पुरातत्त्वीय उत्खनन

Disambig-dark.svg

पुरातत्त्वीय उत्खनन (इंग्लिश: Excavation, एक्सकवेशन ;) म्हणजे पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते. हा शब्द पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या तंत्रज्ञानाचा विकास कसा होत गेला हे शोधून काढण्यावर असतो. जमिनीखालील अवशेष उजेडात आणून त्याद्वारे इतिहासाची नव्याने मांडणी करण्यासाठी उत्खनने केली जातात.

स्पेनातील आताप्वेर्का पर्वतांमधील ग्रान दोलिना या ठिकाणी चालू असलेले उत्खननाचे काम (इ.स. २००८)

मातीच्या स्तरांचे महत्त्वसंपादन करा

हवामानात सततच्या होत असलेल्या बदलांमुळे साठत जाणारे मातीचे स्तर विशिष्ट रंगवैशिष्ट्ये धारण करतात. त्यामुळे एकावर एक असे वेगवेगळे स्तर तयार होतात. सर्वात खालचा स्तर हा सर्वात आधी बनलेला असल्यामुळे तो सर्वाधिक प्राचीन तर सर्वात वरचा स्तर सर्वात शेवटी बनलेला असल्याने सर्वाधिक अर्वाचीन असतो. विविध गावांमध्ये अशा पद्धतीचे अवशेष दडलेली टेकाडे पहावयास मिळतात. त्यांना पांढरीचे टेकाड म्हणतात.

पुरातत्त्वीय उत्खननाचे प्रकारसंपादन करा

  1. उभे उत्खनन
  2. आडवे उत्खनन
  3. प्रयोगात्मक उत्खनन
  4. दफनभूमीचे उत्खनन

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • "खंदणे व उत्खनन ("ट्रेंचिंग ॲंड एक्सकवेशन)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)