पुस्तक
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते. त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका कागदाला पान म्हणतात. तर त्या पानाच्या पुढच्या बाजूस मुखपृष्ठ असे म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. इजिप्त मध्ये अलेक्झांड्रिया येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे.
साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. (त्यांना प्रकरण-१,प्रकरण-२,प्रकरण-३ अशी, भाग-१, भाग-२, भाग-३ अशी किंवा खंड १, २, ३ अशी नावे देण्यात येतात.) पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात. जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके [[ग्रंथालय| माणसांचे राहणीमान सुधारते. पुस्तक हा मानवाला शिकवणारा गुरू आहे. याला कशाचीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी बसून ज्ञान घेऊ शकतो. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवते. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. पुस्तकं असतात आपला इतिहास आणि भविष्य सुद्धा. पुस्तकं माणसाला समृद्ध बनवितात. आपला विकास करतात, आपल्याला अनुभव देतात. पुस्तके आपली सोबती असतात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांची माहिती प्राप्त होते.
शब्दाची उत्पत्तीय
संपादनत्याचप्रमाणे, लॅटिन शब्द कोडेक्स, ज्याचा आधुनिक अर्थ हा पुस्तक असा होतो,(वेगवेगळ्या पानांचे व बांधणी केलेले) त्याचा मूळ अर्थ "लाकडाचा ठोकळा" असा आहे.
पुस्तकांचा इतिहास
संपादनप्राचीनत्व
संपादनजेव्हा पुरातन संस्कृतीत, लेखन प्रणाली शोधण्यात आली, त्यावेळेस लेखनासाठी दगड, माती, झाडांची साल, धातूचे पत्रे इत्यादींचा वापर होत असे. अक्षरलेखनाची सुरुवात सुमारे ५,००० वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये झाली. नाईल नदीच्या किनारी उगवणाऱ्या पापयरस या वृक्षावर इजिप्शियन लेखन करीत असत. आधी, शब्द एकमेकांपासून विलग लिहिण्यात येत नसत. लेखनात कोणतेही विरामचिन्हेही नसत. उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे लेखन लिहिण्याची पद्धत होती. काही वेळेस तर, जसा एक शेतकरी शेत नांगरतांना बैल वळवितो तशी, पुढची ओळ आधीच्या विरुद्ध दिशेने लिहिण्यात येत असे.
कागदाच्या वा चर्मपत्रांच्या गुंडाळ्या
संपादनपापयरस हे एक प्रकारचे जाड कागदसदृश साहित्य आहे. ते त्या वृक्षाच्या खोडांना एकत्र विणून बनविलेले असते व नंतर त्या विणलेल्या कागदास हातोडीसारख्या अवजाराने ठोकून मग त्यावर लेखन करण्याची पद्धत पुरातन इजिप्मध्ये अगदी पहिल्या राजवंशापासून वापरली जात होती. मात्र, उपलब्ध पहिला पुरावा हा पाचव्या राजवंशातील लेखापुस्तकाचा, (सुमारे २४०० ख्रिस्तपूर्व) आहे. [१]
या पापयरसची पृष्ठे एकत्र एकाखाली एक चिटकविली जात असत त्यामुळे त्याची एकप्रकारची गुंडाळी तयार होत असे. टीलिया वृक्षाचे खोड (लॅटिन मध्ये त्याला 'लिबर' म्हणतात. या लिबरपासूनच 'लायब्ररी' हा आंग्ल शब्द उपजला) व इतर साहित्यही वापरले जात होते.[२]
हिरोडॉटसच्या मते फोनेशियन लोकांनी नवव्या वा दहाव्या शतकाच्या सुमारास ग्रीस मध्ये पापयरसची व लेखनाची कला आणली. 'बिबलिऑन' (लेखन सामग्री) किंवा 'बिबलोस'(पुस्तकास असलेला ग्रीक शब्द) हा फोनेशियन बंदर व शहर असलेल्या 'बायब्लोस' वरून आला आहे. या बंदराद्वारेच ग्रीसमध्ये कागद आणण्यात येत होता. [३]
पापयरस, चर्मपत्रे वा कागद यांपासून बनविलेल्या गुंडाळ्या ह्या रोमन, चिनी व हिब्रू संस्कृतीत एक महत्त्वाचे असे पुस्तकाचे रूप होते. त्यापेक्षा आधुनिक असे हस्तलिखित ग्रंथस्वरूप हे रोमन जगतात जुन्या काळी होते, परंतु कागदी गुंडाळ्यांच्या स्वरूपातले पुस्तक हे आशियात पुढे पुष्कळ काळ अस्तित्वात होते.
