नालंदा विद्यापीठ
नालंदा विद्यापीठ हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते.[१][२]
Central University in Rajgir, near Nalanda, Bihar, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | राजगीर, नालंदा जिल्हा, Patna division, बिहार, भारत | ||
स्थापना |
| ||
पासून वेगळे आहे | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |


पार्श्वभूमी संपादन
नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विद्यापीठाची वास्तू होती. सद्यस्थितीत तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विद्यापीठाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनने शंभर खेडी विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत.
परिसर संपादन
विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतिगृह, ऐंशी सभागृहे, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते.
ग्रंथालय संपादन
नालंदा विद्यापीठात अनेकमजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती.[३] त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते.
अध्ययन संपादन
विद्यापीठात १०,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यांतले ३००० तर विद्यापीठाच्या वसतिगृहात रहात होते. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांमध्ये चीन, कोरिया व तिबेट येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात असे. अभ्यासक्रमात हीनयान व महायान पंथाच्या तत्त्वज्ञानाबरोबरच वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, व पाणिनीसूत्रे या विषयांचा समावेश होता. बौद्ध व पाणिनीच्या सूत्रसंग्रह अभ्यासाला विशेष महत्त्व होते. शीलभद्र हे विद्यापीठाचे मुख्य आचार्य (कुलगुरू) होते आणि धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र व चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र व वसुबंधू आदी विविध विषयातील तज्ज्ञ आचार्य अध्यापनाचे कार्य करीत होते. विद्यापीठात एकूण १५७० अध्यापक होते. विद्यापीठाच्या विविध सभागृहांत रात्रंदिवस वादविवाद, परिसंवाद, प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे चालत.
अस्त संपादन
इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठही जाळून टाकले.[४] विद्यापीठाचे ग्रंथालय तर कित्येक महिने जळत होते. चाग लुत्सावा या तिबेटी माणसाने ज्यावेळी इ.स. १२३५ला या ठिकाणी भेट दिली त्यावेळी जिथे १०,००० विद्यार्थी व शेकडो आचार्य अध्ययन-अध्यापन करत होते. तिथे त्याला ९० वर्षाचे वयोवृद्ध आचार्य राहुल श्रीभद्र हे फक्त ७० विद्यार्थ्यांच्या तुकडीला अध्यापन करताना आढळले.[५]
मागोवा संपादन
- ज्या ठिकाणी नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत त्याच्याच जवळच्या परिसरात नव्याने नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ निर्मितीच्या हालचाली चालू आहेत. त्यासाठीचा नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१०[६] हा २१ ऑगस्ट २०१० रोजी भारतीय संसदेच्या राज्यसभेने तर २६ ऑगस्ट २०१० रोजी भारतीय संसदेच्या लोकसभेने मंजूर केला. अधिनियम मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी तो २१ सप्टेंबर २०१०ला राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला[७] व राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर २५ नोव्हेंबर २०१० पासून नालंदा विद्यापीठ कायदा २०१० अस्तित्वात आला.
- जपान आणि सिंगापूरच्या सरकारने या नवीन विद्यापीठासाठी संयुक्तपणे ४.५ अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देऊ केलेली आहे.[८]
- नोव्हेंबर १५, इ.स. २०११ रोजी चीनचे भारतातील राजदूत चांग यान यांनी १ अब्ज अमेरिकन डॉलरांचा धनादेश नवनिर्मित विद्यापीठात ग्रंथालय निर्मितीसाठी भारताकडे सुपूर्द केला.[९]
संदर्भ संपादन
- ^ स्कार्फे, हार्टमुट. एज्युकेशन इन एन्शन्ट इंडिया (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ जेफ्री गार्टेन. "रिअली ओल्ड स्कूल" (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ "द तिबेटन तंजुर:हिस्टॉरिक ट्रान्सलेशन इंटिटेटीव्ह" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-06-15. 2011-12-17 रोजी पाहिले.
- ^ स्कॉट, डेव्हिड. बुद्धिझम अँड इस्लाम:पास्ट टु प्रेझेंट एनकाऊंटर्स अँड इंटरफेथ लेसन्स (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ बेरझिन, अलेक्झांडर. द हिस्टॉरिकल इंटरअॅक्शन बिट्विन द बुद्धिस्ट अँड इस्लामिक कल्चर्स बिफोर द मोंगल एंपायर (इंग्रजी भाषेत). १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ "नालंदा विद्यापीठ अधिनियम २०१०" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2011-09-15. १८ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ "भारताचे राजपत्र" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2012-04-06. १८ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ "नालंदा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी:अ ग्रेट इनिशियेटिव्ह" (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.
- ^ पी.टी.आय. "चायना डोनेट्स १ मिलिअन डॉलर फॉर नालंदा युनिव्हर्सिटी रिव्हायव्हल" (इंग्रजी भाषेत). १८ डिसेंबर २०११ रोजी पाहिले.