राजदूत हा अधिकृत दूत असतो, जो विशेषतः उच्च दर्जाचा मुत्सद्दी असून तो एखाद्या राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करतो. तो सामान्यतः दुसऱ्या सार्वभौम राज्यामधील किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेमधील त्याच्या स्वतःच्या सरकारचा निवासी प्रतिनिधी असतो. तो अनेकदा तात्पुरत्या राजकीय कार्यासाठी नियुक्त केलेला असतो. []

पर्शियाचे राजदूत दाऊद जदौर

हा शब्द अनौपचारिकपणे अशा लोकांसाठी देखील वापरला जातो जे राष्ट्रीय नियुक्तीशिवाय विशिष्ट व्यवसाय, क्रियाकलाप आणि विक्रीसारख्या इतर काही क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.

राजदूत हा परदेशी राजधानीमध्ये किंवा देशात तैनात असलेला सरकारी प्रतिनिधी असतो. यजमान देश सामान्यत: राजदूतांना दूतावास नावाच्या विशिष्ट प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतो, ज्याचा प्रदेश, कर्मचारी आणि वाहनांना यजमान देशामध्ये राजनैतिक संरक्षण दिले जाते. व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन डिप्लोमॅटिक रिलेशन्स अंतर्गत राजदूताला सर्वोच्च राजनैतिक दर्जा असतो. काही वेळा विविध देश हे राजदूताच्या जागी प्रभारी नियुक्त करून राजनैतिक संबंध निम्न स्तरावर ठेवण्याचे निवडू शकतात.

राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्यांमध्ये देवाणघेवाण केलेल्या राजदूताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना उच्चायुक्त म्हणून ओळखले जातात. होली सीचे राजदूत पापल किंवा अपोस्टोलिक नन्सिओस म्हणून ओळखले जातात.

संदर्भ

संपादन
  1. ^ "ambassador". merriam-webster.com.