हस्तलिखित ग्रंथ
संपादनपापयरसपासून बनविलेल्या गुंडाळ्यासारखी पुस्तके पहिल्या शतकात प्रचलित होती. ते पॉम्पेईच्या उत्खननातून सिद्ध झाले. मार्टियलने आपल्या ग्रंथात लिहिल्यानंतरच हस्तलिखित ग्रंथासारख्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदा लिखित माहिती मिळाली. माहितीत आटोपशीरपणाचा उल्लेख आहे, परंतु त्यास तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. फक्त ख्रिश्चन समाजात मात्र ते ग्रंथ चांगल्याप्रकारे वापरात होते. [४] हा बदल ३ऱ्या व ४थ्या शतकामध्ये हा बदल व्यापकपणे झाला त्याची अनेक कारणे होती. ती पुस्तके फारच स्वस्त होती. त्याच्या दोन्ही बाजू लिखाणासाठी वापरता येऊ शकत होत्या. ते सहज कुठेही नेण्याजोगे होते, धुंडाळता येऊ शकत होते, तसेच लपविण्यायोग्यही होते. ख्रिश्चन लेखकांना ते पागल लेखकांनी लिहिलेल्या गुंडाळ्यापेक्षा वेगळेपणा दर्शविण्यासाठी पण उपयुक्त होते.
मेणापासून बनविलेल्या पट्टिका ह्या शाळेत व हिशोबासाठी नोंदी ठेवण्यासाठी सर्वसाधारण लेखन सामग्री म्हणून उपयोगात येत असत. वितळविल्यावर त्याचा पुन्हा उपयोग करता येत असे. अनेक पट्टिका एकत्र केल्यावर तयार झालेल्या वस्तूत आजचे पुस्तक दडले होते. त्यास हस्तलिखित ग्रंथ(कोडेक्स) म्हणत.[५] 'कोडेक्स' (लाकडी ठोकळा) या शब्दाची व्युत्पत्तीही हे दर्शविते कि त्याचा विकास हा वुडन व ॅॅक्स ट ॅॅब्लेटपासून झाला असावा.[६]
मध्य युग
संपादनहस्तलिखिते
संपादनख्रिस्तपूर्व ५व्या शतकात, रोमन साम्राज्याच्या पतनानंतर, रोमनांच्या पुरातन संस्कृती विसरली गेली. इजिप्तशी संपर्क नसल्यामुळे, पापयरस मिळविणे कठीण झाले. जे अनेक शतके वापरले गेले होते, ते पर्चमेंट पुन्हा लिखाणाचे मुख्य साहित्य झाले.
छपाईच्या यंत्राचा शोध व त्याचा स्वीकार करण्यापूर्वी, बहुतेक सर्व पुस्तके हाताने लिहिली जात असत. त्यामुळे पुस्तके महाग व दुर्मीळ झाली होती. छोट्या मठात फक्त काही डझन पुस्तकेच असत. तर, मध्यम स्वरूपाच्या मठात काहीशेच. ९व्या शतकात, जास्तीत जास्त संग्रह हा सुमारे ५०० पुस्तकांचा असे. पॅरीसच्या ग्रंथालयात सुमारे २००० पुस्तके होती. [७]
पुस्तके बनविण्याची प्रक्रिया ही लांबलचक व कठीण होती. पर्चमेंट तयार करावे लागत असत. सुटया कागदांवर मग बोथट हत्यार वा शिशाने रेषा आखल्या जात. त्यानंतर त्यावर लेखन केले जाई. त्यानंतर त्याची बांधणी होत असे.
