होस्पेट

कर्नाटकातील शहर, भारत
(हॉस्पेट या पानावरून पुनर्निर्देशित)

होस्पेट हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यातील एक शहर आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या हंपी गावापासून १२ किमी अंतरावर असलेले होस्पेट तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर बंगळूरच्या ३५० किमी उत्तरेस तर हुबळीच्या १५० किमी पूर्वेस स्थित आहे. तुंगभद्रा धरण येथेच बांधले गेले आहे.

होस्पेट
ಹೊಸಪೇಟೆ
भारतामधील शहर

येथील मल्लिकार्जुन मंदिर
होस्पेट is located in कर्नाटक
होस्पेट
होस्पेट
होस्पेटचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 15°16′12″N 76°23′24″E / 15.27000°N 76.39000°E / 15.27000; 76.39000

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा बेल्लारी जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १५२०
समुद्रसपाटीपासुन उंची १,५७२ फूट (४७९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,०६,१६७
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


होस्पेटची स्थापना विजयनगरसम्राट कृष्णदेवराय ह्याने इ.स. १५२० मध्ये केली. २०११ साली होस्पेटची लोकसंख्या सुमारे २ लाख होती. होस्पेट रेल्वे स्थानक दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते. हरीप्रिया एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे.