नागनाथ रामचंद्र नायकवडी

(नागनाथअण्णा नायकवडी या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (जुलै १५ इ.स. १९२२ - मार्च २२, इ.स. २०१२) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी समाजसेवक होते.

नागनाथअण्णा नायकवडी

नागनाथअण्णा नायकवडी
जन्म: इ.स. १९२२
वाळवा
मृत्यू: मार्च २२, इ.स. २०१२
मुंबई
चळवळ: चले जाव
पुरस्कार: पद्मभूषण(२००९)
धर्म: हिंदू
प्रभाव: नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील
वडील: रामचंद्र गणपती नायकवडी
आई: लक्ष्मीबाई
पत्नी: कुसुमताई नायकवडी
अपत्ये: किरन,अरुन,वैभव
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

बालपण संपादन

सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात जुलै १५ इ.स. १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ला ते मॅट्रिक झाले.

चळवळ संपादन

१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. साताऱ्यात नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलीस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला. वाळवा तालुका म्हणजे कर्तबगार लोकांचा तालुका.अशा तालुक्याला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. धगधगता जीवनपट

पूर्ण नाव : नागनाथ रामचंद्र नायकवडी (अण्णा)

जन्म गाव : वाळवा, ता. वाळवा (सांगली)

जन्म तारीख : १५ जुलै १९२२

वडिलांचे नाव : रामचंद्र गणपती नायकवडी.

आईचे नाव: लक्ष्मीबाई नायकवडी.

शिक्षण : १९४८ला मॅट्रिक पास.

शाळेत असताना व्यायामाची खूप आवड, कुशल संघटक.

सन १९३० - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी विद्यार्थी दशेत ओळख.

सन १९३९ - कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट. सेवादलात सक्रीय सहभाग.

सन१९४० - कामेरी जि. सांगली येथे पहिली विद्यार्थी परिषद घेतली.

८ ऑगस्ट १९४२ - काँग्रेसच्या करेंगे या मरेंगे चळवळीत सहभाग.

७ जून १९४३ - शेणोली स्टेशन येथे पे स्पेशल ट्रेन लुटीत सहभाग.

३ ऑगस्ट १९४३ - नाना पाटील नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन, पणुंब्रे येथे.

१४ एप्रिल १९४४ - धुळे खजिना लुटीत चित्तथरारक सहभाग.

२५ फेब्रुवारीला हुतात्मा किसन अहीर व नानकसिंग सहकारी शहीद. जीवलग दोस्त गेल्याचे दुःख.

सन १९४८ ते १९५७ - सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय.

१३ फेब्रुवारी १९५० - बुंगवाडी येथील यशवंत गोविंद कदम (ता. तासगाव) यांच्या कन्येशी कोल्हापुरात सत्यशोधक पद्धतीने लग्न.

सन १९५७ - आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले.

सन १९४९ - वाळव्यात हुतात्म्यांची स्मारके म्हणून किसान शिक्षण संस्थेची स्थापना. गरीब मुलांसाठी वसतीगृहाची स्थापना.

सन १९६३ - मुलींनी शिकावे म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली.

सन १९६५ - मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतीगृहाची स्थापना.

सन १९७२ - शेतीला पाणी मिळावे म्हणून किसना नं. १ पाणी संस्था स्थापना.

सन १९७४ - नागठाणे बंधारा (ता. पलूस) बांधला. परिसर सुजलाम् सुफलाम् झाला.

सन १९७५ - फासेपारध्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी खास प्रयत्न.

सन १९८१ - हुतात्मा कारख़ान्याची स्थापना. मंजुरी (दिल्लीत ११ महिने ठिय्या).

सन १९८३-८४ - हुतात्मा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू.

२६ मे ८५ - ऐतवडे बुद्रुक येथे ५० हजार लोकांची शेतकरी परिषद यशस्वी.

सन १९८५ - दुसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवड.

सन १९८५ - सोनवडे (शिराळा) दुर्गम भागातील मुलांसाठी शाळा वसतीगृह सुरू.

सन १९८६ - तिसरे अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात घेतले.

सन १९८८ - रशिया दौऱ्यासाठी पत्नी सौ. कुसुमताईंसमवेत रवाना.

सन १९८९ ते ९३ - दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या.

सन १९८९ - कराड लोकसभेसाठी उमेदवारी.

सन १९९० - साखर कारखाना झोन दुरूस्ती चळवळ, सरकारला हादरा.

२५ फेब्रुवारी १९९३ - वाळवा ते सोनवडे बाबरी मशिद पाडलेबद्दल मानवी साखळी (८० कि. मी.)

२६ मे १९९३ - किणी येथे ८० हजार लोकांची शेतकरी परिषद.

११ जुलै १९९३ - पासून आटपाडीत पाणी संघर्ष चळवळीला प्रारंभ.

ऑक्टोबर १९९३ - १०८ लातूर भूकंपग्रस्त मुले दत्तक घेतली.

सन १९९६ - कराड लोकसभा निवडणूक लढवली.

सन १९९८ - भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांचा सत्कार, प्रत्येकाला टाटा सुमो मोटागाड्या भेट दिल्या.

२७ मे ९९ - मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उद्घाटन (वाळवा).

४ डिसेंबर २००० - वडाप बेरोजगारांचा कोल्हापुरात भव्य मोर्चा.

सन २००१ - हुतात्मा दैनिक सुरू करण्याची घोषणा.

सन २००७ - शिवाजी विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्राप्त.

सन २००९ - भारत सरकारचा पद्मभूषण सन्मान.

अण्णांचा बहुमान

१९९३ - नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार

१९९८ - डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार

१९९८ - राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व मानपत्र

१९९९ - फुले-आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

१९९९ - कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार

२००० - नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार

२००० - अरिहंत पुरस्कार

२००१ - प्रतिशाहू पुरस्कार

२००१ - क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

२००२ - हरिश्‍चंद्र तारामती गौरव पुरस्कार

२००२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार

२००२ - भाई माधवरावजी बागल पुरस्कार

२००२ - जीवन गौरव पुरस्कार कॉ. व्ही.एन. पाटील स्मृति गौरव पुरस्कार

२००२ - रिपब्लिकन मित्र पुरस्कार व मानचिन्ह

२००२ - शाहीर फरांदे पुरस्कार

२००२ - लक्ष्मीबाई मगर भूमिपुत्र पुरस्कार

२००३ - भगवान नेमिनाथ पुरस्कार

२००३ -दक्षिण भारत जैनसभेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार

२००३ - समाज भूषण पुरस्कार

२००४ - चिकोत्रा भूषण पुरस्कार

२००५ - फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य पुरस्कार

२००६ - आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक पुरस्कार

२००६ - मणिभाई देसाई पुरस्कार

२००६ - लोकनेते पुरस्कार

२००६ - शाहू महाराज पुरस्कार

२००६ - लोकनेते पुरस्कार

२००७ - हुतात्मा गौरव पुरस्कार

२००७ - सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

२००७ - आर्य भूषण पुरस्कार

२००७ - राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार

२००७ - किसन वीर सामाजिक पुरस्कार

२००७ - डी. लिट्. बहुमान

२००९ -भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार

२०११ - महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे समाजजीवन गौरव

२०१२ - रयत माऊली पुरस्कार

संदर्भ संपादन

[ दै.लोकमत मधील बातमी]दिनांक?? आवृत्ती??