[८]
जुन्या काळी काजळ व डिंक यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाई वापरल्या जात असत. गल वृक्षाची फळे व लोखंडाच्या रसायनांपासून पण त्या तयार करण्यात येत. त्याने लेखनास तपकिरी काळसर रंग येत असे. पण तपकिरी व काळा हेच रंग नव्हेत तर लाल व सोनेरी रंगात पण लेखन केले जाई. सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर होई..कधीकधी संपूर्ण पर्चमेंट हे जांभळ्या रंगाने रंगवून त्यावर सोनेरी वा चंदेरी रंगात लिखाण केले जाई. उदाहरणार्थ- कोडेक्स अर्जेंटिअस [९] सातव्या शतकात आयरिश संतांनी अक्षरांच्या मध्ये जागा सोडण्याची पद्धत सुरू केली. त्याने वाचन सोपे झाले, आयरिश संतांना लॅटिन भाषा अवगत नव्हती. त्यांचे लिखाण १२व्या शतकापर्यंत तरी सार्वजनिक झाले नव्हते शब्दलेखनात जागा सोडण्याने, वाचनाची रीत ही अर्ध शब्दोच्चारापासून ते शब्द न उच्चारता मनातल्या मनात वाचता येण्यापर्यंत बदलत गेली. [१०]
सुरुवातीला पुस्तकात चर्मपत्रांचा वापर होता. वासराची चामडी त्यात पाने म्हणून वापरली. त्या पुस्तकाचे मुखपृष्ट हे लाकडाचे पण चर्मवेष्टित असे. त्या पुस्तकांना आवळण्यापासून सुटका मिळावी म्हणून त्यास पट्ट्या जखडल्या जात असत कारण चामडे हे काही कालाने आपले प्रक्रियेपूर्वीचे रूप घेते [[मध्य युगाच्या शेवटी जेव्हा सार्वजनिक ग्रंथालये निर्माण झाली त्या १८व्या शतकापर्यंत पुस्तके ग्रंथालयांतून चोरीला जाऊ नयेत म्हणून साखळीने बांधून ठेविली जात.
आधी, पुस्तकांच्या प्रति ह्या एक-एक करून करण्यात येत असत. १३व्या शतकात विद्यापीठे सुरू झाल्यानंतर त्या हस्तलिखित संस्कृतीमुळे पुस्तकांची मागणी वाढली. त्यामुळे पुस्तकांच्या प्रति करण्याच्या एका नवीन पद्धतीचा जन्म झाला. पुस्तकांची बांधणी काढून पाने सुटी करण्यात येत असत. ती पाने वेगवेगळ्या लोकांकडे नकलीसाठी सोपविली जात. ते नकल करणारे मग त्या पानांच्या प्रति निर्माण करीत. त्याने पुस्तकांच्या निर्माणाची गती वाढली. हा गट धार्मिक व धार्मिकेतर पुस्तकेपण तयार करीत असे.[११]
ज्यू धर्माने खरडून लिहिण्याची परंपरा आजतागायत जिवंत ठेवली आहे. ज्यू परंपरेप्रमाणे, 'टोरा' हे सिनेगॉगमध्ये असलेले पुस्तक, चामड्याच्या पानांवरच लिहिले गेले पाहिजे. छापील पुस्तक त्यांना चालत नाही. सिनेगॉगबाहेर मात्र छापील पुस्तकाचा वापर करता येतो. ज्यू समाजात अशा पुस्तक लिहिणाऱ्यास मानाचे स्थान आहे.
