हसमुख धीरजलाल सांकलिया

हे एक भारतीय पुरातत्त्ववेत्ते होते.

हसमुख धीरजलाल सांकलिया (प्रचलित नाव - एच.डी. सांकलिया) (जन्म : १० डिसेंबर, इ.स. १९०८. मुंबई मृत्यू : २८ जानेवारी, इ.स. १९८९. पुणे) हे भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते होते.

एच.डी. सांकलिया (इ.स. १९४०चे छायाचित्र)

जीवनसंपादन करा

एच.डी. सांकलिया यांचा जन्म मुंबई येथे एका गुजराती कुटुंबात झाला. सुरुवातीला सांकलिया संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांनी नालंदा विद्यापीठ या विषयात एम.ए. केले होते. नंतर त्यांनी "गुजराथचा पुरातत्त्वीय अभ्यास" या विषयावर लंडन विद्यापीठाची आचार्य (पीएच.डी.) ही पदवी मिळवली.

भूषविलेली पदेसंपादन करा

संशोधनसंपादन करा

हसमुख धीरजलाल सांकलिया यांनी भारतात ठिकठिकाणी उत्खनने घडवून आणली. पेहेलगाम, नाशिक, अहमदाबादजवळ लांघणज, जोर्वे, नेवासे, पुण्याजवळील इनामगाव, कोल्हापूरजवळ ब्रह्मपूर अशा अननेक ठिकाणी त्यांनी उत्खनने केली. या उत्खननातून मानवी सांगाडे, घरांचे नमुने, नाणी, हत्यारे, दागिणे, धान्यांचे अवशेष असे अनेक प्रकार त्यांना मिळाले. त्यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांनी अनेक संस्कृती प्रकाशात आणल्या. ब्रह्मपूरचा रोमशी होत असलेला व्यापार सांकलियांनी दाखवून दिला तसेच द्वारकानगरीची प्राचीनता महाभारत काळापर्यंत जात नाही हे सिद्ध केले. वाङमय व भूगोल यांच्या अभ्यासातून रावणाची लंका म्हणजे श्रीलंका देश नव्हे असे मतही त्यांनी मांडले.

पुरस्कारसंपादन करा

प्रकाशित साहित्यसंपादन करा

  • "द युनिव्हर्सिटी ऑफ नालंदा" (इंग्रजी पुस्तक १९३४)
  • "द आर्किऑलॉजी ऑफ गुजरात" (इंग्रजी पुस्तक १९४१)
  • "प्रिलिमिनरी रिपोर्ट ऑन थर्ड गुजरात प्रीहिस्टॉरिक एक्स्पेडिशन ॲन्ड ह्युमन रिमेन्स डिस्कव्हर्ड सो फार" (सहलेखक इरावती कर्वे आणि जी.एम. कुरूलकर) (इंग्रजी पुस्तक १९४५)
  • इन्व्हेस्टिगेशन इनटू प्री-हिस्टॉरिक आर्किऑलॉजी ऑफ गुजरात (इंग्रजी पुस्तक १९४६)

हे सुद्धा पहासंपादन करा