महबूबनगर जिल्हा
महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. महबूबनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. [१]
महबूबनगर हा निजामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद राज्याचा दक्षिणेकडील जिल्हा होता. महबूबनगर हे शहर हैदराबादपासून ९६ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण पूर्वी “रुक्मम्मापेटा” आणि “पलामूरू”(दुधाची जमीन) म्हणून ओळखले जात असे. हैदराबादचा निजाम (१८६९-१९११) मीर महबूब अली खान असफ जाह सहावा यांच्या सन्मानार्थ ४ डिसेंबर १८९० रोजी हे नाव बदलून महबूबनगर करण्यात आले. महबूबनगर हे १८८३ पासून ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.[२]
महबूबनगर जिल्हा మహబూబ్ నగర్ జిల్లా (तेलुगू) | |
तेलंगणा राज्यातील जिल्हा | |
तेलंगणा मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | तेलंगणा |
मुख्यालय | महबूबनगर |
मंडळ | १५ |
क्षेत्रफळ | |
- एकूण | २,७३८ चौरस किमी (१,०५७ चौ. मैल) |
भाषा | |
- अधिकृत भाषा | तेलुगु |
लोकसंख्या | |
-एकूण | ९,१९,९०३ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३३६ प्रति चौरस किमी (८७० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | ३७.२% |
-साक्षरता दर | ६३.३४% |
-लिंग गुणोत्तर | १०००/९३४ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | महबूबनगर |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ६२६.९ मिलीमीटर (२४.६८ इंच) |
वाहन नोंदणी | TS-06 |
संकेतस्थळ |
प्रमुख शहर
संपादन- महबूबनगर
भूगोल
संपादनमहबूबनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,७३८ चौरस किलोमीटर (१,०५७ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा पूर्वेला नागरकुर्नूल जिल्हा, पश्चिमेला नारायणपेट जिल्हा, उत्तरेला रंगारेड्डी जिल्हा, दक्षिणेला वनपर्ति आणि जोगुलांबा गदवाल जिल्ह्यांसह आहेत. दक्षिणेला कृष्णा नदीच्या सीमेवर आहे. कृष्णा, तुंगभद्रा, वेंडी, पेद्दवागु आणि चिन्नवागु ह्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.
लोकसंख्या
संपादन२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या महबूबनगर जिल्ह्याची लोकसंख्या ९,१९,९०३ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९३४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६३.३४% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३७.२% लोक शहरी भागात राहतात. महबूबनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.
महबूबनगर जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:
अनुक्रम | मंडळ |
---|---|
१ | महबूबनगर |
२ | महबूबनगर |
३ | अडकल |
४ | बालानगर |
५ | भूतपूर |
६ | सीसी कुंता |
७ | देवराकड |
८ | गांडेड |
९ | हनवाडा |
१० | जडचेर्ला |
११ | कोइलकोंडा |
१२ | मिडजिल |
१३ | मूसापेट |
१४ | नवाबपेठ |
१५ | राजापूर |
हे सुद्धा पहा
संपादन
बाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Sravan (2018-02-11). "Telangana New Districts Names 2018 Pdf TS 31 Districts List". Timesalert.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-28 रोजी पाहिले.
- ^ "History | Mahabubnagar District,Telangana | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-28 रोजी पाहिले.