कागदाची पुस्तके
संपादनअरब लोकांनी पुस्तक निर्मितीत मध्ययुगीन इस्लामिक सुवर्णयुगादरम्यान क्रांती आणली. ८व्या शतकात चिनी लोकांकडून कागद निर्मिती शिकल्यावर पुस्तक निर्माण करण्यात ते प्रथम होते. [१२]
यासाठी त्यांनी विशेष कौशल्ये आत्मसात केली आहेत. पुस्तकनिर्मितीत काम करणाऱ्यांना 'वराक्विन' असे नाम होते. त्यांनी वजनाने हलकी, रेशमाने शिवलेली व तक्त्यावर चामडी आच्छादन असलेली पुस्तके निर्माण केली. त्यांनी वापरलेला कागद हा ओलावा-रोधक होता. त्यामुळे वजनदार पुठ्ठ्याचे कव्हर वापरायची गरज नसे. मराकेच व मोरोक्को या शहरात पुस्तकनिर्मितीच एक नवा उद्योग सुरू झाला. १२व्या शतकात तेथे 'कुतुबिय्यिन' नावाचा एक रस्ता होता जेथे सुमारे १०० च्या वर पुस्तकांची दुकाने होती. कौतौबिया मशिदीचे नाव त्यावरूच पडले कारण ती त्या ठिकाणी होती. डॉन बेकरच्या शब्दांत,
इस्लामी जगताने आजपर्यंत तयार करण्यात आलेली काही सर्वात सुंदर पुस्तके निर्माण केली आहेत. त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वचनांची उद्धरणे अत्यंत सुंदर रीतीने जगापुढे आणून या जुन्या कलेला पुनरुज्जीवित ठेवले. चीनशिवाय इतरत्र कुठेच लेखनावर इतक्या चांगल्या प्रकारे भर देण्यात आलेला नाही. सोन्याने व चटकदार रंगांनी चित्रकारी करून संपूर्ण पुस्तक चांगल्या पुस्तकबांधणीने सुरक्षित केलेले असते.—डॉन बेकर,[१३]
आधुनिक पुस्तके ही प्रकाशनासाठी खास निर्मिलेल्या कागदांवर छापली जातात. पारंपरिकरीत्या पुस्तकांचे कागद हे मळकट पांढरे अथवा कमी शुभ्र असतात. त्यामुळे वाचन सुलभ होते. एका बाजूवरील छपाई दुसऱ्या बाजूस दिसू नये इतपत जाड कागद असतात. शक्यतोवर, पुस्तकांचे कागद हे वजनाने हलके ६० ते ९० ग्रॅम प्रति चौरस मीटर या घनतेचे असतात. या वजनास अनुसरून व किती पाने आहेत त्यावरून पुस्तकाची बांधणी ठरवली जाते. कागद निवडीसाठी पुस्तकाचा प्रकार आणि त्यामधील मजकूरदेखील विचारात घेतला जातो. कागदाची पुस्तके हे नेहमी वापरात राहते. हातानि कगद तयार् करन्याचे काम मध्ययुगात भारतात सुरू झाले.
लाकडी ठोकळ्याने छपाई
संपादनलाकडी ठोकळ्याने छपाई करण्याच्या पद्धतीत, एका विशिष्ट पानाचे विरुद्धरूप लाकडाच्या ठोकळ्यावर कोरण्यात येत असे. त्या ठोकळ्यास मग शाई लावून त्या पानाच्या प्रति काढण्यात येत असत. या पद्धतीचे मूळ चीन देशात हान राजवंशादरम्यान होते. ही पद्धत कापड व मग कागदावर छपाईसाठी पूर्व आशियात वापरण्यात येत असे. या पद्धतीने छापले गेलेले पुस्तक 'डायमंड सूत्र' हे आहे(८६८ ख्रिस्तपूर्व). ही पद्धत चीनमध्ये १४व्या शतकाच्या सुरुवातीस पोचली. ब्लॉकने तयार केलेली पुस्तके, खेळाचे पत्ते, धार्मिक चित्रे याद्वारे बनविण्यात येत असत. पूर्ण पुस्तक या पद्धतीने बनविणे हे कष्टदायक काम होते. प्रत्येक पानासाठी हाताने कोरलेला लाकडाचा ठोकळा आवश्यक होता. ते ठोकळे जास्त काळ ठेवल्यास तडकत असत. जे लोकं यात काम करीत असत त्यांना चांगली कमाई मिळत असे.
