सिंधु नदी

दक्षिण आशियातील एक नदी

सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारतपाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे. तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.

सिंधू
इतर नावे उर्दू: دريائسِندھ (दर्या-ए-सिंध)
पंजाबी: ਸਿੰਧ ਦਰਿਆ (सिंध दर्या)
सिंधी: سنڌو درياءَ (सिंधु दर्या)
इंग्लिश: Indus River
उगम मानसरोवर, तिबेट, चीन
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन (तिबेट), भारत, पाकिस्तान
लांबी ३,१८० किमी (१,९८० मैल)
सरासरी प्रवाह ६,६०० घन मी/से (२,३०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ११,६५,०००
उपनद्या गिलगिट, काबूल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी
धरणे तरबेला, गुड्डु बंधारा

इग्रजी भाषेत या नदीला इंडस (Indus) म्हणतात. सिंधु संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. हिंदूहिंदुस्थान हे शब्द याच नदीवरून पडले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे. सिंधू नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे.

सिंधूच्या पाच उपनद्या आहेत. त्यांची नावे : वितस्ता (झेलम), चंद्रभागा, इरावती, विपाशा (बियास), शतद्रू (सतलज). यांतील सतलज सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर भाक्रा-नांगल धरण आहे. या धरणामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब (भारत) आणि हिमाचल प्रदेश मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला. वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर जम्मू आणि काश्मिरची राजधानी श्रीनगर स्थित आहे. सिंध नदी उत्तर भारतातील तीन मोठ्या नदींपैकी एक आहे. याचा उगम बृहद हिमालयामध्ये कैलासहून ५ किमी उत्तरेस सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये आहे. आपल्या उगम स्थानातून निघून तिबेट पठाराच्या रूंद घाटातून काश्मिरच्या सीमेला पार करून, पाकिस्तानातील वाळवंटी आणि सिंचनाखालील भूभागातून वाहत, कराचीच्या दक्षिणेकडील अरबीसमुद्राला मिळते. याची पूर्ण लांबी सुमारे २००० किमी आहे.

बलुचिस्तानमध्ये खाइताशो गावाच्याजवळ हे जास्कर पर्वतरांगाना(पर्वतराजीला) पार करत १०,००० फुटापेक्षा जास्त खोल महाखड्डयामध्ये, जो जगातील मोठ्या खड्ड्यांपैकी एक आहे त्यात वाहते. जेथे ही गिलगिट नदीला मिळते आणि तेथे ही एक वक्र बनवत दक्षिण पश्चिम दिशेस वाकते. अटकमध्ये हे मैदानात पोहचून काबूल नदीला मिळते. सिंधु नदी पहिले आपल्या वर्तमान मुहानेतून ७० किलोमीटर पूर्वेला कच्छच्या रणात विलीन होऊन जाते परंतु रण भरल्यामुळे नदीचा मुहाना आता पश्चिमेला सरकला आहे.

झेलम, चिनाब, रावी (परुष्णी), बियास आणि सतलज सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. याच्या व्यतिरिक्त गिलगिट, काबूल, स्वात, कुर्रम, टोची, गोमल, संगर इत्यादी अन्य उपनद्या आहेत. मार्चमध्ये बर्फ वितळल्यामुळे यात अचानक भयंकर पूर येतात. पावसाळ्यात मोसमी वाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढते. सप्टेंबरमध्ये पाण्याची पातळी कमी होते आणि हिवाळ्यापर्यंत कमीच असते. सतलज आणि सिंधूच्या संगमाजवळ सिंधूचे पाणी मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी प्रयुक्त होते. सन १९३२ मध्ये सक्खरमध्ये सिंधू नदीवर लॉयड बंधारा बनला आहे ज्या द्वारे ५० लाख एकर जमिनीचे सिंचन केले जाते. जेथे जेथे सिंधू नदीचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे तेथे गव्हाची शेती प्रामुख्याने होते आणि त्या व्यतिरिक्त कापूस आणि अन्य धान्याची ही शेती होते तसेच जनावरांसाठी गायरान होते. हैदराबाद (सिंध)च्या पुढे नदी ३,०० वर्ग किमीचा बनवते. गाद आणि नदीने मार्ग बदलल्यामुळे नदीत नौकानयन धोकादायक आहे.

उपनद्या

संपादन

बियास नदी चिनाब नदी गार नदी गिलगिट नदी गोमल नदी हुनजा नदी झेलम नदी काबूल नदी कुनार नदी कुर्रम नदी पानजनाद नदी रावी नदी श्योक नदी सून नदी सुरू नदी सतलज नदी स्वात नदी जास्कर नदी झॉब नदी