ज्योतिष
हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय.
ज्योतिष्य हा भविष्य या शब्दानुरूप बनलेले ज्योतिष या शब्दाचे चुकीचे रूप आहे.
अहिंदू ज्योतिष पद्धतीही अस्तित्वात आहेत.
इतिहास
संपादनआपल्या ऋषींनी ज्योतिषाचे तीन प्रमुख भाग केले आहेत.
१. सिद्धान्त
२. संहिता
३. होरा
सिद्धान्त
संपादन१. सिद्धान्त
संपादन‘सिद्धान्त’ या विभागात प्रामुख्याने ग्रहगणित आहे. ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास, व कालनिर्णय या विषयांचा सिद्धान्तामध्ये समावेश केला आहे.[१]
२. संहिता
संपादन‘संहिता’ या विभागात प्रामुख्याने नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे, ग्रहणे वैगरे गोष्टींचा विचार केला जातो. तसेच यागोष्टींवरून शुभाशुभ फले व मुहूर्त विचार हे विषय यात सामावलेले आहेत.[१]
३. होरा
संपादन‘होरा’ या विभागात प्रामुख्याने मनुष्याच्या जन्मकालच्या ग्रहस्थितीवरून शुभाशुभ फले याचा विचार केला जातो. याला ‘जातक विभाग’ असेही म्हणतात.[१]
सिद्धान्त ज्योतिष:-
संपादनकाल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यांत आहे.
सिद्धान्त शास्त्राचे प्रमुख ऋषी-
संपादनब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. - ज्योतिष काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो.
अत्यंत छोटा काळ ते अनंत अशा अनेक काळ विषयक संकल्पना येथे मांडल्या आहेत. तसेच ग्रहांच्या गती, त्यांचा एकमेकांसापेक्ष होणारा योग इत्यादी सिद्धान्त यांत मांडलेले आहेत.
याचे प्रमुख ग्रंथ असे -
सूर्य सिद्धान्त,
वशिष्ठ सिद्धान्त,
ब्रह्म सिद्धान्त,
रोमक सिद्धान्त,
पौलिश सिद्धान्त,
ब्रह्मस्फुट सिद्धान्त,
पितामह सिद्धान्त
यांतले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत तेही छापले जात नाहीत, हे आपले दुर्दैव आहे.
शके ५५० च्या सुमारास ‘ब्रम्हसिद्धांत’ हा ग्रंथ ब्रम्हगुण यांनी लिहीला. त्यानंतर शके ८७५ मध्ये आर्यभट यांनी ‘सिद्धान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहीला. शके ११२४ मध्ये भास्कराचार्य यांनी ‘लिलावती’ नावाचा ग्रंथ लिहीला. गणेश दैवज्ञ यांनी शके १५०० मध्ये ‘ग्रहलाघव’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहीला.[२]
संहिता ज्योतिष
संपादनहा प्राचीन भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे.
यांतले महत्त्वाचे ग्रंथ असे -
- अरुण संहिता
- कालक संहिता
- गर्ग संहिता
- नारद संहिता
- बृहत्संहिता
- भृगु संहिता
- रत्नमाला - श्रीपती यांनी लिहीले - शके ९६१[२]
- रत्नमार्तंड - भोज यांनी लिहीले - शके ९६४[२]
- मुहूर्त मार्तंड - नारायण यांनी लिहीले - शके १४९३[२]
- मुहूर्त चिन्तामणी - रामभट यांनी लिहीले - शके १५२२[२]
- रावण संहिता
- लिंग संहिता,
- वाराही संहिता
‘वराह मिहीर’ हा आद्य ज्योतिषकर्ता समजला जातो. त्यांचा ‘बृहतसंहिता’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.[२]
संहिता ज्योतिषातले प्रमुख लेखक ऋषी
संपादन- गंगाचार्य
- नारद
- महर्षि भृगु
- रावण
- वराहमिहिराचार्य
- वर्ष प्रबोध
- विवाह मार्तण्ड
- शीघ्रबोध
ग्रह
संपादन- लग्न(ज्योतिष)
- मंगळ (ज्योतिष)
- रवि (ज्योतिष)
- शनि (ज्योतिष)
- गुरू (ज्योतिष)
- शुक्र (ज्योतिष)
- चंद्र (ज्योतिष)
- राहू (ज्योतिष)
- केतू (ज्योतिष)
- बुध (ज्योतिष)
- नेपच्यून (ज्योतिष)
- हर्षल (ज्योतिष)
- प्लूटो (ज्योतिष)
बारा राशी
संपादन- मेष रास
- वृषभ रास
- मिथुन रास
- कर्क रास
- सिंह रास
- कन्या रास
- तूळ रास
- वृश्चिक रास
- धनु रास
- मकर रास
- कुंभ रास
- मीन रास
अधिक मास व क्षय मास
संपादनज्या चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो मास स्पष्ट अधिक मास समजावा. प्रामुख्याने दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. ज्या चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे होतात, त्यास क्षय मास असे म्हणतात. क्षय मास कार्तिक, मार्गशीर्ष व पौष या तीन महीन्यांपैकी कोणता तरी असू शकतो आणि जेव्हा क्षयमास येतो तेव्हा एका वर्षात त्या क्षयमासाच्या पूर्वी एक व नंतर एक असे दोन अधिक मास जवळ जवळ होतात.[२]
कुंडली
संपादनकुंडली म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या जन्मठीकाणाहून अवकाशात असलेल्या ग्रहांची स्तिथी. एका प्रकारे कुंडली म्हणजे त्या जन्मठीकाणाहून अवकाशाचा त्यावेळी काढलेला त्रिमितीय फोटो असतो. एकाच क्षणाला वेग वेगळ्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकाची कुंडली वेग वेगळी असते कारण त्यांच्या जन्मठीकाणापासून अवकाशाचा त्रिमितीय फोटो थोडा का होईना वेगळा असेल. प्रत्येक क्षणी अवकाशातील ग्रह नक्षत्र यांची स्तिथी बदलत असते त्यामुळे सगळ्यांच्या कुंडली ह्या वेगळ्या असतात.
