दख्खनचे पठार
दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दख्खन या शब्दाची व्युत्पत्ती "दक्षिण" या संस्कृत शब्दापासून झालेली आहे, या शब्दाचा महाराष्ट्री प्राकृत अपभ्रंश म्हणजे "दख्खन" होय.
महाराष्ट्राचे पठार मुख्यत: अग्निजन्य(बेसाल्ट) खडकापासून बनले आहे. बेसाल्ट खडकांचे थर जवळ जवळ क्षितिजसमांतर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण भूस्वरूपाची रचना पा-य्रांसारखी झाली आहे.या बेसाल्ट खडकांच्या रचनेला 'डेक्कन ट्रयाप ' म्हटले जाते . कर्नाटक-तेलंगाना पठार मुख्यत: कानाश्म आणि पत्तीताश्म खडकांनी बनलेले आहे. कर्नाटकचे पठार 'मैदान' या नावाने ओळखले जाते .
दख्खनच्या पठाराचे पुढील प्रमाणे उपविभाग पडतात.

१ )सातपुडा-महादेव-मैकल रांगा २)महाराष्ट्र पठार ३)कर्नाटक पठार ४)आंध्र-तेलंगणा पठार ५)छोटा नागपूर ,महानदीचे खोरे ,दंडकारण्य आणि गहर्जात डोंगरांनी मिळून बनलेले पूर्वेचे पठार आहे .