कृष्णा नदी
![]() |
कृष्णा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
कृष्णा | |
---|---|
![]() श्री शैल्यम, आंध्र प्रदेश येथील कृष्णा नदीने तासलेल्या घळीतून नदीपात्राचे दृश्य | |
उगम | सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर येथील पंचगंगेश्वर या मंदिरातून. |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा |
लांबी | १,४०० किमी (८७० मैल) |
उगम स्थान उंची | १,१३६ मी (३,७२७ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २.९५ लाख |
उपनद्या | कुडाळी(कृष्णा नदीला मिळणारी पहिली उपनदी उडतारे ता. वाई वेण्णा संगम माहुली , कोयनाकराड, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा |
धरणे | धोम, अल्लमट्टी, श्रीशैलम, नागर्जुनसागर |
कृष्णा नदी (मराठी: कृष्णा नदी; कन्नड: ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ; तेलुगू: కృష్ణా నది ;) ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,४०० कि.मी. अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये ती वाई, भुईंज, चिंधवली, लिंब गोवे, उडतरे, माहुली(सातारा) कऱ्हाड, औदुंबर, सांगली,मिरज नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीचा प्रवास २८२ कि.मी.चा आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात. कृष्णा नदीच्या खोऱ्याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते.
आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.

कृष्णा नदी आता बंगालच्या उपसागराला मिळत नाही कारण आता त्या नदीच पाणी धरणाच्या साह्याने आडवुन प्रत्येक राज्या स्वःताच्या संपुर्ण राज्यात पाणी फिरवण्याच काम करत आहेत त्यामुळे दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचे काम होत आहे.[१]
इ.स. सन १२१५ मध्ये यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वराच्या हेमांडपंथी शिवमंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले. त्या देवळाच्या जवळपास कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे, असा सर्वसामान्य भाविकांचा समज असतो.[२]
दक्षिणी भारतातील इतर काही ठिकाणांप्रमाणेच कृष्णेच्या खोऱ्यातही अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहेत.[ संदर्भ हवा ]
अनुक्रमणिका
नदीकाठची शहरे, मानवी वस्ती व संस्कृती संपादन करा
कऱ्हाड, वाई, सांगली, वाळवा, (वाळवा शिरगांव), (नगराळे)मिरज, औदुंबर,(भिलवडी),सुखवाडी, (येरळा-कृष्णा संगम) , म्हैशाळ, अंकलखोप, भिलवडी, औदुंबर, तुंग, कसबे डिग्रज,कुरुंदवाड, चिक्कोडी, धनगांव, धोम,(नरसोबाची वाडी)नृसिंहवाडी, पसरणी, बहे, माहुली, मेणवली, उगारखुर्द, कुडची, रायबाग, उडतरे, भुईंज, कुरुवपूर, संतगाव, उदगांव, गौरवाड, औरवाड, गणेशवाडी, अथणी, शेडशाळ, जुगुळ[कर्नाटक], बुबनाळ, आलास, अर्जुनवाड, चिंचवाड, कुटवाड, कनवाड, घालवाड, शिरटी, हासुर.
साहित्य संपादन करा
- समर्थ रामदासांनी कृष्णा नदीची आरती लिहिली आहे.
- कृष्णा (लेखक - अरुण करमरकर)
भौगोलिक संपादन करा
कृष्णा खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ २,५८,९४८ चौरस. कि.मी. आहे. या एकूण क्षेत्रफळापैकी २८,७०० चौ. कि.मी. क्षेत्र महाराष्ट्रात, ११३२७१ चौ. कि.मी. म्हणजे ४४ टक्के क्षेत्र कर्नाटकात तर ७६२५२ चौ. कि.मी. म्हणजे २९ टक्के क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे.
उपनद्या संपादन करा
- कुडाळी, वेण्णा,उरमोडी,तारळी,या सातारा जिल्ह्यातील कृष्णेच्या उपनद्या तर वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख उपनद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून सांगली जिल्ह्यातील तिचा प्रवाह १३० किमी.चा आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिमेकडून पूर्वेकडे व त्यानंतर आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा सांगली जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा,अग्रणी व या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात.
- अग्रणी नदी कृष्णा नदीला अथणी येथे मिळते
- उरमोडी नदी कृष्णा नदीस काशीळ येथे मिळते.
- कोयना नदी कृष्णा नदीस कऱ्हाड येथे मिळत,त्या संगमला प्रितिसंगम असेही म्हणतात.
- डिंडी नदी कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
- तुंगभद्रा नदी कृष्णा नदीस संगमेश्वर येथे मिळते.
- दूधगंगा नदी, ही कृष्णा नदीस ..... येथे मिळते.
- पंचगंगा नदी कृष्णा नदीस नरसोबाची वाडी (कोल्हापूर जिल्हा) येथे मिळते.
- कुडाळी(निरंजना)नदी कृष्णा नदीस उडतारे येथे मिळते.(कृष्णा नदीस मिळणारी पहीली उपनदी)
- भीमा नदी कृष्णा नदीस कर्नाटकात कुरूगुड्डी येथे मिळते.
- मलप्रभा नदी कृष्णा नदीस कुडाळसंगम येथे मिळते.
- मुशी नदी कृष्णा नदीस वडपल्ली येथे मिळते.
- येरळा नदी कृष्णा नदीस ब्रम्हनाळ येथे मिळते.
- वारणा नदी कृष्णा नदीस हरिपूर (सांगली जिल्हा) येथे पश्चिमेकडून वारणा नदी मिळते.
- वेण्णा नदी कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते.
प्रदूषण संपादन करा
कृष्णा नदीच्या जवळपास असणारे साखर कारखाने, इतर उद्योग आणि गावांचे सांडपाणी यामुळे प्रदूषण वाढले आहे. यामुळे मासे मृत होण्याच्या घटना घडत असतात. जुलै २०१९ मध्ये नदीतील विषारी रसायनांमुळे असंख्य मासे मृत होऊन नदीकाठच्या गावांत दुर्गंधी पसरली होती.[३] याच काळात पाच वर्षाच्या मोठ्या मगरीचा मृत्यू हे मासे खाल्याने झाला होता.[४]
जलव्यवस्थापन संपादन करा
संदर्भ संपादन करा
- ^ श्री कृष्णा महात्म्य - प्रस्तावना विदागारातील आवृत्ती
- ^ जिल्हापरिषद साताराचे संकेतस्थळ
- ^ माने, कुलदीप. "साखर कारखान्यांतील मळी मिश्रीत पाण्यामुळे कृष्णा नदीत मृत माशांचा खच". १६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "मृत मासे खाल्ल्याने मगरीचा मृत्यू". १६ जुलै २०१९ रोजी पाहिले.
पहा संपादन करा
महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
बाह्य दुवे संपादन करा

- कृष्णा नदीची माहिती Archived 2010-12-27 at the Wayback Machine.
- कृष्णेचा प्रागैतिहासिक कालखंड
- कृष्णेची कालरेषा