सरोवर
सरोवर (किंवा तलाव) म्हणजे पृथ्वीवरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]
सरोवर हा शब्द बहुसंख्य मराठी भाषक लोक वापरात नाहीत तळी किंवा तलाव हा शब्द लोकप्रिय आहे
कोल्हापूर हा शब्द मूळ कोल्लापूर या कानडी शब्दावरून बनला आले. यातील कोल्ल या शब्दाचा अर्थ आहे तळं अर्थात तळ्यांचं शहर. रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, पद्माळा अशी अनेक तळी आहेत.
निर्मिती:-
तलावाची निर्मिती ही विविध प्रकारच्या नैसर्गिक प्रक्रियेतून होऊ शकते. जमिनीत होणारी कोणतीही किंवा जी पर्जन्यवृष्टी एकत्रित करते आणि राखून ठेवते. त्याला तलाव असे म्हणतात. अशा प्रकारचे निराशा वेगवेगळ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटनेद्वारे तयार केली जाऊ शकते. वसंत ऋतु मधील पूरानंतर नद्या नैसर्गिक तलावाच्या मागे तलावांच्या मागे सोडतात आणि माशांच्या प्रजननासाठी विशेषतः अमेझॉनसारख्या मोठ्या नद्यांच्या प्रणालींमध्ये हे फार महत्त्वाचे आहे.हिमनग मागे घेण्यामुळे लहान डिप्रेशनने भरलेल्या लँडस्केप मागे राहू शकतात.प्रत्येकजण स्वतःचा तलाव विकसित करतो; उत्तर अमेरिकेचा प्रेयरी प्रदेश हे त्याचे एक उदाहरण आहे. लँडस्केपच्या बऱ्याच भागात लहान भाग असते. ज्यामध्ये, वसंत ऋतु हिम वितळल्यानंतर किंवा पावसाळ्यात हंगामी तलाव तयार करतात; यास व्हेर्नल तलाव म्हणतात आणि उभयचर प्रजननासाठी महत्त्वपूर्ण साइट असू शकतात.काही तलाव प्राणी तयार करतात. बीव्हर तलाव हे एक सुप्रसिद्ध उदाहरण आहे, परंतु अॅलिगेटर देखील तलावाचे उत्खनन करतात. सेंद्रिय माती असलेल्या लँडस्केप्समध्ये, दुष्काळाच्या काळात भीषण आग निर्माण होऊ शकते; जेव्हा सामान्य पाण्याची पातळी परत येते तेव्हा हे ओपन वॉटर बनतात.
उल्लेखनीय सरोवरे
संपादन- मिशिगन-ह्युरॉन सरोवर हे एकत्रित सरोवर जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५० वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर सुपिरियर सरोवर ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला कॅस्पियन समुद्र हे बऱ्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
- सायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे (२३,६०० किमी३, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी३) लहान आहे.
- ६६० किमी लांबी असलेले टांजानिका सरोवर हे जगातील सर्वात लांब सरोवर आहे.
- बैकाल सरोवर हे जगातील सर्वात जुने सरोवर आहे.
- ओजोस देल सालादो हे आन्देसमधील ज्वालामुखी सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील सर्वात उंच सरोवर आहे (उंची: ६,३९० मीटर (२०,९६५ फूट)).[३]
- तिबेटमधील मानसरोवर हे जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
- ३,८१२ मी (१२,५०७ फूट) उंचीवर असलेले टिटिकाका सरोवर हे आन्देसमधील पेरू व बोलिव्हियाच्या सीमेवरील सरोवर जगातील सर्वात उंच जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.
- इस्रायल व जॉर्डन देशांच्या सीमेवरील मृत समुद्र हे जगातील सर्वात कमी उंचीवरील सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीच्या ४१८ मी (१,३७१ फूट) खाली आहे.
- ह्युरॉन सरोवराला जगातील सर्वात लांब किनारा (२,९८० किमी) लाभला आहे.
खंडांनुसार मोठी सरोवरे
संपादनसर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):
- आफ्रिका - व्हिक्टोरिया सरोवर
- अँटार्क्टिका - वोस्तोक सरोवर (गोठलेले)
- आशिया - बैकाल सरोवर (कॅस्पियन समुद्राला सरोवर मानले तर ते युरेशियामधील सर्वात मोठे सरोवर असेल.)
- ऑस्ट्रेलिया - एर सरोवर
- युरोप - लदोगा सरोवर
- उत्तर अमेरिका - सुपिरियर सरोवर.
- दक्षिण अमेरिका - टिटिकाका सरोवर
पवित्र सरोवरे
संपादनभारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. (याचा आधार काय ?) त्यामुळे या सरॊवरांना भेट देणे ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-
- कच्छमधील नारायण सरोवर
- कर्नाटकातील पंपा सरोवर
- राजस्थानातील पु़्ष्कर सरोवर
- ओरिसामधील बिंदुसागर सरोवर, आणि
* तिबेटमधील मानस सरोवर
भारतभरातील तलावांची परंपरा
संपादनमोठ्या सरोवरान इतकेच महत्त्वाचे आहेत लहान मोठे तलाव संपूर्ण भारतभर लहान मोठ्या तलावांचे अस्तित्त्व आपल्याला पाहायला मिळते. परंतु योग्य देखभाल न झाल्याने आज कितीतरी तलावांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. एक काळ असा होता जेव्हा पाण्याची व्यवस्था करणे त्याचे रक्षण करणे ही सर्व समाजाची जबाबदारी होती.इथला समाज स्वतःच्या हिताच्या गोष्टी स्वतः निर्माण करण्यावर भर देत होता,स्वतःची शक्ती वापरत होता.सत्ताधारी राजा हा जनतेचा सहाय्यक होता. त्यानेच सर्व करावे अशी अपेक्षा नसायची.इंग्रजांच्या आगमनानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी येथील पाणी व्यवस्थेची माहिती जुन्या दस्तावेजामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला.परंतू अशा नोंदी ठेवायची फारशी सवय नसल्याने त्यानी गृहीत धरले कि त्यांनाच खूप काही करायला लागेल. त्यानी माहिती बरीच मिळवली परंतु त्यामागच्या धारणा मात्र समजून घेतल्या नाही.१९ व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांनी सर्वत्र फिरतान मिळालेल्या माहितीच्या आधारे जी gazettier तयार केली त्यामध्ये अनेक मोठ्या तलावांचा उल्लेख मिळतो.
कोणी निर्माण केली ही परंपरा ?
संपादनशेकडो हजारो तलाव निर्माण करणारे हात कोणाचे होते हे शोधताना भारतातील कितीतरी समाजांची नावे मि ळतात.गजधर,टकारी,दुसाध,नौनिया गोंड ,परधान,कोल,ढीमर ,ढीवर,कोळी ,भोई अगरीया ,माळी,भिल्ल ,नाईक सोन्पुरा , महापात्र इ.==<आज भी खरे है तालाब> ==
महाराष्ट्रातील तळी
नवेगाव बांध
- ^ Britannica online. "Lake (physical feature)". 2008-06-25 रोजी पाहिले.
[a Lake is] any relatively large body of slowly moving or standing water that occupies an inland basin of appreciable size. Definitions that precisely distinguish lakes, ponds, swamps, and even rivers and other bodies of nonoceanic water are not well established. It may be said, however, that rivers and streams are relatively fast moving; marshes and swamps contain relatively large quantities of grasses, trees or shrubs; and ponds are relatively small in comparison to lakes. Geologically defined, lakes are temporary bodies of water.
- ^ "Dictionary.com definition". 2008-06-25 रोजी पाहिले.
- ^ Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano
बाह्य दुवे
संपादन- सरोवरांचा डेटाबेस Archived 2008-03-28 at the Wayback Machine.
- सरोवरांचे वर्गीकरण Archived 2008-02-12 at the Wayback Machine.
- जगातील सर्वात रम्य सरोवरे - हफिंग्टन पोस्ट