विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

क्रिकेट स्टेडियम

महाराष्ट्र, भारतातील नागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे नागपूर-वर्धा रस्त्यावर असलेल्या जामठा या गावी स्थित आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
मैदान माहिती
स्थान जामठा, नागपूर
स्थापना २००८
आसनक्षमता ४५,०००
मालक विदर्भ क्रिकेट असोसिएशन
प्रचालक विदर्भ क्रिकेट असोसिएशन

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ६-१० नोव्हेंबर २००८:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. २५-२७ नोव्हेंबर २०१५:
भारत  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. २८ ऑक्टोबर २००९:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. ३० ऑक्टोबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२० ९ डिसेंबर २००९:
भारत वि. श्रीलंका
अंतिम २०-२० २९ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल ऑक्टोबर २५, २०१६
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

मैदानाचे उद्घाटन २००८ साली झाले आणि शहरातले मुख्य मैदान म्हणून ह्या मैदानाने विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानाची जागा घेतली. नवीन विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची एक अव्वल दर्जाचे मैदान म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्तुती केली आहे.[]

व्हीसीए स्टेडियम हे विदर्भ आणि मध्य विभाग ह्या संघाचे अनुक्रमे रणजी करंडक आणि दुलीप करंडक स्पर्धांसाठी होम ग्राउंड आहे.

व्हीसीए मैदानाचा आराखडा

सचिन तेंडुलकर म्हणाला,"ह्या मैदानावर अपेक्षेपेक्षा चांगल्या सुविधा आहेत." रिकी पाँटिंगने चेंजिंग रुमच्या सुखसोईंची प्रशंसा केली.[] डेक्कन चार्जर्सवर दोन-धावांनी विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न “मैदानाची मोठ्या आकाराबाबत” आनंदित होता. “मायकेल लंबने मिड-विकेटच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाने झेलला. आता, जर हे एम.ए. चिदंबरम मैदान किंवा एम. चिन्नास्वामी मैदान असते तर चेंडू जणू संघाच्या हॉटेलकडे जाणाऱ्या टॅक्सीमध्येच पडला असता. आपल्याला अशाच मोठ्या मैदानांची गरज आहे.,” वॉर्न म्हणाला.[] मैदान सरळ ८० यार्ड आणि ८५ यार्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने आहे, त्यामुळे (खेळण्याच्या क्षेत्रानुसार) ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे.[]

व्हीसीए मैदान, नागपूरचे विहंगम दृश्य

कसोटी विक्रम

संपादन

एकदिवसीय विक्रम

संपादन

आंतरराष्ट्रीय टी२० विक्रम

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "नागपूरमध्ये भारत-न्यू झीलंड कसोटी होणार – टाइम्स ऑफ इंडिया". 2013-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रेक्षकांसाठी योग्य मैदानात प्रेक्षकांचा शुकशुकाट". क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत).
  3. ^ बॉलर्स इन विथ चान्स ॲट द व्हीसीए स्टेडियम इन नागपूर – स्पोर्ट – डीएनए. डीएनएइंडिया.कॉम. २३ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
  4. ^ "संग्रहित प्रत". 2013-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-25 रोजी पाहिले.
  5. ^ धोणीच्या फटकेबाजीमुळे मालिकेमध्ये बरोबरी | भारत वि. ऑस्ट्रेलिया, २रा ए.दि., नागपूर अहवाल | क्रिकेट न्यूझ. इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.