मधुकर श्रीपाद माटे हे पुरातत्त्व, इतिहास, कला, वास्तुशास्त्र आणि वास्तुशिल्प ह्या विषयांचे अभ्यासक होते, ह्या विषयांवर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी लेखन केले.

म.श्री.माटे
जन्म नाव मधुकर श्रीपाद माटे
मृत्यू २३ एप्रिल २०१९
पुणे
शिक्षण एम.ए. , पीएच.डी.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुरातत्त्वशास्त्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, कला, वास्तूकला
वडील श्रीपाद महादेव माटे

मराठी अस्पृश्योद्धारक लेखक श्री.म. माटे यांचे ते चिरंजीव होते.

मराठा वास्तूशिल्प ह्या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी १९५७ साली पीएच्.डी पदवी प्राप्त केली. ते डेक्कन कॉलेज पुणे येथे पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

२३ एप्रिल २०१९ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.[]

ग्रंथसंपदा

संपादन

इंग्रजी

संपादन
  • मराठा आर्किटेक्चर , १९५९
  • टेम्पल अँड लेजेन्ड्स ऑफ महाराष्ट्र, १९६२
  • इंडियन प्रिहिस्टरी : १९६४ (सहसंपादक - व्हि.एन्.मिश्रा) , १९६५
  • डेक्कन वूडवर्क , १९६६
  • स्टडीज् इन इंडॉलॉजी अँड मेडिईव्हल हिस्टरी - प्रो. ग.ह. खरे फेलीसिटेशन व्हॉल्युम (सहसंपादक - गो.त्र्यं.कुलकर्णी) , १९७४
  • जमोदा जैन म्युरल्स् , १९७७
  • पेन्टिंग्स फ्रॉम भागवद पुराण (सहलेखिका - डॉ. उषा रानडे) , १९७७
  • ए डिस्क्रीप्टीव्ह कॅटलॉग ऑफ दी स्कल्पचर्स ॲन्ड पेन्टिंग्स् इन दी राजवाडे संशोधन मंडल (सहसंपादक - उषा रानडे) , १९७९
  • नासिक रागमाला (सहलेखिका - डॉ. उषा रानडे) , १९८२
  • तारिफ इ हुसैनशाही (सहसंपादक - गो.त्र्यं.कुलकर्णी) , १९८७
  • दौलताबाद : ए रिपोर्ट (सहसंपादक - टि.व्ही.पथी) , १९९२
  • अ हिस्ट्री ऑफ वॉटर मॅनेजमेंट अँड हायड्रुलिक टेक्नॉलजी इन इंडिया , १९९७ , २०२०
  • मराठा आर्किटेक्चर (पुनर्मुद्रित) , २००२
  • आर्किओलजी ऑफ मेडिईव्हल इंडिया , २००५

मराठी

संपादन
  • मराठवाड्याचे शिल्पवैभव , १९६४
  • प्राचीन भारतीय कला , १९७४
  • महाराष्ट्रातील पुरातत्त्व (सहलेखक - ह.धी.सांकलिया) , १९७६
  • देवगिरी-दौलताबाद येथील पुरातात्त्विक संशोधन , १९८७
  • प्राचीन कलाभारती , १९९७
  • मध्ययुगीन महाराष्ट्र : सामाजिक व सांस्कृतिक , २००२
  • मध्ययुगीन कलाभारती (सहलेखिका - कमल चव्हाण) , २००२
  • अतीताची लेणी , २००६
  • मराठेशाही वास्तुशिल्प , २००८
  • निधीवास ते देवगिरी , २०१६
  • निवडक श्री.म. माटे - (एकाहून अधिक खंड, संपादन, सहसंपादक विनय हर्डीकर)
  • विचारशलाका


संदर्भ

संपादन
  1. ^ महाराष्ट्र, टाइम्स. "इतिहास संशोधक मधुकर माटे यांचे निधन".