सईबाई भोसले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री
(सईबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

सईबाई भोसले (२९ ऑक्टोबर १६३३ – ५ सप्टेंबर १६५९) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छ्त्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.

महाराणी सईबाईसाहेब भोसले
जन्म सईबाई निंबाळकर
२९ ऑक्टोबर १६३३
फलटण, महाराष्ट्र
मृत्यू ५ सप्टेंबर १६५९ (२६ वर्ष)
राजगड, पुणे
मृत्यूचे कारण दीर्घ काळ आजार
मूळ गाव फलटण
ख्याती महाराणी
पूर्ववर्ती पद निर्माण
परवर्ती सोयराबाई
धर्म हिंदू
जोडीदार छत्रपती शिवाजी महाराज
अपत्ये सखूबाई निंबाळकर,राणुबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, छत्रपती संभाजी महाराज
वडील मुधोजीराजे निंबाळकर
आई रेऊबाई निंबाळकर

सईबाईंचे या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या पुत्री होत. निंबाळकर तंजावरच्या पवार कुळातील घराणे आहे. सईबाई यांना तलवार बाजीची आवड होती.[ संदर्भ हवा ] सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला. त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते. त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या. त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला. त्यानंतर सईबाईंची तब्येत बाळांतव्याधी मुळे खालावली. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना ५ सप्टेंबर १६५९ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]