खर्डा किल्ला

(खर्डा या पानावरून पुनर्निर्देशित)

खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे.

खर्डा - अजून एक दृश्य

इतिहास

संपादन

खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी १७ व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात. गावामध्ये पुरातन गढी(राजवाडा)आहे. देखरेखअभावी तिची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.गावाच्या बाहेर दक्षिणेला एक भुईकोट प्रकारच्या बांधणीचा किल्ला आहे. गावच्या २ ते ८ किमीच्या अंतरावर जागृत बारा जोतिर्लिंग आहेत.खर्डा शहर ही एक मोठी व्यापार पेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. ११ मार्च १७९५ला येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला ही लढाई झाली. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने ८० हजार सैन्य होते तर निजामाचे १,३०,००० सैन्य रणभूमीमध्ये होते. या रणसंग्राममध्ये जवळपास ४००० सैनिक मारले गेले. गावच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या समरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले गेले.[] शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेडच्या प्रयत्नाने येथील युद्ध भूमीवर तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसवण्यात आली आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Gazetteers Department - AHMADNAGAR". 164.100.185.107. 2020-08-31 रोजी पाहिले.