शाहजहान, जन्मनाव खुर्रम, ( जानेवारी ५, इ.स. १५९२; लाहोर, पंजाब (पाकिस्तान) - जानेवारी २२, इ.स. १६६६; आग्रा;) हा मुघल सम्राट व औरंगजेबाचा पिता होता. मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह जहांगिराशी इ.स.१५८६ साली झाला. तूळ रास राशिमंडळात असताना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानले जात असल्यामुळे दरबारी फलज्योतिषांनी त्यांची कुंडली तयार करून त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तवले होते. खुर्रम या नावाचा अर्थ आनंददायी असा होतो.

शाहजहान
Shahjahan.jpg
पूर्ण नाव गियासुद्दीन मुहम्मद
जन्म जानेवारी ५, इ.स. १५९२
लाहोर, पंजाब (पाकिस्तान)
मृत्यू जानेवारी २२, इ.स. १६६६
उत्तराधिकारी औरंगजेब
वडील जहांगीर
आई राणी मानमती
पत्नी * अकबराबादी महल (मृत्यू: इ.स. १६७७)
 • कंदाहारी महल (जन्म इ.स. १५९४, मृत्यू. इ.स. १६०९)
 • मुमताज महल (जन्म इ.स. १५९३, विवाह इ.स. १६१२, मृत्यू इ.स. १६३१)
 • हसीना बेगम साहिबा (विवाह : इ.स. १६१७)
 • मुती बेगम साहिबा
 • कद्सिया बेगम साहिबा
 • फतेहपुरी महल साहिबा (मृत्यू इ.स. १६६६ नंतर)
 • सरहिंदी बेगम साहिबा (मृत्यू इ.स. १६५० नंतर)
 • श्री मनभावती बाईजी लाल साहिबा (विवाह इ.स. १६२६)
 • लीलावती बाईजी लाल साहिबा (विवाह इ.स. १६२७ पूर्वी) [१]
संतती *
राजघराणे मुघल

बालपणाची चार वर्ष आणि चार महिने संपल्यानंतर खुर्रमाचे राजपुत्र म्हणून शिक्षण सुरू झाले. तुर्की भाषेबरोबर नेमबाजी, घोडेस्वारी, तलवारबाजी यांत शहाजहानाला रुची होती [ संदर्भ हवा ]. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २१ मार्च, इ.स. १६०७ रोजी शहाजहानाला पहिली लष्कर मनसब देण्यात आली.[२]

संदर्भ व नोंदीसंपादन करा

 1. ^ "मुघल वंशपरंपरा" (इंग्रजी भाषेत).
 2. ^ प्राचार्य डॉ. एस.एस. गाठाळ. मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७).