हाताळता येण्याजोगे टंक व प्रारंभिक काळातील पुस्तके
संपादनपी शेंग या चिनी संशोधकाने इ.स. १०४५ दरम्यान मातीच्या भांड्यासाठी वापरण्यात येणारा सिरका वापरून हलविण्याजोगे/हाताळता येण्याजोगे टंक बनविले. त्याद्वारे केलेल्या छपाईचे उदाहरण उपलब्ध नाही.कोरिया येथे धातूचे टंक सन १२३० चे सुमारास शोधले गेले परंतु त्यांचा वापर तेवढा नव्हता. त्याचे एक कारण म्हणजे चिनी भाषेत असलेली अनेक अक्षरे. सन १४५० च्या दरम्यान,जोहान्स गुटेनबर्गने धातूचे टंक शोधले. त्याने पुस्तकांच्या किंमती कमी झाल्या व पुस्तके सर्वत्र मिळणे शक्य झाले.
आधुनिक जग
संपादनसन १८०० च्या दरम्यान व त्यानंतर लगेच, वाफचलित छापखाने प्रचलित झाले.या मशिनी सुमारे ११०० तावांची छपाई एका तासात करीत असत.परंतु कामगार हे २००० अक्षरे प्रति तास इतकीच टंकजुळवणी करू शकत. मोनोटाईप व लिनोटाईप मशीन्स ह्या १९व्या शतकाच्या शेवटी पदार्पण करत्या झाल्या.त्याद्वारे सुमारे ६००० अक्षरे एका तासात जुळवित्या येत असत.एका ओळीस लागणारे टंक एकदाच जोडल्या जाऊ शकत. १५व्या शतकानंतरे अनेक शतके हे छपाई मशीनच्या सुधारणेत गेले. छपाईच्या अधिकाराचे नियम शिथिल करण्यात आलेत. २०व्या शतकाच्या मध्यात युरोपमध्ये, २,००,००० पुस्तके प्रति वर्ष इतके पुस्तकाचे उत्पादन होते.
आधुनिक जगातील पुस्तक निर्मिती
संपादन१५व्या शतकापासून २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुस्तकांची छपाई व बांधणी ही मूलतः तशीच राहिली. फक्त त्यात बरेचसे यांत्रिकीकरण आले.
गुटेनबर्गचे संशोधन हे हाताळतायेण्याजोगे टंक होते. ते एकमेकांना जोडून शब्द, वाक्य व पाने तयार करून मग छपाई होते. लेटरप्रेस छपाईच्या पद्धतीत शाई ही जोडलेल्या टंकांवर पसरवून मग ती छपाईदरम्यान कागद त्यावर दाबला गेल्यामुळे कागदावर लागत होती. अद्यापही ही पद्धत सुरू आहे.
आजकाल, जास्तीत जास्त पुस्तके ही ऑफसेट लिथोग्राफी पद्धतीने छापली जातात. या पद्धतीत छपाई हवी असलेल्या साहित्याची छायाप्रत ही एका पातळ धातूच्या पत्र्यावर अंकित केली जाते. नंतर ती डेव्हलप केली जाते. त्यात अंकन व इतर भाग अश्या तऱ्हेने तयार केले जातात की ते पाणी व शाईतला फरक जाणू शकतात. छपाई दरम्यान, त्या पत्र्यावर पाणी पसरविले जाते. जेथे अंकन केलेया गेले असते ते क्षेत्र पाणी बाजूस सारते. तेथे शाई लागते. ती शाई मग एका रबरी साहित्यावर पाठविली जाते. त्यावरून मग कागदावर छपाई होते.
जेव्हा एखाद्या पुस्तकाची छपाई होते तेव्हा पुस्तकाची पाने अशा प्रकारे ठेविली जातात, की जेणेकरून त्या तावाची घडी केल्यावर पानांचा क्रम योग्य तऱ्हेने येईल. पुस्तके ही आजकाल एका विशिष्ट आकाराचीच असतात.
कापणी/कटाई ही कागदाच्या वरच्या व खालच्या बाजूने सुमारे १/८" जागा मोकळी सोडून होते. घड्या कापल्या गेल्याने पाने सुटी होतात. पुस्तकाचे आकारमान हे छापला गेलेला व मग घडी केलेला ताव कापल्यावर जसा उरतो त्यावरून ठरते. गेल्या २०० ते ३०० वर्षांत हे आकारमान बदललेले नाही.
पुस्तकाच्या मापाची काही उदाहरणे:
4-1/4” x 7” (rack size कागदी बांधणी)
5-1/8” x 7-5/8” (डायजेस्ट मासिकाचे माप कागदी बांधणी)
5-1/2” x 8-1/4”
5-1/2” x 8-1/2”
6-1/8” x 9-1/4”
7” x 10”
8-1/2” x 11”.
ही मापे छापखान्यानुसार व कटाईच्या अचूकतेनुसार थोडीफार बदलू शकतात. वर दिलेले आकार बदलून कोणी थोड्या वेगळ्या पण मिळत्याजुळत्या आकाराची पुस्तके पण छापतात. ब्रिटनमध्ये ही मानके वेगळी आहेत.
वेब प्रेस मध्ये छपाई ही एक कागदाची सलग गुंडाळी(रोल) वापरून करतात. त्यात कमीतकमी वेळात जास्तीतजास्त प्रति छापल्या जातात. शीट फेड प्रेसमध्ये कागदाची एक थप्पी मशीनच्या दुसऱ्या बाजूस असते. त्यातील एकेक ताव दोन्ही बाजूस छापला जाऊन मग बाहेर निघतो. हे छापलेले ताव मशीनद्वारेच घड्या करून कापले जातात. यातून ३२ पाने निघतात, पण कधी-कधी १६, ४८ किंवा मग ६४ पानेही असू शकतात. ती पाने मग क्रमाने रचली जातात. प्रत्येकातून एक संच घेऊन मग पुस्तक बनते. या घडी केलेल्या एका संचास 'सिग्नेचर' म्हणतात. या पद्धतीने छापताना-कापताना काही पाने खराब होतात व बिघडतात. म्हणून पुस्तक छापतांना जास्तीचे संच तयार करण्यात येतात. खराब छपाईची पाने वगळून आवश्यक तेवढीच पुस्तके तयार होतात. छपाईच्या वेळेस योग्य बिनचूक छपाई सुरू होईपर्यंत अचूकता बघण्यासाठी काही ताव वाया जातात.
मग ते पुस्तक बांधणीस जाते. काही कंपन्या फक्त बांधणीच करतात, तर काही छपाई व बांधणी. आजकाल, यांत्रिकीकरणामुळे मानवी पुस्तक बांधणीची ही पद्धत कमी होत आहे. पुस्तकबांधणीत मुखपृष्ठ व मलपृष्ठ यासाठी वेगवेगळे साहित्य वापरले जाते. जाड कागद वा खर्डा. जाड कागदाच्या पुस्तकबांधणीत कागद हा पानांच्या आकाराचाच असतो. खर्डा वापरून केलेल्या बांधणीत, तो पानाच्या आकारांपेक्षा १/८" इतका सर्वबाजूंनी जास्त असतो. बांधणीचे वेळी एक जास्तीचा कोरा कागद पुस्तकाच्या पुढे व मागे जोडला जातो. पुस्तकाच्या पानाच्या जाडीपेक्षा हा जास्त जाड असतो. मशीनने केलेल्या खर्ड्याच्या बांधणीत, पुस्तकाची उघडी उजवीकडची बाजू रोलरने दाबली जाते. त्याने त्या पुस्तकास त्या बाजूस अंतर्वक्र ब बांधणी असलेल्या बाजूस बहिर्वक्र आकार येतो. याच रीतीने कापडि बांधणी व चामड्याची बांधणीपण होते.
