राजगीर

बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ

राजगीर (अधिकृत नाव: गिरीवराज) हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एक शहर व अधिसूचित क्षेत्र आहे. बिहारची पाटणा ह्या शहरापासून १०० किमीवर आहे. राजगीर ही प्राचीन काळी मगध साम्राज्याची राजधानी होती. त्यानंतर मौर्य साम्राज्य उदयास आले. राजगीरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. वसुमतिपूर, वृहद्रथपूर, गिरिब्रज, कुशाग्रपूर आणि राजगृह या नावांनी सुद्धा हे प्रसिद्ध राहिले आहे. बौद्ध साहित्यानुसार, बुद्धांची साधनाभूमी राजगीरमध्ये आहे. राजगीर हेच २४ वे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे पहिले देशना स्थळ (जेथे उपदेश केला ती जागा)सुद्धा आहे. (देशना म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर एखाद्या जैन तीर्थंकराने सर्वभूतांसमोर केलेले धार्मिक प्रवचन).

राजगीरच्या आसपासच्या उदयगिरी, रत्‍नागिरी, विपुलगिरी, वैभारगिरी, सोनगिरी या टेकड्यांवर जैनांची मंदिरे आहेत. त्यांचे तीर्थंकर महावीर यांनी ज्ञानप्राप्तीनंतरचॆ पहिलाॆ प्रवचन विपुलगिरी टेकडीवर केले होते. राजगीरच्या आसपास जैनांची २६ मंदिरे आहेत, पण तेथे जाणाऱ्या वाटा चालायला अवघड असल्याने तेथ पोहोचणे सोपे नाही.

याच राजगीरमध्ये भीम आणि जरासंध यांचे मल्लयुद्ध झाले. हे मल्लयुद्ध म्हणे १८ दिवस चालू होते. शेवटच्या दिवशी भीमाने जरासंधाचा वध केला. राजगीरमध्ये जरासंधाचा आखाडा आहे. विपुलगिरी ही जरासंधाची राजधानी होती. (महाराष्ट्रातल्या संगमनेर शहराजवळील जोर्वे हे उत्खननाने मिळालेले गावही जरासंधाचे गाव म्हणून ओळखले जाते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत