होरा (ज्योतिष)
होरा म्हणजे फलज्योतिष. ही भारतीय ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे.
होरा म्हणजे एका आकाशस्थ राशीचा अर्धा भाग. त्यामुळे बारा राशींचे २४ होरे असतात.
संस्कृत भाषेत होरा म्हणजे एक तास म्हणजेच अडीच घटका. दिवसाचे २४ होरा असतात. आठवड्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन होऱ्याने होते. तो होरा ज्या ग्रहाचा असतो त्याचे नाव त्या वाराला मिळते. आकाशात डोळ्याने दिसणारे ग्रह आणि सूर्य-चंद्र यांचा मंद ग्रहापासून शीघ्र ग्रहापर्यंत (आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा:) असा क्रम लावला तर शनि, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र. हा क्रम येतो. शनीनंतर मंगळापासून मोजायला सुरुवात केली की २४वा ग्रह रवी येतो, म्हणून शनिवारनंतर रविवार येतो. रविवारनंतर शुक्रवारपासून मोजायला सुरुवात केली की २४वा क्रमांक चंद्राचा येतो. म्हणून रविवारनंतर चंद्राचा वार म्हणजे सोमवार. अशा रीतीने सर्व वारांचा क्रम मिळतो.
लॅटिन भाषेतही होरा म्हणजे एक तास.
मराठीत होरा म्हणजे अंदाज, कयास, तर्क.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वेद | |
---|---|
ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |