झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

झेलम
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य
इतर नावे

جہلم (उर्दू) ਜਿਹਲਮ (पंजाबी) झेलम (देवनागरी)

Vyeth (ویتھ/व्यथ) (कश्मीर)
उगम वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत: जम्मू आणि काश्मीर
पाकिस्तान: पंजाब
लांबी ७२५ किमी (४५० मैल)
ह्या नदीस मिळते सिंधू नदी
उपनद्या नीलम नदी,लिद्दर नदी,सिंधु नदी
धरणे मंगला धरण

इतिहास

संपादन

झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes)(ग्रीकः Υδάσπης) या नावाने ओळखत.[]

झेलम नदीच्या काठी अलेक्झांडरचा सामना पंजाबचा राजा पोरस याच्याशी झाला.[]

संस्कृत भाषेत झेलम नदीचे नाव 'वितस्ता' असे आहे ; हे नाव प्राचीन संस्कृत ग्रंथ ऋग्वेद वेदामध्ये नदीस्तुती सूक्तामध्ये झेलम नदीचा उल्लेख आढळते.[] ऋग्वेद वेदात सात प्रमुख (सप्त सिंधु )नद्यापैकी एक आहे.कश्मीरी भाषेत झेलम नदीला 'व्यथ' या नावाने संबोधतात[]

श्लोक

इमं मे गङ्गे यमुने सरस्वति शुतुद्रि स्तोमं सचता परुष्ण्या ।

असिक्न्या मरुद्वृधे वितस्तयार्जीकीये शृणुह्या सुषोमया ॥५॥ ऋ.१०.७५.५[][]

श्रीमद्भागवत नामक प्रमुख धार्मिक ग्रंथानुसार, प्राचीन भारतामधून वाहणारी प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे 'वितस्ता' होय.[]

‘नदीं वेत्रवतीं चैव कृष्णवेणांच निम्नगाम्, इरावती वितस्तांच पयोष्णीं देविकामपि।' -भीष्मपर्व[]

प्रवाह

संपादन

झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झऱ्यातून उगम पावते.[] नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c d "Jhelum River". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-18.
  2. ^ a b "प्राचीन काश्मिर प्रांताचा अज्ञात इतिहास". www.tarunbharat.net (इंग्रजी भाषेत). 2021-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-18 रोजी पाहिले.
  3. ^ "ऋग्वेदः सूक्तं १०.७५ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2020-01-18 रोजी पाहिले.
  4. ^ "वितस्ता नदी - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-01-18 रोजी पाहिले.
  5. ^ "झेलम नदी". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-04-21.