कुंडली
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच जन्मकुंडली होय. हा नकाशा जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी चंद्र जर मेष राशीत असेल, तर त्या व्यक्तीची रास मेष असते. भारतीय वैदिक ज्योतिष चंद्र कुंडली मनाची कारक असल्याने ती महत्त्वाची मानते. सूर्य कुंडलीनुसार शरीर पाहिले जाते. ज्योतिषाचे क्षेत्र निश्चित वेळ, विशेषतः शुभ दिवस व वेळेची भविष्यवाणी करण्यासाठी कामास येते.
घटक
संपादनहिंदू ज्योतिषात सोळा वर्ग किंवा विभाग कुंडल्या वापरल्या जातात.
राशिचक्र
संपादनज्योतिषी ज्योतिषशास्त्राच्या राशी ग्रह विभागाची समान विभागणी म्हणून घेत नाहीत. ती नक्षत्राच्या आधारे होते.
- मेष
- वृषभ
- मिथुन
- कर्क
- सिंह
- कन्यारास
- तुला
- वृश्चिक
- धनु
- मकर
- कुंभ
- मीन
- अश्विनी
- भरणी
- कृतिका
- रोहिणी
- मृगशीर्ष
- आर्द्रा किंवा अरुध्रा
- पुनर्वसु
- पुष्य
- अश्लेशा
- माघा
- पूर्वा फाल्गुनी
- उत्तरा फाल्गुनी
- हस्त
- चित्रा
- स्वाती
- विशाखा
- अनुराधा
- ज्येष्ठा
- मूळ
- पूर्वाषाढा
- उत्तराषाढा
- श्रावण
- धनिष्ट
- शतविशाखा
- पूर्वाभाद्रपदा
- उत्तराभाद्रपदा
- रेवती
कुंडलीवि़यी पुस्तके
संपादन- कुंडलीची भाषा, खंड १,२,३ लेखक -कृष्णराव प्रल्हाद वाईकर
हे सुद्धा पहा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |