धनु एक ज्योतिष-राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी ३० अंशाचे असे बारा भाग केले आहेत. धनु रास ही नवव्या भागात येते, म्हणून ही राशी कुंडलीत ९ या आकड्याने दर्शवतात. या राशीमध्ये मूळपूर्वाषाढा ही संपूर्ण नक्षत्रे आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या चारापैकी पहिला चरण(भाग) येतो.

ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरू (ज्योतिष)चा अंमल आहे.

स्वभाव

संपादन

ही द्विस्वभावी राशी आहे. ही रास असलेल्या माणसाचा स्वभाव काहीसा संतापी, पण याचवेळी संयमी आणि सात्त्विक असतो. माणसात अध्यात्माची ओढ दिसते. तो आशावादी असतो आणि त्याच्यात परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते

नावांची आद्याक्षरे - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, टा, भे.

हे सुद्धा पहा

संपादन