गाव

लोकवस्ती असलेलं शहरापेक्षा छोटं ठिकाण

ज्या परिसरासभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हणले जाते. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदीकाठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.

बेनिनमधील एक दुर्गम गाव

गावामध्ये राहणारी जी माणसे असतात त्यांना गावकरी असेही संबोधले जाते. सरपंच हा गावचा प्रमुख असतो. जर गावे विकसित झाली तर देश समृद्ध व संपन्न होतो.

विस्तार

संपादन

गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे. गावातील लोकसंख्या उपभागान मध्ये विभागली जाते . तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात. काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असेही म्हणतात. गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत . हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत.

इतिहास

संपादन

वतनदारी

संपादन

बलुतेदारी

संपादन
मुख्य लेख: बलुतेदार

पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती.यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. बलुतेदारी पद्धतीमध्ये कुंभार, चांभार, लोहार, सुुुुुुुतारादी बारा बलुतेदार असत. अलीकडच्या काळात ही परंपरा लोप पावत चालली आहे .

व्यापारी

संपादन