क्रिकेट विश्वचषक, १९७५

१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव प्रुडेंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जून ते २१ जून १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनी ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तानवेस्ट इंडीज) तसेच श्रीलंकापूर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.

१९७५ प्रुडेंशियल चषक
१९७५-१९८३ दरम्यानचा प्रुडेंशियल चषक
दिनांक ७ – २१ जून १९७५
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान इंग्लंड ध्वज इंग्लंड
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१ वेळा)
सहभाग
सामने १५
प्रेक्षक संख्या १,५८,००० (१०,५३३ प्रति सामना)
सर्वात जास्त धावा न्यूझीलंड ग्लेन टर्नर (३३३)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया गॅरी गिलमोर (११)
(नंतर) १९७९

सामने पाढऱ्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.

प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडीजने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला. न्यू झीलंडच्या ग्लेन टर्नर याने सर्वाधिक धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर याने सर्वाधिक गडी बाद केले.

सहभागी देश

संपादन
देश/संघ पात्रतेचा मार्ग पूर्वीच्या विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
  इंग्लंड यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
  ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य पदार्पण पदार्पण पदार्पण
  भारत पदार्पण पदार्पण पदार्पण
  न्यूझीलंड पदार्पण पदार्पण पदार्पण
  पाकिस्तान पदार्पण पदार्पण पदार्पण
  वेस्ट इंडीज पदार्पण पदार्पण पदार्पण
  पूर्व आफ्रिका आयसीसी संलग्न सदस्य, आमंत्रित पदार्पण पदार्पण पदार्पण
  श्रीलंका पदार्पण पदार्पण पदार्पण

मैदान

संपादन
लंडन लंडन
लॉर्ड्स क्रिकेट मैदान द ओव्हल
प्रेक्षक क्षमता: ३०,००० प्रेक्षक क्षमता: २३,५००
   
बर्मिंगहॅम मँचेस्टर
एजबॅस्टन मैदान ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: २१,००० प्रेक्षक क्षमता: १९,०००
   
नॉटिंगहॅम लीड्स
ट्रेंट ब्रिज मैदान हेडिंग्ले मैदान
प्रेक्षक क्षमता: १५,३५० प्रेक्षक क्षमता: १४,०००
   

साखळी सामने

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  इंग्लंड १२ ४.९४४ बाद फेरीत बढती
  न्यूझीलंड ४.०७१
  भारत ३.२३७ स्पर्धेतून बाद
  पूर्व आफ्रिका १.९००

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

७ जून १९७५
धावफलक
इंग्लंड  
३३४/४ (६० षटके)
वि
  भारत
१३२/३ (६० षटके)



११ जून १९७५
धावफलक
पूर्व आफ्रिका  
१२० (५५.३ षटके)
वि
  भारत
१२३/० (२९.५ षटके)



संघ
खे वि गुण रनरेट पात्रता
  वेस्ट इंडीज १२ ४.३४६ बाद फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया ४.४३३
  पाकिस्तान ४.४५० स्पर्धेतून बाद
  श्रीलंका २.७७८

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद







बाद फेरी

संपादन


  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून -   लीड्स
   इंग्लंड ९३  
   ऑस्ट्रेलिया ९४/६  
 
२१ जून -   लॉर्ड्स
       ऑस्ट्रेलिया २७४
     वेस्ट इंडीज २९१/८
१८ जून -   ओव्हल
   न्यूझीलंड १५८
   वेस्ट इंडीज १५९/५  

उपांत्य फेरी

संपादन


अंतिम सामना

संपादन

अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता.


संघ मानांकन

संपादन

८ संघाना स्पर्धेत खेळलेल्या सामन्यातील विजयी सामन्यानुसार मानांकन देण्यात आले.

मा संघ G सा वि हा रके रदि रफ नेरर गुण
अंतिम सामना
  वेस्ट इंडीज ९९९ ९७६ +२३ २०
  ऑस्ट्रेलिया ११६६ १०६० +१०६ १२
उपांत्यफेरीत बाद
  इंग्लंड ९८३ ५०६ +४७७ १२
  न्यूझीलंड ८८६ ७८३ +१०३ १२
साखळी सामन्यात बाद
  पाकिस्तान ८०१ ६८२ +११९ +४.४५
  भारत ४८५ ६८७ -२०२ +३.२४
  श्रीलंका ५०० ७४५ -२४५ +२.७८
पूर्व आफ्रिका ३४२ ७२२ -३८० +१.९०

विक्रम

संपादन

फलंदाजी

संपादन

सर्वात जास्त धावा

  1. ग्लेन टर्नर (न्यु झीलंड) - ३३३
  2. डि.एल.अमिस्स (इंग्लंड) - २४३
  3. माजिद खाना (पाकिस्तान) - २०९

गोलंदाजी

संपादन

सर्वात जास्त बळी

  1. जी.जे.गिल्मोर (ऑस्ट्रेलिया) - ११
  2. के.डी.बॉय्स (वेस्ट इंडीज) - १०
  3. बी.डी.ज्युलियन (वेस्ट इंडीज) - १०

अधिक माहिती .. Archived 2006-09-26 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

संपादन