सिंह रास
अग्नीतत्त्व राशी आहे. या ग्रहावर रवि (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही राशी वंध्या राशी म्हणूनही ओळखली जाते. कुंडली मध्ये ५ आकड्याने ही दर्शवली जाते. सूर्य व मंगळ हे या राशीचे कारक ग्रह आहेत. ही अग्नितत्त्व, पुरुष राशीराशी आहे. राशीचा स्वामी सूर्य (ज्योतिष) आहे. मघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचे चार चरण व उत्तरा फाल्गुनीचे प्रथम चरण मिळून सिंह रास होते.
स्वभाव
संपादनयांना अधिकार गाजवणे आवडते. भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता आकर्षता, आशावाद असलेली ही राशी आहे. जिद्दीने उभारी घेण्याची हिम्मत ठेवतात. मिरवण्याची हौस असते, मान सन्मान आवडतात. ताकद आणि चपळाई भरपूर असते.