कुंडली मांडणे ही पद्धत खूप पुरातन आहे यावरून आपणास अंदाज येउ शकतो कि आपले पूर्वज हे किती विद्वान होते.
भाव(स्थान)
संपादन== कुंडलीचे प्रकार ==sara
कृष्णमूर्ती पद्धत
संपादनप्राचीन हिंदू पद्धत आणि कृष्णमूर्ती पद्धत यांमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. उपनक्षत्र स्वामी हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो.
कृष्णमूर्ती पद्धती विवेचन
संपादनपारंपरिक ज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशावर्षांच्या प्रमाणात असते. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हणले जाते. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या सहा पुस्तकांवरून आजही ही कृष्णमूर्ति पद्धती शिकणे शक्य होऊ शकते.
कृष्णमूर्ती पद्धतीचा आणखी मोठा विशेष म्हणजे त्यांनी भावारंभ पद्धत वापरण्यास सुरुवात केली. पारंपरिक ज्योतिषात मध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने कुंडली मांडली जात होती.
भारतात सामान्यपणे कुंडल्यांचे दोन प्रकार आढळतात,दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय.
पाश्चात्त्य पद्धती
संपादनभारतीय पद्धती
संपादनभृगुसंहिता
संपादननक्षत्र
संपादनदशा (ग्रहांचे कार्यकाळ)
संपादनदृष्टी (ग्रहांचे परिणाम)
संपादनगोचर (बदल)
संपादनदिग्बल (दिशादर्शक शक्ती)
संपादनफलज्योतिष
संपादनआत्माकारक
संपादनकुंडलीमध्ये सर्वात जास्त अंश असलेला ग्रह आत्माकाराक ग्रह असतो.
गंडान्त
संपादनराशी अथवा नक्षत्र अंताला गंडान्त असे म्हणतात.
अयनांश
संपादनमौध्य
संपादनसाडेसाती
संपादन= पंचांग
संपादन=
आधुनिक भारतात
संपादनसुधारणा-बदल
संपादनव्यक्ती
संपादन- अभय अगस्ते[३]
- अतुलकुमार कुलकर्णी
- अनंत घोलम
- अनंत मराठे
- उज्ज्वल प्रभाकर पावले
- कृष्णराव वाईकर
- के एस के कृष्णमूर्ती
- चंद्रकांत शेवाळे
- ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
- पंचांगकर्ते जोतिषरत्न पं देवव्रत बूट
- शरद उपाध्ये (राशीचक्र कार्यक्रमाचे सादरकर्ते)
- सुरेश शहासने
- प्रदीप अलास्कर
पुस्तके
संपादन- उडुदाय प्रदीप
- कुंडलीची भाषा
- ज्योतिषसार
- तुमचे नाव तुमचे भविष्य (ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे)
- पाराशरी
- भृगू संहिता
- वेधक प्रभाव वक्री बुधाचा (अनंत मराठे)
मोबाईल अनुप्रयोग (ॲप)
संपादन- हिंदू कॅलेंडर - कुंडली बनवण्यासाठी उपयुक्त
हे सुद्धा पहा
संपादन- भृगू संहिता
- हिंदू दिनदर्शिका
- हिंदू आकाशविज्ञान
- हिंदू कालमापन
- नाडी ज्योतिष्य
- Electional Astrology- वेदिक मुहूर्त
- Phonetical astrology- स्वरशास्त्र
- ज्योतिष्यशास्त्रातील ग्रह
- तिथी
- भारतीय खगोलशास्त्र
- ज्योतिषशास्त्राचा इतिहास
- होरा (ज्योतिष)
बाह्य दुवे
संपादन- फलज्योतिष विषयक माहिती Archived 2012-08-29 at the Wayback Machine.
- फलज्योतिष विषयक माहिती
- फलज्योतिष विषयक माहिती Archived 2021-01-28 at the Wayback Machine.
- ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद - फलज्योतिषावरीला आक्षेप
नोंदी
संपादनसंदर्भददुवे
संपादनपरिशिष्ट
संपादनबाह्य दुवे
संपादनमुख्य विचार
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |