गणपतराव देशमुख

भारतीय राजकारणी
(भाई गणपतराव देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)

गणपतराव देशमुख (१० ऑगस्ट १९२६ - ३० जुलै २०२१) हे एक भारतीय राजकारणी आणि डाव्या विचारसरणीचे नेते होते होते. महाराष्ट्र विधानसभेवर ५४ वर्षे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने "आबासाहेब" म्हणत. समानतेच्या तत्त्वांसह ते आदर्श व्यक्ती मानले जायचे. शेतकरी आणि कामगारांकडून त्यांना भाई म्हणले जात असे. गरीब, महिला, मागासलेले, शेतकरी, कामगार यांच्यासाठी त्यांनी अनेक लढाया लढल्या। ते नेहमी राज्य वाहतूक वापरत आले, त्यामुळे त्यांना लालपरीचा आमदार म्हणलं गेलं। सर्वाधिक वेळा (11) आमदार होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे।

गणपतराव देशमुख

जन्म १० ऑगस्ट, १९२६ (1926-08-10)
पेनूर ता. मोहोळ
मृत्यू ३० जुलै, २०२१ (वय ९४)
सांगोला
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शेतकरी कामगार पक्ष
पत्नी रतनाबाई देशमुख
अपत्ये पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख

शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी अकरा वेळेस विधानसभा निवडणूक जिंकली होती. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून अकरा (११) वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी हे १० वेळेस विजयी झाले होते.[]

कारकीर्द

संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला.[] २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.[]

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे निधन झाले.[]

राजकीय वारसा

संपादन

गणपतराव देशमुख यांच्यानंतर घरातील सदस्य राजकारणात सक्रिय झाले आहेत.[] २०१९ साली गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "अकरावेळा आमदार, एसटीनेच प्रवास... जाणून घ्या ग्रेट गणपतरावांचा जीवनप्रवास". ३१ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश, ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम". ३१ जुलै २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Ganpatrao Deshmukh passes away : गणपतराव देशमुख यांचा नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया". marathi.abplive.com. 2021-07-31. 2023-05-19 रोजी पाहिले.
  4. ^ Team, My Mahanagar (2019-10-24). "सांगोल्यातील शेकापचा ५० वर्षांचा गड खालसा; देशमुखांच्या नातूचा पराभव". My Mahanagar. 2023-05-19 रोजी पाहिले.
  5. ^ IANS (2021-07-31). "11-time MLA Ganpatrao Deshmukh cremated with full state honours". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2023-05-19 रोजी पाहिले.