मूळ (नक्षत्र)

(मूळ या पानावरून पुनर्निर्देशित)

मूळ (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.

नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत


हे सुद्धा पहा संपादन

भारतीय २७ नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे हे वृश्चिक राशीत येत असून विंचवाच्या नांगीतील नऊ तारे मिळून हे बनले आहे. भारतीय योजनेप्रमाणे याचा समावेश धनू राशीत होतो. होरा १६ ता. ४० मि. ते १७ ता. ४० मि., क्रांति -३५° ते -४५° [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. या ठिकाणी एप्सायलॉन, झाय, म्यू, झीटा, ईटा, थीटा, आयोटा, जी, काय, लॅंब्डा व उप्सायलॉन असे याचे लहानमोठे ११ तारे साधारण वर्तुळाकृतीत दिसतात. यातील लॅंब्डा (शोला) हा योगतारा (मुख्य तारा) १·७ प्रतीचा [⟶ प्रत], निळसर पांढरा असून त्याचा वर्णपटीय वर्ग बी-२ असा आहे. म्यू चर (तेजस्विता कमी जास्त होणारा) असून लॅंब्डा, एप्सायलॉन ही जोडी नुसत्या डोळ्यांनीही दिसते. लॅंब्डाच्या किंचित पूर्वेस एम-६ व एम-७ हे विरळ तारकागुच्छ आहेत. फलज्योतिषानुसार या तीक्ष्ण, दारुण नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या मातापित्यास धोका असतो, तर विशिष्ट अशुभ काल सोडल्यास असे मूल भाग्यवान, कुलवर्धक आणि दीर्घायू होते, असे कोष्ठीप्रदीपात सांगितले आहे. या नक्षत्राची देवता निर्ऋती व आकृती सिंहपुच्छ मानली आहे. १५ ऑगस्टच्या सुमारास रात्री नऊ वाजता हे नक्षत्र मध्यमंडलावर येते. ४५ उत्तर अक्षांशाच्या उत्तरेकडील स्थानावरून हे नक्षत्र दिसत नाही. हे आकाशगंगेत असून येथून पुढे आकाशगंगा रुंद झालेली आहे, म्हणून याचे मूळ हे नाव पडले असावे.

               ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)