तुंगा नदी (कन्नड: ತುಂಗ ನದಿ) ही दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एक नदी आहे. या नदीचा उगम पश्चिम घाटात वराह पर्वत नावाच्या टेकडीवर गंगामूळ गावाजवळ होतो. पुढे ही नदी कर्नाटकच्या चिकमगळूर आणि शिमोगा या जिल्ह्यांतून वाहते आणि कूडली या गावी भद्रा नदीला जाऊन मिळते. त्यापुढे या नदीला तुंगभद्रा नदी म्हटले जाते जी कृष्णा नदीची उपनदी आहे. गजनूर गावाजवळ या नदीवर धरण बांधण्यात आले आहे.

तुंगा
चिबलगुड्डे, तीर्थहल्लीजवळील तुंगा नदीचे पात्र
उगम गंगामूळ, चिकमगळूर जिल्हा, कर्नाटक, भारत
मुख तुंगभद्रा नदी, कूडली, भद्रावती, कर्नाटक, भारत
पाणलोट क्षेत्रामधील देश कर्नाटक, भारत
लांबी १४७ किमी (९१ मैल)
धरणे गजनूर धरण