भारतीय आडनावे

भारतातील आडनावे
(आडनावे (भारतीय) या पानावरून पुनर्निर्देशित)

कुटुंब नाव किंवा आडनाव हे कुटुंब , घराणे, अथवा मूळ गाव यांचे निदर्शक उपनाम म्हणून वापरले जाते. एकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळत असल्यामुळे निश्चितपणे ओळखता यावे, म्हणून त्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक नावाबरोबर अधिक नावे जोडण्याची प्रथा पडली असावी. वैयक्तिक नावालाच पाळण्यातले नाव किंवा ख्रिश्चन नेम असे म्हणतात.

सूर्यवंश व चंद्रवंश या दोन वंशातील संकरामधून सोमवंशाची निर्मिती झाली. सूर्यवंशाच्या मुख्य दोन उपशाखा झाल्या, एक नागवंश दुसरी अग्निवंश. नागवंशाच्या दोन, तर अग्निवंशाच्या पाच शाखा झाल्या. चंद्रवंशाच्या सत्तावीस शाखा झाल्या. पैकी सोमवंश ही एक शाखा. वंशाच्या नावावरून काही आडनावे निघाली.

भारतातील नावे आणि आडनावे ही वेगवेगळ्या पद्धतींवर आधारित आहेत. जात, धर्म, भाषा आणि प्रदेश अशा गोष्टींनुसार नावे आणि आडनावे बदलतात. उदाहरणार्थ: उत्तर भारतात आडनावे वापरली जातात तर दक्षिण भारतात (तमिळनाडू, केरळ) बरेचसे लोक आडनावे वापरत नाहीत, त्याऐवजी वडिलांचे नाव किंवा त्या नावाचे आद्याक्षर जोडतात, आणि तेही स्वतःच्या वैयक्तिक नावाआधी. उदा० एन.गोपालस्वामी अय्यंगार. यातले एन. म्हणजे नरसिंह, गोपालस्वामींच्या वडिलांचे नाव.

अनेक भारतीयांचे जन्मनाव त्यांच्या अधिकृत नावापेक्षा वेगळे असते. जन्मनाव अनेकदा ज्योतिषशास्त्रानुसार ठेवले जाते. जेथे आडनावे वापरात नाहीत अशा ठिकाणी तिसरे नाव म्हणून आजोबा/आजीचे नाव किंवा गावाचे नाव वापरण्याचा संकेत आहे. ज्या ठिकाणी समाजवादी विचारांचा प्रभाव आहे अशा ठिकाणी समाजवादी नेत्यांची किंवा रशियातील नावे वापरण्याचीही पद्धत आहे. उदाहरण: स्टॅलिन (तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांचे पुत्र), लोलिता, गोगोल.

भारतीय आडनावांमध्ये अनेकदा काही सूत्र असते. ग्रामनामावरून पडलेल्या मराठी आडनावांच्या शेवटी ’कर’ हा प्रत्यय असतो. वाल्हेकर, मुळगावकर, माडखोलकर, पुणेकर,तोडकर, माहीमकर ही त्याची उदाहरणे. जर त्या मराठी माणसाचे मूळ तेलंगणातले असेल तर ’कर’ऐवजी ’वार’ हा प्रत्यय असतो. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, फुलकुंठवार, बोजेवार, मुनगंटीवार, हमपल्लीवार वगैरे. उत्तरी भारतात ’वार’ऐवजी ’वाल’असते. आगरवाल, बकलीवाल, धारीवाल इ.इ. धंद्यावरून किंवा गावांवरून ठेवली जाणारी बोहरी आणि पारशी आडनावे - कोलंबोवाला, दारूवाला, नडियादवाला, ताडीवाला, बाटलीवाला वगैरे.

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

 • आंटिया
 • कनोजिया
 • कांकरिया
 • कापडिया
 • कुटमुटिया
 • कोडिया
 • चोरडिया
 • छाब्रिया
 • झकेरिया
 • झाझरिया
 • डालमिया
 • डिया
 • देढिया
 • दोडिया
 • फिरोदिया
 • बगाडिया
 • बोखारिया
 • भांखरिया
 • भाटिया
 • मारडिया
 • मोठवाडिया
 • रुईया
 • रेशमिया
 • लोहिया
 • वाडिया
 • सिंघानिया
 • सिसोदिया
 • सुरपुरिया, वगैरे वगैरे.

