तुंगभद्रा नदी
तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. शिमोगा जिल्ह्याच्या कुडली ह्या गावाजवळ तुंगा व भद्रा ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यांची अंशतः सीमा आखते व कृष्णा नदीला मिळते. हरिहर, हंपी, हॉस्पेट, मंत्रालयम, कुर्नूल ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.
तुंगभद्रा नदी | |
---|---|
हंपी येथे तुंगभद्रेचे पात्र | |
उगम | कुडली, शिमोगा जिल्हा (तुंगा नदी व भद्रा नदीच्या संगमावर) |
मुख | कृष्णा नदी, आलमपूर, महबूबनगर जिल्हा |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश |
लांबी | ५३१ किमी (३३० मैल) |
उगम स्थान उंची | ६१० मी (२,००० फूट) |