यामधील क्रम थोडा बदलू शकतो. यात घडी केलेले ताव एकत्र शिवलेही जाऊ शकतात. याने पुस्तकास मजबुती येते. यात अनेक प्रकार आहेत. यांत 'स्मिथ' प्रकाराने व 'मॅकेन' प्रकाराने शिवण्याचा अंतर्भाव आहे. शाळेची पुस्तके वरून खालपर्यंत छिद्र पाडून शिवली जातात. एया पुस्तकांचा जास्त जीवनकाल हवा असतो वा जी जास्त हाताळल्या जातात ती शक्यतोवर संच शिवून बनतात. मग पुस्तके खोक्यात टाकून हवी असतील त्या ठिकाणी पाठविली जातात.
पुस्तकांच्या निर्मितीत नुकताच झालेला बदल म्हणजे डिजिटल छपाई हा आहे. पुस्तके ही कार्यालयात असलेल्या कॉपियर यंत्रासारखीच छापली जातात. त्यात शाईऐवजी 'टोनर' वापरला जातो. एकएक करून ताव किंवा 'सिग्नेचर' तयार न करता, संपूर्ण पुस्तकच एकदम छापले जाते. यात अत्यंत कमी प्रमाणात पुस्तके छापता येतात व तावांची नासाडी होत नाही. वेब प्रेस मध्ये २००० च्या वर, शीट फेड प्रेस मध्ये २५० ते २००० पुस्तके तर डिजिटल छपाईत २५० पेक्षा कमीही पुस्तके छापली जाऊ शकतात .अर्थात हे आकडे अंदाजी आहेत. पुस्तकाच्या गुणधर्मानुसार व पुरवठादारानुसार ते बदलू शकतात. 'मागणीनुसार छपाई' हे तत्त्व डिजिटल छपाईने शक्य होते. ग्राहकाची मागणी (ऑर्डर) मिळाल्यावरच छपाई सुरू होते.
डिजिटल छपाईची सुरुवात
संपादनई-पुस्तक हा शब्द इलेक्ट्रॉनिक पुस्तक या शब्दाचे लघुरूप आहे. ते म्हणजे पारंपरिक पुस्तकाचे डिजिटल संस्करण होय. या प्रकारचे पुस्तक हे इंटरनेट, सी.डी. वगैरे स्वरूपातही मिळू शकते. ते फक्त संगणकावर वाचले जाई शकते. ई-पुस्तकांची नकल करून वाचक जमा करून ठेवू शकतात व सवडीने वाचू शकतात. यांत अनेक कंपन्यांची वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे उपल्ब्ध आहेत. ही उपकरणे छापलेले पुस्तक पाने उलटून वाचण्याचा अनुभव देतात.
२०व्या शतकात,गंथालयांनी पुस्तक प्रकाशनांची जास्तीत जास्त गती नोंदविली आहे. यास कधीकधी माहितीचा स्फोट असे म्हणतात.इलेक्ट्रॉनिक प्रकाशन व आंतरजालामुळे अनेक नवीन माहिती ही पुस्तकांत छापली जात नाही. तर ती डिजिटल ग्रंथालयांद्वारे ऑनलाइन स्वरूपात किंवा सी.डी.वर वा ई-पुस्तकाद्वारे उपलब्ध केली जाते. ऑनलाइन पुस्तक हे एक प्रकारचे ई-पुस्तकच आहे. हे आंतरजालाद्वारे ऑनलाइन उपलब्ध होते.
जरी अनेक पुस्तके ही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतात, तरी त्यातील अनेक पुस्तके सामान्य जनतेस मिळत नाहीत. म्हणून कागदी पुस्तक प्रकाशनाचे प्रमाण कमी झालेले नाही.[ संदर्भ हवा ].सार्वजनिक स्वरूपात असलेल्या पुस्तकांना डिजिटल संस्करणात बदलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनिर्बंध पुनर्वितरण व प्रचंड उपलब्धताही आहे. या उपक्रमात, गुटेनबर्ग प्रकल्प अग्रेसर आहे तर, जगभर विखुरलेले टंकमुद्रणशोधक सामील आहेत.
पुस्तक प्रकाशनाच्या तंत्रात नवीन विकास झाला आहे.मागणीप्रमाणे छपाई याद्वारे एक लाख पुस्तके एका वेळेस छापता येतात. याने स्वयंप्रकाशन हे सोपे व परवडणारे झाले आहे. प्रकाशकांचा गोदामांचा खर्च कमी झाला आहे. कमी विक्री असलेली पुस्तके 'छापलेली नाहीत' असे कळविणे यापेक्षा ती छापणे शक्य झाले आहे. ग्रंथ असेही म्हणतात .
पुस्तकांची आखणी/ बांधणी
संपादन- आवळपट्टा
- वेष्टन
- टोकाची पाने
- पुस्तकाचे मुखपृष्ठ
- वरची कड
- बाजूची कड
- खालची कड
- डावीकडील पान
- उजवीकडील पान
- पन्हाळी
]]
The common structural parts of a book include:
- मुखपृष्ठ: जाड वेष्टन or कमी जाड वेष्टन (जाड कागदाचे); the कणा is the binding that joins the front and rear covers where the pages hinge.
- समोरील टोकाचे पान
- कोरे पान: The blank leaf or leaves following the front free endpaper.
- Front matter
- Frontispiece
- मथळ्याचे पान
- प्रताधिकाराचे पान: typically verso of शीर्षक page: shows copyright owner/date, credits, edition/printing, cataloguing details
- अनुक्रमणिका
- चित्रांची/रेखाटनांची यादी
- तक्त्यांची यादी
- समर्पणाचे पान
- आभारप्रदर्शनाचे पान
- प्रस्तावना
- पुढे जाण्यापूर्वी
- Introduction
हे सुद्धा पहा
संपादननोंदी व संदर्भ
संपादन- ^ Avrin, Leila. Scribes, script, and books: the book arts from antiquity to the Renaissance. New York, New York. p. ८३.
- ^ Dard Hunter. Papermaking: History and Technique of an Ancient Craft New ed. Dover Publications 1978, p. 12.
- ^ Leila Avrin. Scribes, Script and Books, pp. 144–145.
- ^ The Cambridge History of Early Christian Literature. Edd. Frances Young, Lewis Ayres, Andrew Louth, Ron White. Cambridge University Press 2004, pp. 8–9.
- ^ Leila Avrin. Scribes, Script and Books, p. 173.
- ^ Bischoff, Bernhard. Latin palaeography antiquity and the Middle Ages. Dáibhí ó Cróinin द्वारे भाषांतरित. Cambridge. p. ११.
- ^ Martin D. Joachim. Historical Aspects of Cataloguing and Classification. Haworth Press 2003, p. 452.
- ^ Edith Diehl. Bookbinding: Its Background and Technique. Dover Publications 1980, pp. 14–16.
- ^ Bernhard Bischoff. Latin Palaeography, pp. 16–17.
- ^ Paul Saenger. Space Between Words: The Origins of Silent Reading. Stanford University Press 1997.
- ^ Bernhard Bischoff. Latin Palaeography, pp. 42–43.
- ^ Al-Hassani, Woodcock and Saoud, "1001 Inventions, Muslim heritage in Our World", FSTC Publishing, 2006, reprinted 2007, pp.218-219.
- ^ Baker, Don, "The golden age of Islamic bookbinding", Ahlan Wasahlan, (Public Relations Div., Saudi Arabian Airlines, Jeddah), 1984. pp. 13-15 [13]
लहान मुलांच्या
संपादनDefinitions from Wiktionary | |
Media from Commons | |
News stories from Wikinews | |
Quotations from Wikiquote | |
Source texts from Wikisource | |
Textbooks from Wikibooks | |
Learning resources from Wikiversity |
- Centre for the History of the Book Archived 2008-06-24 at the Wayback Machine.
- Manuscripts, Books, and Maps: The Printing Press and a Changing World Archived 2012-07-02 at the Wayback Machine.
- Society for the History of Authorship, Reading and Publishing
- Old Books, How to find information on publication history and value (1998) Smithsonian Institution Libraries