भारताच्या पूर्व भागातील नावेसंपादन करा

पश्चिमी भारतातील नावेसंपादन करा

महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नामकरण पद्धतीमध्ये मधले नाव वडिलांचे किंवा पतीचे असते. उदाहारण : सचिन रमेश तेंडुलकर या क्रिकेटपटूच्या नावातील पहिले नाव "सचिन", मधले नाव "रमेश" हे वडिलांचे नाव तर "तेंडुलकर" हे आडनाव आहे.

स्त्रिया लग्नानंतर परंपरेनुसार पतीचे नाव व आडनाव वापरतात. महाराष्ट्रात नातवाला आजोबांचे नाव देण्याची पद्धत एकेकाळी होती. गुजरातमध्ये नावानंतर भाई (पुरुषांसाठी) किंवा बेन (स्त्रियांसाठी) लावण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात काही समाजांत पुरुषांच्या नावांना राव तर स्त्रियांच्या नावांनंतर बाई/ताई लावले जाते.

मराठीतील ’कर’ने शेवट होणारी आडनावे गावांच्या नावावरून पडली आहेत. माडगुळकर (माडगुळ गावावरून, वेंगसरकर, गावसकर, बांदेकर वगैरे.) बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : पाटील, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, देशमुख, सुतार, वाणी ही नावे, ती माणसे एकेकाळी करत असलेल्या व्यवसायावरून किंवा गावातील पदावरून पडली आहेत, तर शिंदे, जाधव, भोसले, कांबळे या नावांच्या उत्पत्त्या भिन्नभिन्न आहेत.

गुजरातमधील काही पारशी आडनावे "वाला"-अंती असतात. ती गावावरून किंवा व्यवसायावरून पडलेली आहेत. अहमदाबादवाला, खंबातवाला, गांजावाला, दारूवाला, नडियादवाला, मेहवाला, मेहसाणावाला, लकडावाला, लंडनवाला, सोडावाॅटरबाॅटलओपनरवाला, सोडावाला, वगैरे. बाकीची नेहेमी आढळणारी आडनावे : मेहता, पटेल, शाह, देसाई, पारेख वगैरे. यांतलीही काही व्यवसायावरून पडली आहेत. गावावरून पडलेली आणखी आडनावे, भरूचा, सुरतिया, सुरती

यांशिवाय कनोजिया, कांकरिया, कापडिया यांसारखी काही 'या'कारान्त आडनावे असतात. त्यांची यादी एका स्वतंत्र लेखात केली आहे.

'नी'कारान्त किंवा 'णी'कारान्त आडनावेसंपादन करा

नीकारान्त व णीकारान्त आडनावे बहुधा सिंधी लोकांची असतात, तशी ती काही गुजराथी-मारवाड्य़ांचीही असतात. 'वाणी' या सारखे एखादेच नाव मराठी असते. अशी काही आडनावे :-
अखानी, अडानी, अंबानी, अलानी, आंबलानी. आमलानी, गंगवानी, घेलानी, चटवानी, चांदवानी, जानी, बडयानी, बडीयानी, बिमाणी, बुंदियानी, भायानी, भीमजयानी, भूपतानी, भोजानी, मेघाणी, रूपाणी, लाखाणी, शहानी, वगैरे

सिंधी आडनावेसंपादन करा

अजवाणी, कर्णमलानी, केवलरामाणी, गिडवाणी, चंडीरामाणी, जगतियानी, गुरसियानी, पुर्सनानी, बुटाणी, भगतानी, भटियानी, भवनानी, भोजवानी, मतलानी, मीरचंदानी, मोटवानी, रामाणी, वासवानी, हरियाणी, हिंगोराणी

महाराष्ट्रातील मराठी आडनावांइतकी विविधता जगात इतरत्र क्वचितच आढळेल. त्या आडनावांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

गावावरून किंवा प्रदेशावरूनसंपादन करा

उदा० अकोले गावावरून अकोलकर, अडगुलवरून अडगुलवार, आरोंदे गावावरून आरोंदेकर, आष्टनकर, इंगळहळ्ळीकर, गुजराथी, गुमगावकर, तावशी गावारुन तावसकर, गोंदवले गावावरून गोंदवलेकर, निवळी गावावरून निवळीकर, तासगाववरून तासगावकर पंजाबी, पारे गावावरून पारेकर, मारवाडी, रेवणवरून रेवणवार, वाल्हे गावावरून वाल्हेकर, वगैरे.

निसर्गातील एखाद्या स्थलविशेषावरूनसंपादन करा

ओढे, खोरे, डोंगरे, ढगे, दरेकर, पर्वते, समुद्रे, वगैरे

प्राण्यावरून किंवा पक्ष्यावरूनसंपादन करा

कावळे, कोकीळ, कोळी, कोल्हे, गरुड, गाढवे, घारे, घोडावत (राजस्थानी आडनाव), घोडे, घोडके, घोडचौरे, चोचे, चोरघोडे, डुकरे, ढोक, तरस, तितीरमारे, नाग, पाखरे, पाल (बंगाली आडनाव), पिसे, पोपट, पोळ, बकरे, बोकड, बोके, मांजरे, मुंगी, मोरे, रानबोके, लांडगे, वाघ, वाघमारे, वाघे, शेळके, सरडे, मुंगुसमारे, वगैरे.

शरीराच्या अवयवावरूनसंपादन करा

 • डोके
 • दंडगे
 • दंडवते
 • दहातोंडे
 • पायगुडे
 • पायमोडे
 • बाराहाते
 • लांबकाने
 • मानकापे
 • शिरसाठ
 • डोईफोडे

भाज्यांच्या किंवा फळांच्या नावावरूनसंपादन करा

आंबेकर, आवळे, कणसे, काकडे, केळकर, चिंचोरे, गाजरे, नारळीकर, पडवळ, फणसे, भेंडे, भोपळे, मुळे, वांगीकर, वगैरे.

पूर्वजांच्या व्यवसायावरूनसंपादन करा

कुलकर्णी, कुळकर्णी, कोळी, गुरव, देशपांडे, देशमुख, पाटील, लोहारे, लोहोकरे, वाणी, शिंपी, सुतार, सोनार, सोनी (गुजराथी)

फार्सी धातू नविश्तन्‌ लागून होणारी आडनावेसंपादन करा

कापडणवीस, कारखानीस, कोटणीस, खासनीस, चिटणीस, जमेनीस, तटणीस, पागनीस, पारसनीस, पोतनीस, फडणीस, फडणवीस, वाकनीस, हसबनीस

वस्तूवरूनसंपादन करा

ताटे, नरसाळे, पाटे, पोटे, लाटे, लोटे,

मुस्लिम संस्कृतीतून आलेली नावे/आडनावेसंपादन करा

आबाजी, पागे, पेशवे, बाजीराव, बाबूराव, मिराशी, मुकादम, मुतालीक, मोगल, वकील, शहाजी

संपादन करा

अंकलीकर, अकोलकर, अग्निहोत्री, अडगुलवार, अडसुळे, अडागळे, अंधारे, अधिकारी, अवचट, अनासुने, अलगर, अलुरे, अहिरे, आकाणगिरे, औरादे,

संपादन करा

अंकोलीकर, अहिरे, आगरकर, आगलावे, आजगावकर, आठवले, आडवे, आडे, आडेकर, आदमाने, आपटे, आंबटकर, आंबले, आंबिले, आंबेकर, आंबेडकर, आमनेरकर, आमरे, आमले, आयतनबोयणे, आयरेकर, आरोंदेकर, आर्वी, आवटे, आवळे, आव्हाड, आष्टनकर, आष्टे, औदुंबरे, आडसुळे

इ/उ/ए/ओसंपादन करा

इंगळहळ्ळीकर, इंगळे, इंगोले, इटकर, इचके, इचलकरंजीकर, इटनारे, इरुळे, उशिरे, उशीर, उसरे, ऊटे, एकबोटे, ओगले, ओतूरकर

संपादन करा

कचरे, कड, कडलाक, कडू, कदम, कन्नाके, कपाळे, कमलाकर, करकंडे, करकरे, करंगळे, करडे, करणवाड, करपे, करमरकर, करमे, करवंदे, कराडकर, करे, कर्डीले, कर्डीवाळ, कर्वे, कलंबेते, कलावंते, कल्याणकर, कल्याणी, कवाद, काकड, काकडे, काजळे, कांडलकर, काण्णव, कातोते, काथवटे, कांदळकर, कानडे, कानफाडे, कानविंदे, कानिटकर, कापडी, कापसे, काबरे, कांबळे, कामत, कामाने, कामारकर, कामेरकर, कारखानीस, कारुळकर, कारेकर, कालकुंद्रीकर, कालगुडे, काशीकर, कासले, काळे, काळेल, काळेले, किर्लोस्कर, कीर्तनकार, कीर्तने, कीर्तिकर, कुनशेट्टे, कुमदाळे, कुमावत, कुरसंगेˌ कुर्लेकर, कुलकर्णी, कुलुपे, कुलथे, कुलसंगेˌ केकडे, केंद्रे, केरकर, केरूळकर, केसकर, केळकर, कोकाटे, कोचे, कोटलवार, कोठारे, कोडगिरवार, कोडीतकर, कोतवाल, कोथिंबिरे, कोद्रे, कोयाळकर, कोरडे, कोरगावकर, कोरे, कोलटक्के, कोविंद, कोहोजकर, कोळी, काेळेकर,

संपादन करा

खडक, खडके, खड्ये, खतगांवकर, खत्री, खंदारे, खरसाडे, खरसुंडीकर, खराटे, खराडे, खरात, खरे, खरोले, खर्चे, खलबते, खवस, खळे, खाटमोडे, खांडगे, खांडरे, खाडिलकर, खाडे, खांडेकर, खांडे(भराड), खाड्ये, खांदवे, खानवलकर, खानविलकर, खानापूरकर, खानोलकर, खापरे, खांबल, खांबे, खांबेटे, खामकर, खिलारी, खिलारे, खुजे, खुटवड, खुटे, खुडे, खुतारकार, खेटे, खेसे, खैरनार, खैरमोडे, खैरे, खोगरे, खोचरे, खोटे, खोत, खोपडे, खोरे, खोले, खोसे,

संपादन करा

गजेंद्रगडकर, गडकर, गडकरी, गणगोत्रे, गंदगे, गद्रे, गबाळे, गरुड, गर्जे, गवस, गवळी, गवाणकर, गव्हाणे, गांगणे, गांगर्डे, गांगुर्डे, गांगुली, गाजरे, गांजावाला, गाडगीळ, गाडे (पाटील), गाढवे, गाढे, गांधी, गायकवाड, गायतोंडे, गावडे, गावणकर, गावसकर, गिते, गिलबिले, गुजर, गुप्‍ते, गुरव, गुलगुले, गेजगे, गोखले, गोजमे, गोटे, गोडसे, गोते, गोंदकर, गोन्साल्वीस, गोरुले, गोरे, गोवारीकर, गोवित्रीकर, गोवेकर, गोसावी, गोस्वामी, गोळे,

संपादन करा

घडशी, घरवाडे, घाटगे, घाटे, घाडगे, घायवट, घावडे, घुगे, घुर्ये, घुले, घेगडे, घेगडेधार, घेवडे, घोगरे, घोडके, घोडे, घोडचौरे, घोडमारे, घोडेले, घोरपडे, घोलप, घोलम,

संपादन करा

चंद्रचूड, चंद्रवंशी, चंद्रात्रे, चंद्रात्रेय, चनशेट्टी, चमकेरी, चरपे, चवरे, चव्हाण, चव्हाणके, चांगले, चाटे, चांदगुडे, चांदे, चांदोरकर, चांदोलकर, चापेकर, चाफे, चाफेकर, चिकटे, चिकणे, चिंचुलकर, चिंचोळकर, चिटको, चिटणीस, चितळे, चिंतामणी, चित्रे, चिंदरकर, चिपळूणकर, चोडणकर, चोपे, चौगुले, चौधरी, चौरे,चोरगे

संपादन करा

छत्रे, छप्परवाल, छापीकर

संपादन करा

जगताप, जगदाळे, जंगम, जंगले, जटाळ, जमदाडे, जमाले, जय, जयकर, जवळकर, जांगळे, जागुष्टे, जाधव, जांभळे, जामठे, जामनिक, जायभाये, जावकर, जिचकर, जुगदार, जुगारे, जेवारे, जोगवे, जोगळे, जोंधळे, जोशी,

संपादन करा

झगेकार, झरे, झरेकर, झाडगावकर, झाडे, झारापकर, झेंडे, झेंडेकर, झोपे,

ट,ठसंपादन करा

टकले, टिळक, टिळेकर, टेकवडे, टेंगळे, टेंबे, टोपले, टोंपे, ठोंगे, ठोंबरे, ठोसर,

संपादन करा

डक, डख, डफळ, डफळे, डली, डाकी, डिंबळे, डोके, डोंगरे, डोंगळे, डोपे

संपादन करा

ढगे, ढंभेरे, ढमढेरे, ढमाले, ढवळे, ढाकणे, ढोबळे

संपादन करा

तत्तपुरे, तनपुरे, तळपदे, तळेकर, तळेले, ताकवले, ताकसांडे, ताटे, तांदळे, तापकीर, तांबे, ताम्हाणे, तायडे, तारमळे, तारोळकर, तावडे, तावसकर, तितीरमारे, तुपे, तुळसकर, तेंडुलकर, तेलंगी, तेलंगे, तोकडे, तोडणकर, तोडकर, तोडकरी, तिङके,

संपादन करा

दळवी, दांडिमे, दाढे, दाभोलकर, दारकुंडे, दास, दासगुप्ता, दासरे, दासोपार्थ, दिवटे, दिवे, देवकर, देवकाते, देवरे, देशखैरे, देशपांडे, देशमाने, देशमुख, देसाई, देसले (भोसले चा अपभ्रंश देसले.म्हणून दोघेही एकच आहेत), दोरवे, द्रविड, .

संपादन करा

धात्रक, धामणकर, धायगुडे, धारवाडकर, धिंगाणे, धिंग्रा,

संपादन करा

नखरे, नखाते, नगरनाईक, नजरबागवाले, नरवडे, नरवटे, नरवाडे, नरसाळे, नलशेट्टे, नलावडे, नवले, नाईक, नागरे, नाखरे, नागदेवे, नागमोते, नागवडे, नागवे, नागपुरे, नागपूरकर, नागभुजांगे, नागमोडे, नाडागुडे, नागिमे, नारंगे, नाडकर्णी, नाणेकर, नातू, नांदरे, नांदूरकर, नाबडे, नामवाड, नायक, नारकर, नारळे, नारळीकर, नारोळे, नालुगडे, नावकर, नासरे, नाळे, निकम, निगडे, निचले, निंबाळकर, निपाणे, निंभोरकर, निमकर, निवंगुणे, निवळीकर, नुपनर, नेने, नेमाडे, नेमाणे, नेरूरकर, नेवसे, नेवे, नेवेवाणी, नेसनतकर,

संपादन करा

पवित्रकार, पगारे, पंचनदीकर, पंचपोर, पटवर्धन, पडवळ, पंडित, पतके, परंडे, परते, परदेशी, परब, परमार, परांजपे, परांजप्ये, पराड, परांडे, पवार, पागडे, पांगारकर, पाचपोर, पाचर्णे, पाचोरे, पाटकर, पाटणकर, पाटील, पाटोऴे, पाठक, पांडे, पाताडे, पानतावणे, पायगुडे, पारकर, पारखी, पारखे, पारगावकर, पारधे, पार्टे, पारेकर, पालेकर, पावगी, पाष्टे, पिटले, पिट्टालवाड, पितळे, पिसाळ, पिळगावकर, पिळणकर, पुजारी, पुडके, पुरकर, पुरोहित, पुसाळकर, पुळेकर, पेठे, पेडणेकर, पेंडसे, पेंढारकर, पेशवे, पोटदुखे, पोटे, पोतदार, पोतनीस, पोरजे, पोरंपाजे, पोरवाल, पोवार, पोळ, पौंडकर, प्रभुदेसाई, प्रभू, पोटले

संपादन करा

फड, फडके, फडतरे, फरगडे, फाकले, फाटक, फाटे, फावरे, फुगे, फुटाणे, फुलझेले, फुलपगार, फुलपगारे, फुलमाळी, फुलसुंदर, फुले, फुलगामे, फुल्लारी,

संपादन करा

बंकटवाड, बगडाने, बगाटे, बगे, बच्चे, बडगर, बनकर, बनसोडे, बर्वे, बऱ्हे, बच्छाव, बागगावकर, बागल, बागवान, बागवे, बागोरे, बाजड, बांदल, बापट, बाबर, बामणे, बारटक्के, बारवे, बारात, बालकवडे, बाळफाटक, बांदोडकर, बारस्कर, बाहेकर, बिडवे, बिबीकर, बिराजदार, बिरादार, बुधे, बूसाठे, बेडगे, बेंडभर, बेलदार(कुमावत), बेंद्रे, बेर्डे, बेलसरे, बैताडे, बोके, बोडनासे, बोंडाळे. बोबडे, बोरकर, बोरगावकर, बोरसे, बाेराडे, बोईनवाड, बोयणे, बोडके, बोरसुळे, बोरा, बोराडे, बोरे,

संपादन करा

भट, भंडारे, भोईर,भंडारी, भंडे, भदाणे, भाटकर, भाटवडेकर, भांडारकर, भांडे, भामरे, भालके, भालेकर, भालेराव, भिकाणे, भिंगे, भिडे, भिंडे, भिसे, भुजबळ, भेगडे, भेले, भोकरे, भोगले, भोते, भोपळे, भोमकर, भोर, भोले, भोसले, भोळे, .

संपादन करा

मठपती, मढवी, मते, मंथाले, मयेकर, मराठे, मरे, मर्के, मलंगे, मसुरकर, मसुरेकर, मस्के, महत्रू, महागावकर, महाजन, महाडिक, महामुनी, महालनोबीस, महेंद्रकर, माटे, मांगले, मांजरे, मांजरेकर, माडीवाले, मातुरे, मातोंडकर, मानगांवकर, माने, मापुस्कर, मारणे, मालवणकर, मालशेटवार, मा(हि)हीमकर, मिंडे, मिरजकर, मिरासदार, मिसाळ, मिस्त्री, मुंडे, मुजुमदार, मुद्दामे, मुरकुटे, मुसमाडे, मुसळे, मुसांडे, मुळे, मुळ्ये, मेकरे, मेंगशेट्टे, मेटे, मेश्राम, मेस्त्री, मेहेंदळे, मोकल, मोटे, मोडक, मोने, मोरे, मोहरीर, मोहरील, मोहिते, मोहोड, मोहोळकर, म्हलाने, म्हापणकर, म्हात्रे, म्हेत्रे,

संपादन करा

यड्रावकर, यवतकर, यज्ञोपवीत, यादव, येरावार, येवले, येवलेकर,

संपादन करा

रणबागले, रतनाळीकर, रत्‍नपारखी, रसम, रसाळ, रहाणे, रहिराशी, राऊत, रांगणेकर, राखुंडे, राचमले, रांजणे, राजवाडे, राजिवडे, राजे, राठोड, राणे, रानडे, रानबोके, राने, राव, रावकर, रायते, रावते, राहंगडाले, राहते, रिकामे, रिसबूड, रेगे, रेणावीकर, रेवणकर, रेवणवार, रेवणशेट्टे

संपादन करा

लगडपाटील, लाखे, लागू, लाड, लाले, लिमये, लेले, लोखंडे, लोटलीकर, लोंढे, लोणारे, लोहारे

संपादन करा

वकटे, वंजारे, वझे, वरटकर, वडाभाते, वर्तक, वस्त्रे. वाकडे, वाजे, वाघ, वाघधरे, वाघमारे, वाघमोडे, वाघे, वाटकर, वाटवे, वाटेकर, वाठोरे, वाडकर, वाडेकर, वाणी, वानखडे, वानखेडे, वायंगणकर, वासे, वाल्हेकर, वाळवे, विचारे, विंझे, विटेकर, विद्वांस, वेंगुर्लेकर, वैद्य, व्हरे,

संपादन करा

शंभरकर, शर्मा, शहाणे, शिंगाडे, शिंदे, शिरवाडकर, शिरोडकर, शिर्के, शिवडे, शेख, शेट्ये, शेडगे, शेंडल, शेळके, शेटलवार, शेट्टी, शेलार,

संपादन करा

सकपाळ, सकस, सकारकर, संगमनेरे, सगर, संद्यांशी, सपकाळ, सप्रे, सय्यद, सरगर, सरपाते, सरंजामे, सरडे, सरदेशपांडे, सरनाईक, सरवदे, सरोदे, सव्वासे, सहस्रबुद्धे, सांगले, साटम, साठे, साडविलकर, सातपुते, सातारकर, सानप, साने, साप्‍ते, साबडे, साबळे, सामंत, सार्डिवाल, साव, सावंत, सावदेकर, सावरकर, सावर्डेकर, सावळेकर, सावे, सासवडकर, साळगावकर, साळवी, साळवे, साळसकर, साळुंखे, सुखटणकर, सुरपाटणे, सुरवसे, सुर्यवंशी, सुर्वे, सूर्यवंशी, सोंगटे, सोंदनकर, सोनकांबळे, सोनटक्के, सोनवणे, सोनार, सोनारकर, सोनावणे, सोनावळे, सोपारकर, सोमदे, सोलनकर, सोवनी, सोहोनी, सौदागर, स्वामी, सलगरे,

संपादन करा

हगवणे, हंचाटे, हणमंते, हतांगळे, हरदास, हरावत, हरिनखेडे, हर्डीकर, हागे, हाळे, हिंगमिरे, हिंगे, हिप्परकर, हिरे, हिवाळे, हुमन, हुमने, हुलवळे, हेरे, होगे, होन, होनकळसे, होनावळे, होनाळे, होनराव, होळकर,

क्षसंपादन करा

क्षीरसागर


मराठी आडनावांत ओकारान्त, याकारान्त आडनावे असतात, तशीच ’जे’कारान्त, ‘डे’कारान्त, 'बे'कारान्त, आणि 'भे'कारान्त आडनावेही असतात. अशी काही आडनावे :-

जेकारान्तसंपादन करा

 • ताटपुजे
 • नागरगोजे
 • पोरजे
 • पोरंपाजे

डेकारान्तसंपादन करा

अरगडे, अलगडे, आडे, आंबवडे, आंबाडे, उंडे, उराडे, कदमबांडे, करडे, करंडे, काकडे, कातुर्डे, कानडे, कानफाडे, कारंडे, कासारखेडे(कर), काळगुडे, केकडे, कोरडे, खाटमोडे, खाडे, खांडे(कर), खांडे(भराड), खुडे, खोडे, खोतलांडे, खोपडे, खोब्रागडे, खोलंगडे, गराडे, गवांडे, गांगुर्डे, गाडे(कर), गायतोंडे, गावडे, गावंडे, गिंडे, गोजमगुंडे, गोडे, गोलांडे, घरवाडे, घांगुर्डे, घाडे, घालुगडे, घेवडे, घोडे, घोरपडे, चिंचवडे, जगनाडे, जमदाडे, जानगुडे, झगडे, झेंडे, टेकवडे, डोईफोडे, तांगडे, तायडे, तावडे, तोकडे, दबडे, दराडे, दरोडे, दाभाडे, दामगुडे, देवडे, देशपांडे, धनवडे, धनावडे, धांगुर्डे, धांडे, धोंगडे, नरवडे, नरवाडे, नलावडे, नागवडे, नालुगडे, निगडे, नेमाडे, पलांडे, पांडे, पायगुडे, पिंडे, पुंडे,फरगडे, बनसोडे, बलकवडे, बागडे, बानुगडे, बांडे, बेंडे, बेर्डे, बेलखोडे, बैनाडे, बोबडे, बोऱ्हाडे, भाईगडे, भांडे, भिडे, भिंडे, भुंडे, भेगडे, भेंडे, माडे, मांडे, मातीगडे, मार्कंडे, मिंडे, मुंडे, मुसमाडे, राखुंडे, राजवाडे, रानडे, रेडे, रोकडे, रोडे, लकडे, लबडे, लांडे, लोखंडे, वाईंगडे, वाघमोडे, शिवडे, शेंडे, सरदेशपांडे, साबडे, हंबरडे, हांडे, हुंडे(करी), वगैरे.

