सय्यद बंडा
सय्यद बंडा हा अफजलखानाच्या सैन्यातील एक सरदार होता. सय्यद बंडा ने अफजलाखानास् प्रतापगडाच्या लढाईत सोबत कलेली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीदरम्यान अफजलखानाने दगा केला व शिवाजी महाराजांवर बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला.
पहा प्रतापगडाची लढाई
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |