भद्रा नदी
भद्रा नदी (कन्नड: ಭದ್ರಾ ನದಿ) दक्षिण भारताच्या कर्नाटक राज्यातील एक नदी आहे.
भद्राचा उगम कुद्रेमुखाजवळ गंगामूळ येथे होतो. येथून भद्रा नदी पश्चिम घाटाच्या टेकड्या पार करीत पूर्वेकडे वाहते. या नदीच्या काठावर कुद्रेमुख, बलेहोळ आणि नरसिंहराजपुरा (एनआर पुरा) शहरे वसलेली आहेत. या नदीवर भद्रावती शहराजवळ भद्रा धरण आहे. याच्या मागे भद्रा सरोवर तयार झाले आहे. शिवमोग्गाजवळ कूडली येथे भद्रा तुंगा नदीला मिळते व तुंगभद्रा नदीत परिवर्तित होते. तुंगभद्रा कृष्णाची प्रमुख उपनदी आहे. कृष्णा पुढे बंगालच्या उपसागराला मिळते .