मिथुन (इंग्रजीमध्ये जेमिनी) ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे व ही वायुतत्‍त्वाची रास आहे, असे म्हटले जाते. कुंडलीतील ही रास तिसर्‍या क्रमांकाच्या घराने दर्शवतात. सूर्य या राशीत २१ मेपासून २१ जूनपर्यंत असतो. या राशी ६६च्या आसपास तारे आहेत, त्यांपैकी पोलक्स हा सगळ्यात मोठा आहे

मिथुन राशीचे चिन्ह

ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे, म्हणून हिचे नाव जेमिनी (जुळे).

हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्‍नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची आश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत.

स्वभावसंपादन करा

या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.प्रसाद