Portrait of Indian playback singer Geeta Dutt.jpg

गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) (नोव्हेंबर २३, इ.स. १९३० - जुलै २०, इ.स. १९७२) हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका होती. तिने अनेक बंगाली गीतेही गायली आहेत.

गीता दत्त
आयुष्य
जन्म नोव्हेंबर २३, इ.स. १९३०
जन्म स्थान भारत
मृत्यू जुलै २०, इ.स. १९७२
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
जोडीदार गुरू दत्त
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका
पेशा गायकी

जीवनपटसंपादन करा

गीता दत्तचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. तिचे वडिल देवेंद्रनाथ घोष रायचौधरी आणि आई अमियादेवी होते. गीता दत्तने १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी तिने विवाह केला. या दांपत्याला तीन मुले झाली.

कारकीर्दसंपादन करा

आपल्या कारकीर्दीत गीता दत्त हिने सुमारे बाराशे गीते गायली. संगीतकार एस.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, हेमंतकुमार यांच्याकडे तिने पार्श्वगायन केले.