देशमुख
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
देशमुख हे मराठी आडनाव आहे.
- 'देशमुख' हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत.
ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख हि पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक' चे समकक्ष आहे.
- 'देशमुख' पदवी वा 'देशमुखी' हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जाती चे संदर्भात नसून ,इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी , हिंदू मधील.
मराठा, ब्राह्मण यासह इतर जाती तसेच, मुस्लिम व जैन धर्मातील कुटुंबाना ' देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते.
♦'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत.गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी.लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे,शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत.
- 'देशमुख' पदवी प्राप्त कुटुंबाकडे ,अधिकार क्षेत्रा पासून महसुल प्राप्त करणे या सोबतच, अधिकार क्षेत्रात वा परगण्यात मूलभूत सेवा व सुव्यवस्था राखणे
हि जबाबदारी असे. या कारणास्तव, देशमुख चा स्वैर अनुवाद 'देशभक्त' ('loosely translated as' Patriot ') असा हि होतो व या नावा विषयी अद्याप हि समाजात आदर आहे .
- 'देशमुख' हे परागण्यातील सर्व जमाबंदीचा हिशोब ठेवीत आणि वसुलीवर देखरेख ठेवीत. यांच्याजवळ थोडीफार शिबंदी (सैन्य) असे आणि त्या लष्करी बळावर
गढ्या, कोट बांधून त्यांत ते वास्तव्य करीत व आसपासच्या मुलाखात दंडेलगिरी करीत किंवा मध्यवर्ती सत्ता दुर्बळ असल्यास प्रदेशविस्तारही करीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशमुखांना काबूत आणण्यासाठी काहींची वतने काढून घेतली, तर काहींशी समझोता करून त्यांना आपल्या स्वराज्याच्या कार्यात सामावून घेतले. अनेक देशमुखांच्या वरचा अधिकारी तो सरदेशमुख.
- देशमुखांचा शासकीय शेतसाऱ्यावर दोन ते पाच टक्क्यांपर्यंत हक्क असे. कुठेकुठे धान्यावरही यांचा तीन टक्के व रोख रकमेवर सात टक्के हक्क असे.
याशिवाय त्यांना इनामी जमिनी असत. हे काम करणारी काही माणसे आपल्या आडनावाला देशमुख हा शब्द जोडत. ब्रिटिशांच्या राजवटीत देशमुखी संपली आणि देशमुख आणि सरदेशमुख हे शब्द फक्त आडनावांत राहिले.
- निजाम राज्यात मात्र १९४८ पर्यंत देशमुख वतने अस्तित्वात होती.
देशमुख आडनावाच्या काही प्रसिद्ध मराठी व्यक्तीसंपादन करा
- बाबालाल साहेबराव काकडे देशमुख ( सहकारमहर्षी )
- मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांनी सहकार क्षेत्राची पायाभरणी केली
- संभाजीराव काकडे देशमुख ( माजी खासदार)
- गोपाळ हरी देशमुख - समाजसेवक.
- चिंतामणराव देशमुख - भारताचे माजी अर्थमंत्री.
- दुर्गाबाई देशमुख - चिंतामणराव देशमुख यांच्या पत्नी व स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या.
- नारायणराव कडू देशमुख- ज्येष्ठ समाजसेवक तथा अमरावती कडून महाविदर्भ परिषद प्रतिनिधी
- बॅ. रामराव देशमुख-अमरावती. इग्रज राजवटीत 'महाविदर्भ सभा' या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नंतर महाराष्ट्र-वादी वैदर्भीय नेते.
- नानाजी देशमुख - समाजसेवक. संस्थापक भारतीय जन संघ. खासदार (भाजप).
- पंजाबराव देशमुख - भाऊसाहेब म्हणून प्रसिद्ध असलेले पंजाबराव शामराव देशमुख एक समाज सुधारक ,राजकारणी आणि भारतातील शेतकऱ्यांचे नेते होते.इ.स. १९३६(?)च्या निवडणुकीनंतर शिक्षणमंत्री, स्वतंत्र भारतात पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री.
- विलासराव देशमुख - राजकारणी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
- उदय सिंह देशमुख- भैय्यू महाराज व गुरुदेव म्हणून ओळखले जाणारे उदय सिंह देशमुख (29 एप्रिल 1968 जन्म), संस्थापक , श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर, एक अध्यात्मिक गुरु .
- भाई गणपतराव देशमुख - (सांगोला) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, हे तब्बल ५० वर्षे पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत, ते १९६२ पासून विधानसभेवर निवडून येत आहेत.
- शिवाजीराव देशमुख - (शिराळा) विधान परिषदेच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख
- डॉ. के. जी. देशमुख - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती चे प्रथम कुलगुरू .
- बी.जी. देशमुख - भालचंद्र गोपाळ देशमुख- माजी केंद्रीय सचिव तथा जनवाणी या स्वंयसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
- श्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख - दिवंगत मराठी राजकारणी
- रितेश देशमुख - हिंदी चित्रपटांतील अभिनेता (महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांचा पुत्र).
- वत्सला देशमुख - मराठी अभिनेत्या.
- शांताराम द्वारकानाथ देशमुख - मराठी लेखक.
- सदानंद देशमुख - मराठी लेखक.
- रंजना देशमुख (जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - मार्च ३, इ.स. २०००; मुंबई, महाराष्ट्र) - लोकप्रिय मराठी अभिनेत्री .
- सीमा देशमुख - मराठी अभिनेत्या.
- सुभाष सुरेशचंद्र देशमुख - मराठी राजकारणी.
- स्नेहलता देशमुख - मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू
- कुणाल देशमुख - एक भारतीय फ़िल्म निर्माता
- महेश तानाजी ताटे-देशमुख -एक शेतकरी मुलगा आहे.
- श्रीमंत प्रथमेश निगडे देशमुख-प्रसिद्ध पर्यावरण आभियंता.