शिवाजी महाराज

मराठा साम्राज्याचे संस्थापक, प्रथम छत्रपती
(शिवाजीराजे भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[१] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.[२]

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
छत्रपती
Chatrapati Shivaji Maharaj.jpg
छत्रपती शिवाजी महाराज
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य
अधिकारकाळ जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
राजधानी रायगड किल्ला
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म फेब्रुवारी १९, १६३०
शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८०
रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)


आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.[३] शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.

प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघलआदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[४] भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.[५]

छत्रपती शिवाजी महाराजांचे हे चित्र लंडनच्या ब्रिटीश संग्रहालयातील आहे. ता. १६८०-१६८७

शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. [६] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.[७]

बालपण व सुरुवातीचा काळ

 
शिवनेरी किल्ला: शिवाजी महाराजांचे जन्मस्थान

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.[८] इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[९] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.[१०] एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.[११] शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.[१२]

शहाजीराजे भोसले हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले.आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली.[१३] शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला.[ संदर्भ हवा ] लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.[१४]

जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.[१५]

 
विजापूरच्या वस्तुसंग्रहालयातील चित्र.


मार्गदर्शकयुद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांचेकडून,[ संदर्भ हवा ] तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून[ संदर्भ हवा ] मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले.[ संदर्भ हवा ] शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.

पहिली स्वारी - तोरणगडावर विजय

इ.स. १६४७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले.[१६] त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.[१७] शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली.[१८] शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला.[ संदर्भ हवा ] बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.[ संदर्भ हवा ]


शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली.[ संदर्भ हवा ] त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.[ संदर्भ हवा ]

 
जिजाबाई व बाल शिवाजी

जावळी प्रकरण

आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे.[ संदर्भ हवा ] त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजी महाराजांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.[ संदर्भ हवा ]

पश्चिम घाटावर नियंत्रण

इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.[ संदर्भ हवा ]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अफझलखान प्रकरण

 
विजापूरचा सेनापती असलेल्या अफझलखानाशी लढताना शिवाजी महाराजांचे चित्र. चित्रकार: सावलाराम हळदणकर, तारीख: २० व्या शतकाच्या सुरुवातीची

आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला.हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. वाटेत खानाच्या सैन्याने तुळजापूर व विठ्ठल मंदीराची नासधूस केली.[१९] अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निःशस्त्र राहण्याचे ठरले.[२०]

शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना होती. एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती.[२१] शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.[२२] त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.[२३]

आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली.[२४] खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.[२०]

अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने[ संदर्भ हवा ] करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली[ संदर्भ हवा ] आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.

अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले.[ संदर्भ हवा ] स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.[ संदर्भ हवा ]

आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.[२५]

प्रतापगडाची लढाई

पहा प्रतापगडाची लढाई

कोल्हापूरची लढाई

पहा कोल्हापूरची लढाई

सिद्दी जौहरचे आक्रमण

अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते.[ संदर्भ हवा ] त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली.[ संदर्भ हवा ] काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले.[ संदर्भ हवा ] ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.[ संदर्भ हवा ]

पावनखिंडीतील लढाई

पहा पावनखिंडीतील लढाई

 
पावनखिंड स्मारक

पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.

शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.

शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.[२६]

पुरंदराचा तह

पहा पुरंदराचा तह

मोगल साम्राज्याशी संघर्ष

तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.[ संदर्भ हवा ]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शाहिस्तेखान प्रकरण

मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.[ संदर्भ हवा ] प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला.[ संदर्भ हवा ] शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.[ संदर्भ हवा ] शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.[ संदर्भ हवा ]

एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले.[ संदर्भ हवा ] महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली.[ संदर्भ हवा ]

अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला.[ संदर्भ हवा ] शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.[ संदर्भ हवा ]

सुरतेची पहिली लूट

इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.[२७]

लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[२८]

मिर्झाराजे जयसिंह प्रकरण

 
पुरंदरचा तह

इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले.[१२] त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.[२७]

आगऱ्याहून सुटका

इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे केले. ह्या सरदाराना शिवरायांनी लढाईमध्ये हरवले होते अशा सरदारांसोबत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला.[२९] या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

 
शिवाजीराजे दिल्ली दरबारात

शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते.[ संदर्भ हवा ] शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.[ संदर्भ हवा ]

आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले.[ संदर्भ हवा ] एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.[ संदर्भ हवा ]

यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.[ संदर्भ हवा ]

सर्वत्र विजयी घोडदौड

शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.[ संदर्भ हवा ]

राज्याभिषेक

 
राज्याभिषेक

शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवराय व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी मोठ्या प्रदेशावर स्वामित्व स्थापन केलेले आणि अपार धन मिळविले अहोते. त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल होते आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत होता. असे असले तरी सैद्धांतिकदृष्ट्या ते अजून राजे बनले नव्हते. मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते.आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते.[२०] राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.[३०]

ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते.[२३] त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.[२०]

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.[१२] शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.[१२] शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.[१२]

शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते[१२] आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता.[१२] सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.[३१]

६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.[ संदर्भ हवा ] तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.[ संदर्भ हवा ]


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दुसरा राज्याभिषेक

गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.[३२] अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.”[३३] त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.[३३] कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.[३४]

दक्षिण दिग्विजय

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या.[ संदर्भ हवा ] शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला.[ संदर्भ हवा ] त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.[ संदर्भ हवा ] तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते.[ संदर्भ हवा ] या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता.[ संदर्भ हवा ] त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता.[ संदर्भ हवा ]

शिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली.[ संदर्भ हवा ] गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.[ संदर्भ हवा ]

चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला.[ संदर्भ हवा ] त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना;[ संदर्भ हवा ] तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले.[ संदर्भ हवा ]

यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले.[ संदर्भ हवा ] व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : “परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा.”[ संदर्भ हवा ]

कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.[ संदर्भ हवा ]

 
सन १६८० मधील मराठी साम्राज्य

राज्यकारभार

अष्टप्रधान मंडळ

शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत.[३५][३६]

मराठी आणि संस्कृत भाषा प्रात्साहन व विकास

शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती. [३७]

धर्मविषयक धोरण

शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता[२८]. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले. [३८]

 
शिवरायांची राजमुद्रा

राजमुद्रा

राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला.[३९] या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"[४०] ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो.

जयंती

मुख्य लेख: शिव जयंती

इतिहास

भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.[ संदर्भ हवा ]

ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.[ संदर्भ हवा ]

तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.[ संदर्भ हवा ]

आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.[ संदर्भ हवा ] इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.[ संदर्भ हवा ] (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.).[ संदर्भ हवा ] अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.[ संदर्भ हवा ]

शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे.[ संदर्भ हवा ] जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली.[ संदर्भ हवा ] शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.[ संदर्भ हवा ] म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.[ संदर्भ हवा ]

 1. काशीबाई जाधव
 2. गुणवंतीबाई इंगळे
 3. पुतळाबाई पालकर
 4. लक्ष्मीबाई विचारे
 5. सईबाई निंबाळकर
 6. सकवारबाई गायकवाड
 7. सगुणाबाई शिंदे
 8. सोयराबाई मोहिते
 1. छत्रपती संभाजी भोसले
 2. छत्रपती राजारामराजे भोसले
 1. अंबिकाबाई महाडीक
 2. कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
 3. दीपाबाई
 4. राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
 5. राणूबाई पाटकर
 6. सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)
 • सुना/नातसुना
 1. अंबिकाबाई[ संदर्भ हवा ] (सती गेली)
 2. जानकीबाई[ संदर्भ हवा ]
 3. राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)[४४]
 4. संभाजीच्या पत्नी येसूबाई[ संदर्भ हवा ]
 5. राजसबाई[ संदर्भ हवा ] (पुत्र संभाजीची पत्नी)
 6. सगुणाबाई{ (संभाजीपुत्र शाहूची पत्नी) {संदर्भ हवा}}
 • नातवंडे
 1. संभाजीचा मुलगा - शाहू[ संदर्भ हवा ]
 2. ताराबाई-राजारामाची मुले - दुसरा शिवाजी[ संदर्भ हवा ]
 3. राजसबाईची मुले - दुसरा संभाजी[ संदर्भ हवा ]
 • पतवंडे
 1. ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला.[ संदर्भ हवा ]
 2. दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)

सण

शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १०० च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.[ संदर्भ हवा ]

भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.[ संदर्भ हवा ]

शिवाजी महाराज आणि चित्रपट

शिवाजीच्या जीवनावर अनेक चित्रपट निघाले; एक दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. भालजी पेंढारकरांनी शिवाजीच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढले; त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :

 • गनिमी कावा
 • छत्रपती शिवाजी
 • तान्हाजी द अनसंग हीरो
 • नेताजी पालकर
 • फत्तेशिकस्त
 • बहिर्जी नाईक
 • बाळ शिवाजी
 • भारत की खोज (हिंदी)
 • मराठी तितुका मेळवावा
 • मी शिवाजीराजे भोसले बॊलतोय
 • राजमाता जिजाऊ (दूरचित्रवाणी मालिका)
 • राजा शिवछत्रपती (दूरचित्रवाणी मालिका)
 • वीर शिवाजी (हिंदी वेब सीरीज)
 • शेर शिवराज है
 • सरसेनापती हंबीरराव
 • जय शिवाजी जय भवानी ( दूरचित्रवाणी मालिका)

हे सुद्धा पहा

संदर्भ

 1. ^ Saran, Renu (2018-04-28). Shree Chhatrapati Shivajee Maharaj: श्री छत्रपती शिवाजी महाराज. Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5278-971-9.
 2. ^ Pradhan, Gautam (2019-12-13). Lord of Royal Umbrella - Shivaji Trilogy Book II (इंग्रजी भाषेत). One Point Six Technology Pvt Ltd. ISBN 978-93-88942-77-5.
 3. ^ Savarkar, Vinayak Damodar (2021-01-19). Hindu-Padpadshahi (Prabhat Prakashan) (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-89982-12-1.
 4. ^ Pollock, Sheldon (2011-03-14). Forms of Knowledge in Early Modern Asia: Explorations in the Intellectual History of India and Tibet, 1500–1800 (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 978-0-8223-4904-4.
 5. ^ Wolpert, Stanley A. (1962). Tilak and Gokhale: Revolution and Reform in the Making of Modern India (इंग्रजी भाषेत). University of California Press.
 6. ^ KUBER, GIRISH (2021). RENAISSANCE STATE: the unwritten story of the making of maharashtra (English भाषेत). S.l.: HARPERCOLLINS INDIA. pp. ६९-७८. ISBN 978-93-90327-39-3. OCLC 1245346175.CS1 maint: unrecognized language (link)
 7. ^ "Shivaji Jayanti 2022: History, Significance, Celebrations, Wishes and More on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022". Jagranjosh.com. 2022-02-18. 2022-02-19 रोजी पाहिले.
 8. ^ Bharat Ki Garimammaye Nariyan (हिंदी भाषेत). Atmaram & Sons.
 9. ^ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर)
 10. ^ पहा Mohan Apte, Porag Mahajani, M. N. Vahia. Possible errors in historical dates: Error in correction from Julian to Gregorian Calendars.
 11. ^ Saran, Renu. Chatrapati Shivaji: The Great Indian Warrior (इंग्रजी भाषेत). Junior Diamond. ISBN 978-93-83990-12-2.
 12. ^ a b c d e f g Gordon, Stewart (2007-02-01). The Marathas 1600-1818 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-03316-9.
 13. ^ Gordon, Stewart (2007-02-01). The Marathas 1600-1818 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-03316-9.
 14. ^ Gordon, Stewart (2007-02-01). The Marathas 1600-1818 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-03316-9.
 15. ^ Archives, Maharashtra (India) Department of (1969). Marāthekālīna prasiddha vyaktīñel hastāk-harayukta paire.
 16. ^ Division, Publications. Yojana May 2021 (Marathi): A Development Monthly. Publications Division Ministry of Information & Broadcasting.
 17. ^ Mahajan, V. D (2000). India since 1526 (English भाषेत). New Delhi: S. Chand. p. 198. ISBN 978-81-219-1145-0. OCLC 956763986.CS1 maint: unrecognized language (link)
 18. ^ Kulkarni, A.R. "Maratha Policy Towards the Adil Shahi Kingdom". Bulletin of the Deccan College Research Institute,.CS1 maint: extra punctuation (link)
 19. ^ Richards, John F. (1993). The Mughal Empire (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-56603-2.
 20. ^ a b c d Sarkar, Jadunath (1920). Shivaji and his times. University of California Libraries. London, New York, Longmans, Green and co.
 21. ^ Dodwell, Henry Herbert (1928). The Cambridge History of India (इंग्रजी भाषेत). CUP Archive.
 22. ^ "Shivpratap Din : शिवरायांचा 'हा' प्रसंग आठवला, तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही". eSakal - Marathi Newspaper. 2022-02-26 रोजी पाहिले.
 23. ^ a b Sarkar, Jadunath (1920). Shivaji and his times. University of California Libraries. London, New York, Longmans, Green and co.
 24. ^ Dodwell, Henry Herbert (1928). The Cambridge History of India (इंग्रजी भाषेत). CUP Archive.
 25. ^ वैद्य, विनीत (2021-12-10). "Shivpratap Din 2021 : प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा, शिवप्रेमींना येण्यास बंदी घातल्यानं नारा". marathi.abplive.com. 2022-02-26 रोजी पाहिले.
 26. ^ DESAI, RANJEET (2014-01-01). PAVANKHIND. Mehta Publishing House.
 27. ^ a b Kulkarni, Prof A. R. (2008-07-01). The Marathas (इंग्रजी भाषेत). Diamond Publications. ISBN 978-81-8483-073-6.
 28. ^ a b Kulkarni, Prof A. R. (2008-07-01). Medieval Maratha Country (इंग्रजी भाषेत). Diamond Publications. ISBN 978-81-8483-072-9.
 29. ^ Gordon, Stewart (1994). Marathas, Marauders, and State Formation in Eighteenth-century India (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. p. 206. ISBN 978-0-19-563386-3.
 30. ^ Gordon, Stewart (1993). The New Cambridge history of India. II, 4, II, 4, (English भाषेत). Cambridge: Cambridge university press. ISBN 978-0-521-26883-7. OCLC 489626023.CS1 maint: unrecognized language (link)
 31. ^ शिवाजी अँड हिज टाईम्स, लेखक जदुनाथ सरकार, प्रकाशक लाँगमन्स, ग्रीन अँड कं., दुसरी आवृत्ती, १९२०
 32. ^ देशपांडे, प्रल्हाद नरहर (2007). छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
 33. ^ a b देशपांडे, प्रल्हाद नरहर (2007). छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
 34. ^ छत्रपती शिवाजी महाराज, लेखक डॉ. प्र. न. देशपांडे, प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, द्वितीयावृत्ती, जुलै २००७.
 35. ^ "Ashta Pradhan | Marathi council | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-03 रोजी पाहिले.
 36. ^ Mahajan, V. D (2000). India since 1526 (English भाषेत). New Delhi: S. Chand. pp. २०३. ISBN 978-81-219-1145-0. OCLC 956763986.CS1 maint: unrecognized language (link)
 37. ^ Pollock, Sheldon (2011-03-14). Forms of Knowledge in Early Modern Asia: Explorations in the Intellectual History of India and Tibet, 1500–1800 (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 978-0-8223-4904-4.
 38. ^ Gordon, Stewart (2007-02-01). The Marathas 1600-1818 (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 978-0-521-03316-9.
 39. ^ Pollock, Sheldon (2011-03-14). Forms of Knowledge in Early Modern Asia: Explorations in the Intellectual History of India and Tibet, 1500–1800 (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 978-0-8223-4904-4.
 40. ^ Gaikwad, Dr Hemantraje (2020-01-01). Shivaji Maharaj The Greatest (Prabhat Prakashan) (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5322-262-8.
 41. ^ Desai, Ranjit (2017-12-15). Shivaji: The Great Maratha (इंग्रजी भाषेत). Harper Collins. ISBN 978-93-5277-440-1.
 42. ^ Bhaskaran, Medha Deshmukh (2021-07-05). The Life and Death of Sambhaji (इंग्रजी भाषेत). Penguin Random House India Private Limited. ISBN 978-93-5492-029-5.
 43. ^ "Shivaji Maharaj: List of Queens and Sons/Daughters | Veer Shivaji". India Forums (इंग्रजी भाषेत). 2022-02-23 रोजी पाहिले.
 44. ^ Godbole, Tanika (2018-03-13). "Rani Tarabai - A Formidable Maratha Warrior | #IndianWomenInHistory". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2022-02-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे