शिवराई

स्वराज्याचे चलन
Shivaraai.JPG

प्रस्तावनासंपादन करा

शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन १९२० [१]पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात.

हे तांब्याचे नाणे साधारण ११-१३ ग्राम वजनाचे असते. व्यास २ सें. मी. असतो. एका बाजूस श्री/राजा /शिव तर दुसऱ्या बाजूस छत्र /पती असे लिहिलेले असते. यास पूर्ण शिवराई असेही संबोधिले जाते.

इतिहाससंपादन करा

महाराज शिवाजी राजे भोसले यांनी “ज्येष्ठ शुध्द 12, शुक्रवार घटी 21, पळे 34, विष्कंभ 38, घटिका 40,पळे सिं 42 तीन घटिका रात्र उरली” असताना म्हणजेच 6 मे, 1674 रोजी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती अशी पदवी धारण करुन स्वतंत्र आणि सार्वभौम राजाचं प्रतीक म्हणून स्वतःचे चलन सुरू केले. उपलब्ध साधने आणि पुराव्यानुसार सोने व तांबे या दोन धातूंची नाणी शिवाजी महाराजांनी पाडलेली आढळतात. जेम्स ग्रँड डफ यांनी आपल्या हिस्ट्री ऑफ द मराठाज् या पुस्तकात शिवाजीने इसवी सन 1664 मध्ये नाणी पाडली असे नमूद केले आहे. परंतू ही नाणी राज्याभिषेकानंतर म्हणजेच 1674 ला पाडली गेली असल्याचे अनेक इतिहास अभ्यासकांनी सिध्द केलेले आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ संदर्भ हवा