कृष्णदेवराय (तेलुगू उच्चार: कॄष्णदेवराया ; तेलुगू కృష్ణదేవరాయులు, ; तुळू: ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ; कन्नड ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ) हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले.

हैदराबाद येथील कृष्णदेवरायाचा पुतळा

शासकीय कारकीर्द

संपादन

वयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला. रायचूरच्या लढाईत त्याला मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्याचा चांगलाच वचक बसला. ओडिशावर आक्रमण करून त्याने राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्याने महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते.

साहित्यिक योगदान

संपादन

कृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगूसंस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. आमुक्त माल्यदा या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णूचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत.

संकीर्ण

संपादन

कृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. तसेच संत भानुदास यांच्याशी भेट याच राजाची झाली. पंढरपूरच्या विठ्ठल या देवतेला या राजाने आपल्या राज्यात आणवुन मंदिर बांधले.

कृष्णदेवरायाची मराठी चरित्रे

संपादन