बेकारान्तसंपादन करा

 • गोडांबे
 • गोलांबे
 • चौबे (हिंदी-गुजराती आडनाव)
 • टेंबे
 • तांबे
 • दुबे (हिंदी-गुजराती आडनाव)
 • बिंबे
 • बोंबे
 • भोबे
 • लांबे
 • लेंभे
 • वाळंबे
 • वाळिंबे
 • शेंबे
 • सुंबे

भेकारान्तसंपादन करा

 • उभे
 • चोभे
 • जांभे
 • टेंभे
 • लंभे
 • लेंभे
 • लोभे
 • सुंभे

याकारान्तसंपादन करा

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

 • आण्टिया
 • कनोजिया
 • कांकरिया
 • कापडिया
 • कुटमुटिया
 • कोडिया
 • चोरडिया
 • चौरसिया
 • छाब्रिया
 • झकेरिया
 • झाझरिया
 • डालमिया
 • डिया
 • तापडिया
 • दहिया
 • देढिया
 • दोडिया
 • पुनिया
 • फिरोदिया
 • बगाडिया
 • भांखरिया
 • भाटिया
 • मारडिया
 • रुईया
 • रेशमिया
 • लोहिया
 • वाडिया
 • सिंघानिया
 • सिंधिया
 • सिसोदिया
 • सुरपुरिया

दक्षिणी भारतातील नावेसंपादन करा

प्राचीन काळापासून दक्षिणी भारतीय लोकांत एका खास प्रकारच्या नामकरण पद्धती प्रचलित आहेत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकच नाव दिले जात होते. ते पुढील कारणांपैकी एका कारणामुळे दिले जात असे. :

 • त्याचे गाव किंवा नगराचे नाव, उदा., इंकोल्लु, उद्यवारा, कुलार, कोकर्डी, चावली, चिट्टी, जनस्वामी, दासिग, बंगळूर, सिंग्री (सिंगिरी), हट्टंगडी, हट्टिंगडी, हुबळी, इत्यादी.
 • त्यांच्या परिवारावरून किंवा वंशावरून नाव, उदा. पुलितेवर, सहोंता.
 • जातीवरून नाव, उदा. अय्यंगार, अय्यर, राव, नायर. नाडर

आडनाव हा प्रकार दक्षिणी भारतीयांत नाही.

उत्तरेकडील आडनावेसंपादन करा

अग्निहोत्री, अग्रवाल, आगरवाल, आर्य, आहुजा, कपूर, कोहली, खन्ना, खान, खुराणा, गोयल, चतुर्वेदी, चोपडा, चोप्रा, चौहान, त्यागी, त्रिपाठी, त्रिवेदी, दास, देसाई, द्विवेदी, पांडे, पाण्डेय, बेदी, भट, भट्टी, मल्होत्रा, माथूर, मिश्रा, मिस्त्री, मौर्य, यादव, रंधावा, राजपूत, राठोड, रायजादा, रोशन, वर्मा, व्यास, शर्मा, शास्त्री, श्रीवास्तव, सिंघल, सिंघानिया, सेठी,

बंगालमधील आडनावेसंपादन करा

(उत्तर भारतीय आडनावात शेवटी अकारान्त जोडाक्षर आल्यास त्याचा उच्चार आकारान्त होतो.)

गुप्त (उच्चार गुप्ता), घोष,दत्ता, चक्रवर्ती (उच्चार चोक्रोबोर्ती), चटोपाध्याय(चॅटर्जी), ठाकुर (टागोर), दास, बंडोपाध्याय-वंद्योपाध्याय (बॅनर्जी), वर्मन् (उच्चार बर्मन), वसु-बसु-बोशू, (बोस), भौमिक, मिश्र (उच्चार मिश्रा), मुखोपाध्याय (मुखर्जी), राय-रॉय (रे), सारंगी, सेन, सरकार (सोरकार)

जोडनावे

दासगुप्त, रॉयभौमिक, रॉयचौधरी, सेनगुप्त, सेनरॉय, रायसेन, ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरू दत्तची पत्‍नी असलेली प्रसिद्ध गायिका गीता दत्त, हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे दत्त (पदुकोण नाही!).

गुजरातमधील आडनावेसंपादन करा

अंबानी, गढा, गांधी, चौहान, मेहता, मोदी, शहा, शाह,पटेल,सोनी, सोलंकी, पांड्या

हेही पहासंपादन करा

ओकारान्त नावे : याकारान्त आडनावे : मराठी नावे