉंब ३७ (६९)
रिषभ पंत १/९ (२ षटके)
सामना अनिर्णित
ब्रेबर्न मैदान, मुंबई
पंच: अनिल दांडेकर (भा) आणि मिलिंद पाठक (भा)
  • नाणेफेक: भारत अ, गोलंदाजी


कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२३-२७ फेब्रुवारी २०१६
धावफलक
वि
२५६/९ (९४.५ षटके)
मॅट रेनशॉ ६८ (१५६)
उमेश यादव ४/३२ (१२ षटके)
१०५ (४०.१ षटके)
लोकेश राहुल ६४ (९७)
स्टीव्ह ओ'कीफे ६/३५ (१३.१ षटके)
२८५ (८७ षटके)
स्टीव्ह स्मिथ १०९ (२०२)
रविचंद्रन अश्विन ४/११९ (२८ षटके)
१०७ (३३.५ षटके)
चेतेश्वर पुजारा ३१ (५८)
स्टीव्ह ओ'कीफे ६/३५ (१५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३३३ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, पुणे
पंच: रिचर्ड केटेलबोरो (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: स्टीव्ह ओ'कीफे (ऑ)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • ह्या मैदानावरील ही पहिलीच कसोटी.[८]
  • १०५ ही भारताचा भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे.
  • मिचेल स्टार्कच्या (ऑ) १,००० कसोटी धावा पूर्ण.[१६]
  • रविचंद्रन अश्विनने (भा) कपिल देवचा भारतातील मोसमातील सर्वात जास्त बळी घेण्याचा विक्रम मोडला.[१७]
  • स्टीव्ह ओ'कीफेने (ऑ) कसोटीमध्ये पहिल्यांदाच ५-बळी घेण्याची कामगिरी कामगिरी केली.[१८] त्याने पाच गडी १९ चेंडूंमध्ये बाद केले आणि भारताविरुद्ध सर्वात कमी चेंडूंमध्ये पाच गडी बाद करण्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.[१९]
  • भारताचे शेवटचे सात गडी अवघ्या ११ धावांत बाद झाले, ही कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वात वाईट कामगिरी.[१९]
  • स्टीव्ह ओ'कीफेची सामन्यातील ७० धावांत १२ बळींची कामगिरी ही भारतातील कसोटीमध्ये परदेशी फिरकी गोलंदाजाची सर्वोत्कृष्ट कामगिरी तसेच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची भारताविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२०]
  • २००४ नंतर हा ऑस्ट्रेलियाचा आणि २०१२ नंतर कोणत्याही संघाचा भारतातील पहिला विजय.[२०]


२री कसोटी संपादन

४-८ मार्च २०१६
धावफलक
वि
१८९ (७१.२ षटके)
लोकेश राहुल ९० (२०५)
नेथन ल्योन ८/५० (२२.४ षटके)
२७६ (१२२.४ षटके)
शॉन मार्श ६६ (१९७)
रवींद्र जडेजा ६/६३ (२१.४ षटके)
२७४ (९७.१ षटके)
चेतेश्वर पुजारा ९२ (२२१)
जोश हेझलवूड ६/६७ (२४ षटके)
११२ (३५.४ षटके)
स्टीव्ह स्मिथ २८ (४८)
रविचंद्रन अश्विन ६/४१ (१२.४ षटके)
भारत ७५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: लोकेश राहुल (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • नेथन ल्योनने (ऑ) परदेशी खेळाडूतर्फे भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.[२१]
  • ऑस्ट्रेलियातर्फे नेथन ल्योन हा भारताविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज (५८ बळी), आणि भारताविरुद्ध तीनवेळा सात-गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज.[२१]
  • चार वेगवेगळ्या गोलंदाजांनी एका डावात प्रत्येकी ६ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ.[२२]
  • रविचंद्रन अश्विनने (भा) सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये (४७) २५ वेळा पाच गडी बाद करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.[२२]


३री कसोटी संपादन

१६-२० मार्च २०१६
धावफलक
वि
४५१ (१३७.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ १७८* (३६१)
रवींद्र जडेजा ५/१२४ (४९.३ षटके)
६०३/९घो (२१० षटके)
चेतेश्वर पुजारा २०२ (५२५)
पॅट कमिन्स ४/१०६ (३९ षटके)
२०४/६ (१०० षटके)
पीटर हॅंड्सकॉंब ७२* (२००)
रवींद्र जडेजा ४/५४ (४४ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • ह्या मैदानावरील हा पहिला कसोटी सामना आणि ऑस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना.[२३]
  • मुरली विजयचा (भा) ५०वा कसोटी सामना.[२३]
  • ५,००० कसोटी धावा पूर्ण करणारा स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात लहान खेळाडू. तसेच त्याची ही कामगिरी ऑस्ट्रेलियातर्फे तिसरी सर्वात जलद आहे.[२४]
  • ग्लेन मॅक्सवेलचे (ऑ) पहिले कसोटी शतक. तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक करणारा तो ऑस्ट्रेलियातर्फे दुसरा आणि जगातील तेरावा फलंदाज.[२५]
  • स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल दरम्यानची १९१ धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलियाची ५व्या गड्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट भागीदारी आणि ५व्या गड्यासाठी पाहुण्या संघातर्फे भारतातील ४थी सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२६]
  • स्टीव्ह स्मिथ च्या नाबाद १७८ धावा ह्या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारातर्फे सर्वोत्कृष्ट खेळी तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची भारतातील तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[२६]
  • चेतेश्वर पुजाराने (भा) ५२५ चेंडूंचा सामना करताना २०२ धावा केल्या, भारतीय फलंदाजातर्फे चेंडूचा विचार करता कसोटीमधील ही सर्वात मोठी खेळी आहे.[२७]
  • पुजारा आणि वृद्धिमान साहा यांची १९९ धावांची भागीदारी ही भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी आहे.[२७]


४थी कसोटी संपादन

२५-२९ मार्च २०१६
धावफलक
वि
३०० (८८.३ षटके)
स्टीव्ह स्मिथ १११ (१७३)
कुलदीप यादव ४/६८ (२३ षटके)
३३२ (११८.१ षटके)
रवींद्र जडेजा ६३ (९५)
नेथन ल्योन ५/९२ (३२.१ षटके)
१३७ (५३.५ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ४५ (६०)
रवींद्र जडेजा ३/२४ (१८ षटके)
१०६/२ (२३.५ षटके)
लोकेश राहुल ५१* (७६)
पॅट कमिन्स १/४२ (८ षटके)


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआयचा मोठा घरचा मोसम: १३ कसोटी, सहा नवी मैदाने". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक: २०१६-१७ मधील सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ९ जून २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "चवथ्या मालिकाविजयासह भारताचा यशस्वी मोसम" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "इंडिया कम्प्लिट द टेस्ट-ट्रॉफी सेट" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची सुरवात पुण्यातून". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: डीआरएसला हिरवा सिग्नल". एबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ a b "पुण्यातल्या पहिल्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची खडतर चाचणी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढाईसाठी विराटसेना 'जैसे थे'". महाराष्ट्र टाइम्स. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "भारतीय दौऱ्यासाठी स्वेप्सन फिरकी चौकडीत सामील". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ "दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या ऐवजी कसोटी संघात स्टोइनिस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "भारतीय संघात विजय कायम; दुखापतीमुळे पंड्या बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "दुखापतग्रस्त [[मिचेल स्टार्क]] कसोटी मालिकेबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मार्च २०१७ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  14. ^ "स्टार्कच्या जागी पॅट कमिन्सला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ "कोहलीऐवजी श्रेयस अय्यरला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "रेनशॉ, स्टार्क प्रॉप अप ऑस्ट्रेलिया". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "आकडेवारी: भारतातील मोसमातील सर्वात जास्त बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम आर. अश्विनने मोडला". स्पोर्ट्सकीडा (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "ओ'कीफेच्या सहा बळींमुळे भारताचा डाव १०५ धावांवर आटोपला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ a b "भारताचे सात-गडी बाद होण्याची सर्वात वाईट वेळ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ a b "ओ'कीफे, स्मिथतर्फे ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ a b "ल्योनचे ५० धावांत ८ बळी - दौरा करणाऱ्या गोलंदाजाची भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ a b "अश्विन: कसोटीमधील सर्वात कसोट्यांमध्ये २५ वेळा पाच-गडी बाद करण्याची कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ a b "आठवड्याभराचे वादविवाद आणि बदलांनंतर पुन्हा क्रिकेटकडे" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ "स्मिथच्या यशस्वी कारकीर्दीतील आणखी एक मैलाचा दगड" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ "मॅक्सवेल्स मेडन टन कम्प्लिट्स ट्रायफेक्टा" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ a b "स्टीव्ह स्मिथची संयुक्त-सर्वात लांब कसोटी खेळी" (इंग्रजी भाषेत). १७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ a b "पुजाराची भारतातर्फे सर्वात दीर्घ खेळी" (इंग्रजी भाषेत). २१ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "धरमशाला डीसायडर प्रॉमिसेस मोअर सरप्राइजेस" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "कोहली कसोटीमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ a b "स्टीव्हन स्मिथ जॉईन्स एलिट परफॉर्मर्स इन इंडिया" (इंग्रजी भाषेत). ७ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे संपादन


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३