Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


वाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे.आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी . या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक जिवंत रसरशीत कर्तबगार गाव.वाळवा तालुका हा सांगली शहराच्या

वाळवा गाव स्थानसंपादन करा

वाळवा गाव स्थान : वाळवा हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाघवाडी, इटकरे फाटा व पेठ नाक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई पासून ३४७ किलोमीटरवर, सांगली पासून ३३ किलोमीटरवर आणि कोल्हापूर पासून ५५ किलोमीटर अंतहरावर आहे.व इस्लामपूर पासून 10 किलोमीटर वर आहे

भौगोलिकसंपादन करा

गावापासून कृष्णा नदी वाहते.

शेतीसंपादन करा

वाळवा येथील पिकाऊ जमीन अंदाजे २१ हजार एकर आहे. जमीन काळीभोर,कसदार असून प्रथम पासून या परिसरातील कष्टाळू शेतकरी विविध प्रकारची शेती उत्पन घेत आहेत.

हवामानसंपादन करा

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.

इतिहाससंपादन करा

कर्मवीर भाऊराव पाटलांची पाऊले इथे उमटली .१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात आख्खे वाळवा गाव उतरत असे ब्रिटिशांच्या ११३ देशातील अवाढव्य साम्राज्यामध्येही स्वातंत्राची बेटे असणारया मोजक्या गावात वाळव्याचा उल्लेख गौरवाने करावा लागेल .या काळात अगदी स्त्रियादेखील प्रभात्फेरीमध्ये स्वातंत्र्याची गाणी गात कमालीच्या निर्भयपणे सामील होत असत.साचा:क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ग्रंथ

क्रांतिसिंह नाना पाटील जीवनाच्या अंतिम क्षणात वाळव्यामध्ये राहीले.वाळवा त्यांची कर्मभूमी होती.क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हे युगपुरुष वाळव्याचेच.नागनाथअण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या करिता झटत राहीले.त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ज्या भारताची स्वप्ने पाहिली होती, ती सगळीच साकार झालेली नाहीत. परंतु स्वातंत्र्यानंतर हा देश घडावा म्हणून त्यांनी जे कष्ट घेतले, जी चळवळ उभारली त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या आहेत. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बालवाडी सुरू केली. त्यातूनच शाळा, मग महाविद्यालय सुरू केले. प्रगतीच्या या प्रक्रियेत शेतकऱ्यांनाही सहभागी करून घेता यावे म्हणून त्यांनी हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना सुरू केला. सहकारक्षेत्रातला तो एक क्रांतिकारी प्रयोग ठरला. सामाजिक विचारांनी प्रेरित व्यक्ती अनेकदा व्यवसायात अपयशी ठरतात किंवा टोकाची भूमिका घेऊन वागतात. अण्णांनी त्यावर मात केली. कारखाना उत्तम चालवून दाखवला आणि तरीही स्वतःचे रूपांतर कारखानदारात होऊ दिले नाही. स्वतःमधील सामाजिक आंदोलक त्यांनी सुस्तावू दिला नाही.साचा:क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ग्रंथ


वाळव्यातले प्रमुख भागसंपादन करा

१) माळभाग

२) हाळभाग

३) पेठभाग

४) कोटभाग

५) चांदोली वसाहत

६) लक्ष्मी नगर

७) गणेश नगर

८) सव्वाशे मळा

९) क्रांतिवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी श्रमिक नगर

१०) अहिरगल्ली, माळभाग


११) आचरे मळा

12) फुलेनगर

हाळभागावर मोठ्या संख्येने पाटील, मोटे, थोरात इ. हे लढवैय्ये लोक राहतात.

धार्मिकसंपादन करा

मंदिरेसंपादन करा

वाळवा गावात रेणुकामाता मंदिर,गणपती मंदिर,गुरुदेव दत्त मंदिर,अंबामाता मंदिर,महादेव मंदिर,मारुती मंदिर,लक्ष्मी मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर,बिरोबा मंदिर अशी मंदीरे आहेत.

औद्योगिकसंपादन करा

वाळवा येते पद्मभूषण डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. वाळवा येतील सहकारी क्षेत्रातील कारखान्यामुळे शेतकरयाची शेती बागायती झाली आणि अनेक छोटे मोठे उद्योग निर्माण झाले. सर्वसामान्याची क्रयशक्ती वाढली. केवळ ऊस बागायती शेतीवर अवलंबून न राहता द्राक्षे आणि गुलाबाच्या फुलांची निर्यात परदेशातही परदेशातही होवू लागली. ठिबकसिंचन,स्प्रिंकलर इ.साधनाचा करून साधनांचा वापर करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पन वाढवले.आजचा आधुनिक शेतकरी अधिक उत्पनासाठी आधुनिक शेतीकडे वळला आहे.विविध प्रकारच्या जलसिंचन योजना राबवल्या मुळे वाळवा परिसरातील बहुतेक क्षेत्र ओलिताखाली आली आहे. वाळव्यामध्ये विविध बॅंका आणि पतसंस्थाचे जाळे असल्यामुळे शेतीसाठी आणि शेती पूरक उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्यास अडचण नाही.

औद्योगिक शैक्षणिक आणि वित्तीय संस्था : १) पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना लि.नागनाथअण्णा नगर २) हुतात्मा सहकारी दुध संघ वाळवा ३) हुतात्मा बझार ४) हुतात्मा सहकारी बॅंक ५) सहवीज निर्मिती प्रकल्प ६) इथेनॉल प्रकल्प ७) किसान शिक्षण संस्था ८) जिजामाता विद्यालय ९) सावित्रीबाई फुले वसतीगृह १०) किसान नं. १ पाणी संस्था ११) हुतात्मा किसन अहिर विद्यालय १२) क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय १३) राजाराम विद्यालय १४) विविध इरिगेशन संस्था १५) विविध विक्री संस्था १६) हुतात्मा प्राथमिक विद्यालय १७) हुतात्मा नानकसिंग वसतीगृह १८) बॅंक ऑफ बडोदा १९) अपना बॅंक २०) राजारामबापू सहकारी बॅंक २१) सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक22) ST TECH


वाळव्यातले प्रमुख मा. दिलीपकुमार पाटील (तात्या) , जिल्हा परिषद सदस्य मा. राजेंद्रकुमार पाटील (भाऊ) , मा. नेताजी पाटील, शक्तिसिंह पाटील (भैय्या), वैभव नायकवडी ,मा. गौरव(भाऊ)नायकवडी,मा.चेअरमन शामराव सव्वाशे (काका), धनाजी आचरे(साहेब), नंदकुमार शेळके, नझीर वलाडकर, सुषमा नायकवडी, दिपक धनवडे, किरन नायकवडी,विकम शिदे,


       ७.२ सामाजिक
       ७.३ शासकीय