वसंत कुमार शिवशंकर पडुकोण तथा गुरू दत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरू दत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.

गुरू दत्त
जन्म वसंत कुमार शिवशंकर पडुकोण
जुलै ९, इ.स. १९२५
मृत्यू ऑक्टोबर १०, इ.स. १९६४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, मिस्टर अँड मिसेस ५५
पत्नी गीता दत्त

दिग्दर्शित चित्रपट

संपादन

गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • आरपार
  • कागज के फूल
  • चौदहवी का चाँद
  • प्यासा
  • बाजी
  • साहिब बीबी और गुलाम
  • सी.आय.डी.

पुस्तके

संपादन

गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :-

  • अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त (कृपाशंकर शर्मा)
  • अंजनकुमार यांचे गुरुदत्त व मीनाकुमारी यांच्यावरचं 'आमेन शायरा‘ (दीपरेखा प्रकाशन) हे पुस्तक
  • गुरुदत्त (लेखक : अरुण खोपकर), (२६-७-२०१५)
  • अरुण खोपकर यांचं ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकान्तिका‘ (ग्रंथाली प्रकाशन, १९८५) या पुस्तकाला तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (हा पुरस्कार पटकावणारे हे मराठीतले पहिलेच पुस्तक होते.)
  • त्या दहा वर्षांतील गुरुदत्त (मूळ लेखक सत्या बरन, मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर).
  • बिछड़े सभी बारी बारी (हिंदी/मराठी.... मराठी अनुवादक - चंद्रकांत भोंजाळ. मूळ बंगाली, लेखक : बिमल मित्र)
  • भाऊ पाध्ये, मुजावर यांचीही गुरुदत्त यांच्यावर उत्तम पुस्तके आहेत.
  • Yours Guru Dutt, Intimate letters of a great Indian film maker (इंग्रजी) (मूळ लेखक गुरुदत्त, संपादक : नसरीन मुन्नी कबीर).

लघुपट

संपादन
  • अभिनेता विक्रांत मेस्सी याने स्वतःच्या होम ग्राउंड प्रॉडक्शनतर्फे काढलेला ३५ मिमी लघुपट. यात गुरुदत्त यांची भूमिका नीरज कवी यांनी साकारली आहे.