विजयनगरचे साम्राज्य

(विजयनगर साम्राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली.

विजयनगरचे साम्राज्य
ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ
इ.स. १३३६इ.स. १६४६
Vijayanagara flag.pngध्वज
Vijayanagara-empire-map.svg
राजधानी विजयनगर (हंपी)
शासनप्रकार राजेशाही
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: हरिहर राय (प्रथम) (इ.स. १३३६-१३५६)
अंतिम राजा: श्रीरंग (तृतीय) (इ.स. १६४२-१६४६)
अधिकृत भाषा कन्नड भाषा आणि तेलगू
इतर भाषा तमिळ, मल्याळम
राष्ट्रीय चलन विजयनगर रुपये

विजयनगर घराणेसंपादन करा

हे एकूण पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य करत होते. महाराष्ट्र हा हरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरी नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क. त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे या भावंडांचे ध्येय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.

बुक्करायाचा कंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम्” या संस्कृत काव्यग्रंथात आली आहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले.

विजयनगर घराणे राज्य / प्रदेश कालावधी
पहिली पिढी

पाच भावंडे

भावांपैकी तिघे पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य
हरिहर महाराष्ट्र
बुक्क होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश
कंप उदयगिरी
शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार
दुसरी पिढी
कंपराय

(बुक्करायाचा मुलगा)

वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले.

वंशावळसंपादन करा

पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.
 • हरिहरराय-१: इ.स. १३३६-१३५६
 • बुक्कराय-१: १३५६-१३७७
 • हरिहरराय-२: १३७७-१४०४
 • विरूपाक्षराय: १४०४-१४०५
 • बुक्कराय-२: १४०५-१४०६
 • देवराय-१: १४०६-१४२२
 • देवराय-२: १४२४-१४४६
 • रामचंद्रराय: १४२२
 • वीरविजय बुक्कराय: १४२२-१४२४
 • देवराय-२: १४२४-१४४६
 • मल्लिकार्जुनराय: १४४६-१४६५
 • विरूपाक्षराय-२: इ.स. १४६५-१४८५
सालुव घराणे
 • नरसिंहदेवराय: इ.स. १४८५-१४९१
 • तिम्मा भूपाल: १४९१
 • नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलुव घराणे
 • नरसानायक: १४९१-१५०३
 • वीरनरसिंहराय: १५०३-१५०९
 • कृष्णदेवराय: १५०९-१५२९
 • अच्युतदेवराय: १५२९-१५४२
 • सदाशिवराय: १५४२-१५७०
अरविदू घराणे
 • अलियरामराय: १५४२-१५६५
 • तुरुमलदेवराय: १५६५-१५७२
 • श्रीरंग-१: १५७२-१५८६
 • वेंकट-२: १५८६-१६१४
 • श्रीरंग-२: १६१४
 • रामदेव: १६१७-१६३२
 • वेंकट-३: १६३२-१६४२
 • श्रीरंग-३: इ.स. १६४२-१६४६.


इ .स. १३२३ मध्ये वरंगळचे राज्य तुघलकने जिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांची सुटका करून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले.

विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिंहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली. प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय (१५०९-१५२९) याच वंशाचा होता.

विजयनगरवरील पुस्तकेसंपादन करा

 • विजयनगर हृदयस्थ साम्राज्य - लेखक- डाॅ. अस्मिता हवालदार, प्रकाशन वर्ष २०१९. प्रकाशक, काँटिनेंटल प्रकाशन ,पुणे


हेही पहासंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.